ठाण्यात कळवा, कोपरी व वर्तकनगर या भागामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी ऑलम्पिक साईज तरण तलाव आहेत. त्यामुळे शहराच्या इतर भागांत नागरिकांसाठी त्यांच्या घरानजीक पालिका प्रशासनाच्या माध्यमातून तरण तलाव उभारण्यात यावेत, अशी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यानुसार घोडबंदर रोड येथे वेगवेगळ्या चार ठिकाणी ऑलम्पिक साईज तरण तलाव व त्याच ठिकाणी आधुनिक जिम बांधण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. प्रत्येकी १० कोटी असे चार तरण तलाव बांधण्यासाठी एकूण ४० कोटींच्या निधीमंजुरीचा शासन निर्णय झाला आहे. याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील महिन्यात बांधकाम सुरू होईल, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
0 टिप्पण्या