सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या ब्लू टायगर सामाजिक संस्था, श्वेता गंध फाउंडेशन डोंबिवली, परिवार सामाजिक संस्था आणि दि ग्लोबल व्हॉईस (इंग्रजी /मराठी) साप्ताहिक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र रत्न गौरव गुणिजन सत्कार सोहळा ठाणे - २०२३ आयोजित करण्यात आला होता. समाजासाठी नेहमीच एक हात मदतीचा देणाऱ्या या संस्थांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. शनिवार दि. १२ ऑगस्ट रोजी सहयोग मंदिर हॉल, ठाणे येथे गौरव तुमचा आनंद आमचा म्हणून संपन्न झालेल्या या कार्यक्रमात जगण्याला ध्येय बनविणाऱ्या व्यक्तींचा व संस्थांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री नयना आपटे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तर संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. मनिषा तायडे - गांगुर्डे संस्थापिका ऐन्वॉय हेल्थ केअर फाउंडेशन यानी भुषविले. सौ. राजश्री काळे अभिनेत्री, तेज विवान मराठी फिल्म अभिनेता (बायको चटका, मेव्हणी फटाका फेम) सुनिल भाऊ कांबळे जेष्ठ समाजसेवक, राजेश वंजारे प्रसिध्द उद्योगपती तथा ब्लू टायगर मार्गदर्शक, पॅंथर अनिकेत मनोजभाई संसारे युवा नेते, अॅड. एस. एस. पवार निवड समिती अध्यक्ष यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. बी. एन. खरात संचालक समृध्दी प्रकाशन, निमंत्रक मा. बाळराजे शेळके अध्यक्ष-ब्लू टायगर सामाजिक संस्था, मुंबई, कार्यक्रमाचे आयोजन मा. श्वेता शिर्के, अध्यक्षा श्वेतगंध फाउंडेशन, डोंबिवली, मा. ज्योती चिंदरकर अध्यक्षा-परिवार सामाजिक संस्था, ठाणे यांनी केले. यावेळी कॅन्सर तज्ञ डाॅ.प्रविण खंदारे यांनी कॅन्सरबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यानंतर ठाणे येथील स्वरमंजूषा टीमच्या कलाकारांनी सुरेल आवाजात रसिकांसमोर गाणी सादर केली
0 टिप्पण्या