मुंबईत डोंगर उतारावरील असलेल्या वस्त्यांमध्ये संरक्षक भिंती कोसळून मोठी जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. विशेषतः भांडुप परिसरामध्ये बहुसंख्य भिंती या धोकादायक अवस्थेत असून त्या घरावर कोसळून दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कित्येक कुटुंबे भीतीच्या छायेखाली जगत आहेत. काही ठिकाणी अशा भिंतींचा काही भाग कोसळल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. या संरक्षण/आधार भिंतीचे दुरुस्ती व पुनःर्रबांधकाम इत्यादी कामे महानगरपालिका सहाय्यक आयुक्त व मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ तसेच जिल्हाधिकारी यानी समन्वयाने करणे गरजेचे होते. महापालिका प्रशासन व जिल्हा नियोजन अधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने घ्यावा यासाठी सदरचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा देऊनही या विषयाकडे प्रशासनाने सोईचे दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडी, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी दिनांक 17 पासून आमरण उपोषणाची हाक दिली होती.
"आधार भिंतींच्या कामाच्या बाबतीत प्रचंड गोंधळ असून बेफिकीर प्रशासनाच्या इच्छाशक्ती अभावी नागरिकांची फरफट होत आहे, लोक मृत्यूमुखी पडल्यावर प्रशासन जागे होणार का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबईतील सर्व जीर्ण आणि धोकादायक भिंतीचे बांधकाम तातडीने करावे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, खाजगी-शासकीय असा भेद न करता सरसकट भिंतीचे बांधकाम हाती घ्यावे, झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्चस्तरीय चौकशी करावी, आयआयटी मुंबई यांच्या सूचनेनुसार शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम निर्धारित करून होणारे अपघात रोखावेत. व नागरिकांचे पुनर्वसन SRA योजने अंतर्गत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश उपाध्यक्ष स्नेहल सोहनी यांनी आधार भिंती संदर्भात प्रशासनाशी अनेक वेळा पाठपुरावा करून देखील प्रशासन मात्र मुंबईकरांच्या सुरक्षित जिवाबाबत प्रचंड उदासीन असल्याचे दिसते. असे असताना मुंबईकरांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवण्यासाठी वंचितच्या स्नेहल सोहनी भांडुप एस वॉर्ड येथे उपोषणास बसल्या होत्या. यात प्रामुख्याने मुंबईतील सर्व जीर्ण आणि धोकादायक भिंतीचे बांधकाम तातडीने करावे व त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, खाजगी-शासकीय असा भेद न करता सरसकट भिंतीचे बांधकाम हाती घ्यावे, झालेल्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट व उच्चस्तरीय चौकशी करावी,आयआयटी मुंबई यांच्या सूचनेनुसार शासनाने यावर ठोस कृती कार्यक्रम निर्धारित करून होणारे अपघात रोखावेत. व नागरिकांचे पुनर्वसन SRA योजने अंतर्गत करण्यात यावे इत्यादी मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केलेल्या आहेत.
यावेळी उपोषणस्थळी वंचितचे युवा नेते मा. सुजात आंबेडकर यांनी भेट दिली. सहाय्यक आयुक्त यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर त्यांना पुढच्या सोमवारपर्यंत आमच्या मागण्या जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मान्य करून देण्यात याव्यात असे सांगण्यात आले. पुढच्या सोमवारपर्यंत विषय मार्गी न लागल्यास पुढचे उपोषणाचे आंदोलन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर होईल असा इशारा मा सूजात आंबेडकर यांनी दिला. सुजात आंबेडकर यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्नेहल सोहनी यांनी उपोषण मागे घेतले. ३ दिवसाचा अल्टिमेट देऊन तूर्तास उपोषण मागे घेण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आपण जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान, महिला आघाडी मुंबई अध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, युवा अध्यक्ष परमेश्वर रणशुर यांच्या सहित मुंबई, जिल्हा, तालुका , वार्डचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शेकडो जण उपस्थित होते
0 टिप्पण्या