Top Post Ad

देशात कुणाच्याही कबरीवर जाण्यास बंदी आहे का?


 औरंगजेबचे स्टेटस ठेवलं म्हणून मुस्लीम तरुणांना अटक झाली, ते ठीक आहे. पण प्रकाश आंबेडकर औरंगजेबच्या कबरीवर फुलं वाहून आले. तसेच कुणाच्यात हिंमत असेल तर मला अटक करून दाखवावी, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी दिलं. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. राज्यात दोन वेगवेगळ्या कायदा व्यवस्था आहेत का? असा सवाल समाजवादी पक्षाचे अबु आझमी यांनी उपस्थित केला. 

यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं की, “प्रकाश आंबेडकर जेव्हा औरंगजेबच्या कबरीवर गेले होते, तेव्हा मी त्यांना विनंती केली होती की, तुम्ही कबरीवर जाऊन महिमामंडन करू नका. दोन धर्मात तेढ निर्माण करणं हा गुन्हा आहे, औरंगाजेबच्या कबरीवर जाणं हा गुन्हा नाही. ज्याप्रकारे काही युवक व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हाच तुमचा बाप आहे, असं लिहितात, तो गुन्हा आहे.” 

देवेंद्र फडणवीसांच्या सभागृहातील या उत्तरावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत गोलमाल उत्तर दिलं आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला. तसेच देशात कुणाच्याही कबरीवर जाण्यास कायद्याने बंदी असेल किंवा कायद्याने बंदी नसेल, तर याबाबत फडणवीसांनी खुलासा करावा, महाराष्ट्राच्या विधानसभेत औरंगजेबाच्या कबरीवर फुल वाहणं आणि व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवणं, यासंदर्भात मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्यात आली. अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिलं, ते गोलमाल उत्तर आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी उत्तर दिले पाहिजे की, देशात कुणाच्याही मजारीवर किंवा कबरीवर जाण्यास बंदी आहे का? याचा खुलासा त्यांनी करावा. कुणाचं काय मत आहे? हा वेगळा भाग आहे. पण कबरीवर जाणं कायद्याने बंदी असेल तर ते सांगावं किंवा कायद्याने बंदी नसेल तर त्याचाही फडणवीसांनी खुलासा करावा.”

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ट्विट द्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी २०१४ मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने वाढ झाल्याचा आरोप केला आहे.  'द्वेष, जातिवाद आणि मृत्यूच्या व्यापाराचा ठेकेदार (The Merchant of Hate, Casteism and Death) आणि त्याचे गुंड निवडणुकीतील फायदा मिळवण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी दंगली भडकावण्यावर, ध्रुवीकरण करण्यासाठी धार्मिक आणि जातीय फूट वाढवण्यावर विश्वास ठेवतात.'  भाजप - आरएसएस सतत सत्तेत राहावी यासाठी दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम यांना सतत दडपण, भीती आणि दहशतीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com