आज देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहेत. त्या भाजपची भूमिका देशातील सर्वसमाजात एकवाक्यता ठेवण्यासाठी अपेक्षित होते. त्याऐवजी ते देशात कटुता वाढेल यासाठी भूमिका घेत आहेत. त्यासाठी आम्ही देशपातळीवर सभा घेतल्या. एक बिहार आणि दुसरी कर्नाटक येथे सभा झाल्या. संयुक्त सभा घेऊन त्याला इंडिया नाव दिले. 31 रोजी इंडियाची बैठक होईल. या बैठकीत सामूहिकपणे मोदी सरकारविरोधात लढाई सुरू होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिला. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.
समाजामध्ये जातीय तेढ कसे होईल असे निर्णय घेतले जात आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्या सेंट्रल बोर्ड शिक्षण मंडळाच्या नियंत्रणाखाली या शाळा काम करतात. मार्गदर्शन आणि अभ्यास त्याचे काम या संस्थेने करायचे असते. 10 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढून सांगितले की, 14 ऑगस्ट भारत-पाकिस्तान याच्यात फाळणी झाली. त्यावेळी दोन समाजात निर्माण झाली. ती कटूता अनेक वर्ष टिकून राहीली. आता मोदी सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या सेंट्रल बोर्डाने परिपत्रक काढून फाळणी झाली त्याचा दिवस साजरा करण्याचे आदेश दिले. फाळणीचे प्रदर्शन हे ठिकठिकाणी केले पाहिजे. त्यासंबंधीचे चित्र, भीती दाखवली पाहिजे. हे प्रदर्शन करून या दिनाचे महत्त्व कळावे म्हणून एक कार्यक्रम घ्या. स्वातंत्र्य सेनानी त्यांना कथाकथानासाठी निमंत्रित करा. त्यासाठी कालावधी निश्चित करा. त्यातून फाळणीतून निर्माण झालेल्या परिस्थितीचे प्रदर्शन करून लोकांपर्यंत पोहोचवा. हे परिपत्रक मोठे उदाहरण आहे जे आम्ही सातत्याने सांगतो, समाजामध्ये जाती धर्मामध्ये कटुता वाढवते त्याचे. कॉंग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट) आणि आम्ही इंडियाच्या बैठकीत हा विषय मांडून निषेध घेण्याचा निर्णय घेतला जाईल.
मणिपूरमध्ये काय घडलं, ही भूमिका आम्ही संसदेत मांडली. आज नॉर्थ ईस्ट हा सर्व भाग देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. चीनची सीमा असल्याने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. नॉर्थ ईस्टमध्ये ज्या घटना घडतात किंवा घडवल्या जातात, त्या देशाच्या ऐक्याच्या दिशेने घातक आहेत. मणिपूरमध्ये दोन समाजात अंतर वाढले एकमेकांविरूद्ध सामाजिक संघर्ष चालू आहे. पोलिंसावर हल्ले केले जात आहेत. त्यावर केवळ सुरुवातीला तीन मिनीट मोदी बोलले. आणि संसदेत केवळ दहा मिनिटं बोलून हा विषय बाजूला केला. हा विषय त्यांना महत्त्वाचा वाटत नाही. मणिपूरमध्ये स्त्रीयांच्या अब्रुची धिंड काढल्या जातात. याकडे मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यावेळी त्यांनी मोदींची गत फडणवीसांसारखी होणार असल्याचा इशारा दिला. 'सद्यस्थितीत देशातील परिस्थिती दिवसागणीक गंभीर होत चालली आहे.
सर्वत्र जातीय तेढ निर्माण केले जात आहे. मणिपूर जळत असतानाही राज्यकर्ते त्यावर बोलण्यास तयार नाहीत. कालच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन घेतल्याचे वाटत होते. त्यांनी फडणवीसांसारखी पुन्हा येण्याची वल्गना केली. फडणवीस आले, पण खालच्या पदावर. मग मोदीही येतील, पण कोणत्या पदावर?', असे ते म्हणाले. आमच्याकडे अनेक उदाहरण आहेत. केंद्राच्या सत्तेचे गैरवापर करून निवडून आलेली सरकार पाडणे, मध्यप्रदेश कमलनाथ यांचे सरकार पाडले गेले. सत्तेचा वापर करून महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार कसं पाडलं हे सर्वांना माहित असल्याचेही ते म्हणाले. सामूहिक आणि एकत्र लढून मोदी सरकारला पर्याय कसा द्यायचा आणि जनमत कसं करायचं याबाबत विचार करत आहोत. हे तातडीनं करणं गरजेचं आहे कारण समाजात उन्माद वाढेल असे निर्णय मोदी सरकार घेत असल्याचेही शरद पवार म्हणाले.
0 टिप्पण्या