Top Post Ad

ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण

 


 व्हिडिओ  व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांना पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोकं ठेवून विचित्रपद्धतीने कवायत करून घेण्यात येत असल्याचे दिसत आहे. पावसाच्या पाण्यात डोकं तसेच शरीरावरील सर्व कपडे ओले असून त्यातच मोठ्या दांड्याने त्यांना  बेदम मारहाण होत असल्याचे व्हीडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. इतकेच नव्हे तर काही विद्यार्थी जिवाच्या आकांताने ओरडत आहेत. तरीही त्यांना मारहाण होत आहे. या प्रकारामुळे जोशी-बेडेकर महाविद्यालयातील नुकत्याच कालपासून सुरु झालेल्या ज्युनिअर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. . 

जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणात बांदोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचं प्रशिक्षण देण्यात येतं. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना आर्मी आणि नेव्हीच्या प्रशिक्षणपूर्वीचे धडे देण्यात येतात. यावेळी विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षाही करण्यात येते. पण विद्यार्थ्यांना अमानुष शिक्षा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये एनसीसीबाबत दहशत पसरली असून अनेकजण एनसीसीमध्ये जाण्यास घाबरत आहेत.

 ही घटना २६ जुलै रोजीची आहे. लायब्ररी मधून एका माजी विद्यार्थिनीला बाहेरून ओरडताना आवाज आला आणि तिने व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ स्टेटसला ठेवला, ज्यांनी स्टेटसला पाहीले. त्या दोन - तीन जणांनी तो व्हिडिओ शेअर केला आणि तो आज प्रसार माध्यमातून viral झाला. जिने व्हिडिओ काढला तिची तक्रार नाही, विद्यार्थ्यांची तक्रार अजून आलेली नाही असे पोलिसांनी सांगितले आहे.

या प्रकारानंतर मनसे सैनिक तात्काळ महाविद्यालयाच्या परिसरात जमा झाले आणि याबाबत जाब विचारण्याकरीता प्राचार्यांना भेटण्यास गेले. मात्र प्राचार्य यावेळी उपलब्ध नव्हत्या. तसेच यावेळी झालेल्या घटनेबाबत प्राचार्य आणि सिनिअर पोलिस अधिक्षक यांच्यात संवाद झाला असल्याचे माहिती मनसे पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. या प्रकाराबाबत संबंधित विद्यार्थ्यांला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली. तसेच याबाबत पुन्हा येऊन महाविद्यालय प्रशासनाला जाब विचारण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. 

“ विद्यार्थ्यांनी अजिबात काळजी करू नये, असे प्रकार आम्ही अजिबात खपवून घेणार नाही,  प्रशिक्षणादरम्यान घटनास्थळी शिक्षक उपस्थित नसताना हा प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याचबरोबर असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी एका समितीची स्थापनाही आम्ही करत आहोत. असे प्रकार कोणत्याही विद्यार्थ्यांबरोबर असतील तर त्यांनी अजिबात घाबरू नये. आम्हाला येऊन भेटावं. एनसीसी सोडण्याचा अजिबात विचार करु नये,  एनसीसीचे प्रशिक्षक हे सिनियर विद्यार्थीच असतात. ते शिक्षक नसतात. मात्र, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे. या प्रकारामुळे एनसीसीकडून केली जाणारी चांगली कामं लपली गेली आहेत. ” - सुचित्रा नाईक (प्राचार्या जोशी-बेडेकर महाविद्यालय)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com