Top Post Ad

ग्रामीण विकास मंत्रालयाचा पेन्शन योजनेचा पैसा प्रचारासाठी खर्च


  आयुष्मान भारत  योजनेअंतर्गत 88,760 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या रूग्णांच्या संदर्भात नवीन उपचारासंबंधीचे हजारो दावे सिस्टीममध्ये पैसे भरलेले दाखवण्यात आले आहेत. त्यापैकी सुमारे 3,903 प्रकरणांमध्ये दाव्याची रक्कम रुग्णालयांना अदा करण्यात आली. एकाच रुग्णाला अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना दाखवण्यात आले. एकाच रुग्णाला एकाच वेळी अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी 2020 मध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने (NHA) देखील हा मुद्दा उपस्थित केला होता. एकाच मोबाईल नंबरवर लाखो लोकांची नोंदणी ९९९९९९९९९९ या मोबाईल क्रमांकावर ७.४९ लाख लोकांनी नोंदणी केली होती. 8888888888, 9000000000, 20, 1435 आणि 185397 या क्रमांकांवरही अनेकांनी नोंदणी केली होती. यासह राफेल आणि अदानी घोटाळ्यानंतर भाजपच्या मोदी सरकारचे एकदम सात मोठे घोटाळे कॅग या घटनात्मक संस्थेने उघड केले आहेत.  

भारतमाला प्रकल्पांतर्गत रस्ते बांधणीसाठी करण्यात आलेल्या खर्चामध्ये मोठी फेरफार झाल्याचे समोर आले आहे. यासाठी झालेला खर्च प्रतिकिलोमीटर १५.३७ कोटी रुपये असताना तो ३२ कोटी रुपये दाखविण्यात आला. इतकेच नाही तर निविदा प्रक्रियेतही त्रुटी झाल्याचे समोर आले आहे. हा प्रकल्पासंदर्भाचा अहवाल कधीही सादर करण्यात आलेला नाही. ३,५०० कोटी रुपये परस्पर दुसरीकडे वळविण्यात आले. प्रकल्पासाठी सुरक्षा सल्लागाराचीही नेमणूकही करण्यात आली नव्हती. मोदी सरकारने या या प्रकल्पांसाठी जनतेची दिशाभूल केली.

द्वारका द्रुतगती महामार्गातील रस्ते बांधणीसाठीचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटी रुपये असताना तो २५० कोटी रुपये इतका करण्यात आला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारताच्या प्रथम श्रेणी - विभाजीत शहरी द्रुतगती मार्ग, द्वारका द्रुतगती मार्गाच्या (राष्ट्रीय महामार्ग- 248बीबी) प्रगतीचा आढावा घेतला होता. भारतमाला प्रकल्पांतर्गत आणि 8,662 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणारा हा आहे. हा भारतातील पहिला उन्नत शहरी द्रुतगती मार्ग असेल आणि यामुळे दिल्ली-एनसीआरमधील वायू प्रदूषण कमी करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होईल, असे गडकरी म्हणाले होते. मात्र कॉंगच्या अहवालात रस्ते बांधणीसाठीचा खर्च प्रतिकिलोमीटर १८ कोटी रुपये असताना तो २५० कोटी रुपये इतका करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर अली आहे. पाच टोल नाक्यांचे ऑडिट केले तेंव्हा राष्ट्रीय महामार्ग महामंडळाने जनतेचे १३२ कोटी रुपये लुटल्याची बाब समोर आली आहे. देशातील प्रत्येक टोल नाक्याचे ऑडिट केल्यास प्रचंड लूट झाल्याचे लक्षात येईल.

अयोध्या विकास प्रकल्पाची जमीन कवडीमोलाने खरेदी करून राम मंदिर ट्रस्टला प्रचंड दराने विकण्यात आली. या प्रकल्पाचे कंत्राटदार नसलेल्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.
 प्रति किलोमीटर १८ कोटीत तयार होवू  शकणाऱ्या द्वारका एक्सप्रेस-वे वर रस्ते बांधणीसाठी प्रति किमी २५० कोटी रुपये एवढा अवाच्या सवा खर्च केला गेला.  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI ने टोल नियमांचे उल्लंघन करून जनतेकडून १३२ कोटी वसूल केले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ७.५ लाख लाभार्थी एकाच क्रमांकाशी जोडून लाभ देण्यात आला, लाभार्थींची कोणतीही शहानिशा नाही. अयोध्या विकास प्रकल्पातील कंत्राटदारांना अवाजवी फायदा मिळवून दिला. मोठा भ्रष्टाचार. ग्रामीण विकास मंत्रालयाचा पेन्शन योजनेचा पैसा चक्क भाजप सरकारच्या प्रचारात खर्च केला!  अनिल अंबानीला कोणताही अनुभव नसतांना काम दिलं,  HAL वर विमान इंजिनच्या डिझाईन-उत्पादनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप,  ३१५९ कोटींचे नुकसान झाल्याचा ठपकाही कॅगने आपल्या अहवालात ठेवला आहे. 

आयुष्मान भारत योजना भाजपच्या मोदी सरकारने  एकाच मोबाईल क्रमांकाअंतर्गत ७.५ लाख लाभार्थीची या योजनेमध्ये नोद उघड झाली आहे,  उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या ८८ हजार रुग्णांच्या नावे निधीचे वाटप करण्यात आले. पाच टोल नाक्यांचे ऑडिट केले तेव्हा राष्ट्रीय महामार्ग महामंडळाने जनतेचे १३२ कोटी रुपये लुटल्याची बाब समोर आली आहे. देशातील प्रत्येक टोल नाक्याचे ऑडिट केल्यास प्रचंड लूट झाल्याचे लक्षात येईल.आयोध्येतील या प्रकल्पाची जमीन कवडीमोलाने खरेदी करून राम मंदिर ट्रस्टला प्रचंड दराने विकण्यात आली. या प्रकल्पाचे कंत्राटदार नसलेल्यांच्या खात्यांवर पैसे जमा करण्यात आल्याचे समोर आले आहे.ग्रामीण विकास मंत्रालयाने पेन्शन योजनेचा पैसा मोदी सरकारच्या प्रचारात खर्च केल्याचे समोर आले आहे.एचएएल : HAL वर विमान इंजिनच्या डिझाईन- उत्पादनात गंभीर त्रुटी असल्याचा आरोप, 154 कोटींचे नुकसान केल्याबद्दलही कॅगच्या अहवालातून टीका करण्यात आली आहे.

कॅगच्या अहवालामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याच्या एका प्रकल्पाची किंमत तब्बल १४ पटीहून जास्त वाढल्याचा प्रकार समोर आल्याने यात मोठा भ्रष्टचार झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच आता नितीन गडकरी यांच्या अडचणीतही मोठी वाढ झाली असून यासंदर्भात कॅग अर्थात भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत.

मोदी सरकारने द्वारका एक्स्प्रेस वेच्या बांधकामाचा खर्च 251 कोटी प्रति किमीपर्यंत वाढवला, असा दावा करण्यात आलाआहे. त्याचा नियोजित खर्च 18.2 कोटी प्रति किमी होता. केजरीवाल यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, मोदी सरकारने गेल्या 75 वर्षातील भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड तोडले. दुसरीकडे, राज्यसभा खासदार आणि आप नेते संजय सिंह यांनी सोमवारी (14 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली. कॅगच्या अहवालाचा दाखला देत संजय म्हणाले की, भारतमाला प्रकल्पांतर्गत 15 कोटी रुपये प्रति किमी खर्च करून 75,000 किमीचे रस्ते बांधण्यात आले. पण मोदी सरकारने प्रकल्पाची किंमत 25 कोटी रुपये प्रति किमीपर्यंत वाढवली. संजय सिंह म्हणाले की, मोदी सरकारने भ्रष्टाचार थांबवण्याचे दावे करू नयेत. गौतम अदानी यांच्या अनेक कंपन्या या प्रकल्पात काम करत आहेत. पंतप्रधान मोदी प्रत्येक भाषणात भ्रष्टाचार संपवल्याचे सांगतात, पण भारतमालाने मोदी सरकारला श्रीमंत केले असल्याचे कॅगच्या अहवालातून समोर आले आहे. भारतमाला प्रकल्पाची सुरुवात 31 जुलै 2015 रोजी झाली होती. याद्वारे इतर देशांच्या सीमेला लागून असलेल्या भागात आणि दूरवरच्या भागात रस्ते जोडणी करण्याचे काम केले जात आहे.

कॅगचा अहवाल आल्यानंतर आणि या अहवालात अनेक योजनांमधील घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर यावर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.  त्या उपरोधिकपणे म्हणाल्या की, “एक संस्था प्रामाणिक पंतप्रधानांना भ्रष्ट म्हणत आहे. यावर पंतप्रधानांनी कठोर कारवाई करावी. याविरोधात ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग यांना पाठवुन धडा शिकवला पाहिजे. पीएम मोदींची प्रतिमा मलिन करणाऱ्या या संस्थांना देशद्रोही ठरवावे, त्यांना तुरुंगात टाकावे.''





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com