Top Post Ad

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना


   कुठल्याही योजनेचे यश हे लोकाभिमुखता, पारदर्शकता व सुलभ कार्यप्रणालीवर अवलंबून असते. सर्वसामान्यांची कामे सुलभरित्या व स्थानिक पातळीवर होणे आवश्यक असते. शासन प्रत्येक क्षेत्रात विकासाच्या अनेक योजना राबवित असते. गरजूंसाठी तो आधार तर असतोच त्याचप्रमाणे, सामूहिक विकासप्रक्रियेलाही त्यातून गती मिळत असते. हे लक्षात घेऊन नागरिकांना विविध योजनांचे थेट लाभ मिळावेत, यासाठी शासनाने “शासन आपल्या दारी..!” हा एक महत्वाकांक्षी विशेष उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची जिल्हा माहिती कार्यालयामार्फत प्रसिध्दी करण्यात येत असून काय आहेत शासकीय योजना.. जाणून घेवू या लेखातून... 

योजनेचा उद्देश :- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रू.20.00 लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल.

योजनेचे स्वरूप :- राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू.10.00 लक्ष पर्यंत,  परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू.20.00 लक्ष पर्यंत.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती :-अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे, अर्जदार हा इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा, अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रू.8.00लक्ष पर्यंत असावी, अर्जदार हा इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर किमान 500 पेक्षा अधिक असावा.

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे :- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखला,  तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो, अर्जदाराचा जन्माचा/वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबधित पत्र, शिष्यवृत्ती (Scholarship) , शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा,  आधार संलग्न बँक खाते पुरावा,  तसेच इतर आवश्यक कागदपत्रे/ पुरावे.

शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत येणारे अभ्यासक्रम--

राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम:- आरोग्य विज्ञान- MBBS,BDS,BAMS,BHMS,B.Pharm, व संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी- B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ. व्यावसायिक अभ्यासक्रम -LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलिव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING, विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम, इ. कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान-Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम.

देशांतर्गत अभ्यासक्रम:- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC ) अभ्यासक्रमासाठी प्रात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

परदेशी अभ्यासक्रम:- आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी :- शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमित परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्या रकमेचा परतावा (कमाल 12 टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. तसेच व्याज परतावासाठी जास्तीत जास्त 5 वर्षे कालावधी ग्राह्य धरण्यात येईल.

कार्यपद्धती :- ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांनी आपले अर्ज महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर जावून भरावयाचे आहेत. 

     इच्छुक विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या एमएमआरडीए बिल्डींग, ए-१.रु. नं. ७, सिद्धार्थ नगर, शिवसेना शाखेजवळ, कोपरी, ठाणे (पूर्व) ४००६०३, संपर्क क्रमांक : ८८७९९४५०८०/ ९३२०२०२०३३ / ८७६७८५८०४५. या पत्त्यावर अथवा महामंडळाच्या www.msobcfdc.org संकेतस्थळाला भेट द्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक, ठाणे यांनी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com