Top Post Ad

...तर युनियनचे पदाधिकारी आत्मदहन करणार

 


 महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मंजूर करा

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावामधील गावकऱ्यांना सरकारी योजनाचा लाभ मिळावा. सरकारी सुखसुविधा मिळाव्यात म्हणून सातत्याने गावकऱ्यांची सेवा बजावून देखील गा्मपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना आपल्या न्यायहक्कापासून वंचित राहावे लागते आहे. आपल्या हक्कांची, मागण्याची सरकार दरबारी दखल घेतली जात नाही. २० वर्षे होऊनही या मागण्या मंजूर केल्या जात नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे पदाधिकारी आत्मदहन करणार असल्याचे प्रसिद्धीपञकाद्वारे जाहिर केले आहे. 

कर्मचार्याचे भव्य राज्यस्तरीय अधिवेशन दि. २६ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात मुख्यमंत्री आणि ग्रामविकासमंञी यांनी जवळपास ३५ हजार ग्रामपंचायत कामगारांना त्यांच्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ६० हजार गा्मपंचायतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांमध्ये आनंदाची लाट पसरली होती.  मात्र, सरकारने याहीवेळेस नेहमीप्रमाणे बोळवण केल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याचे युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वयाची ६० वर्षे सेवा निवृत्त झाल्यानंतर देखील सेवा बजावून पेशन्स मिळत नाही, कसल्याही सुखसुविधा नाही परिणामी कुटुंबाची वाताहत होत असल्याने हा कर्मचारी वर्ग संतप्त झाला आहे. म्हणूनच युनियनचे पदाधिकारी काजी अल्लाउद्दीन आणि रामेश्वर गायकी यांनी आता आम्हाला आत्नदहन केल्याशिवाय पर्याय दिसून येत नाही, असे सांगितले. किमान आमच्यानंतर उर्वरित कर्मचार्यांच्या वाटयाला असे वाईट दिवस येऊ नये म्हणून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com