Top Post Ad

... म्हणून इंदिरा गांधीनी मिझोरामवर बॉम्बफेक करायचा आदेश हवाईदलाला दिला

 


 भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी १९६६ साली मिझोरामवर, हवाईदलाला 'बॉम्बफेक' करायचा आदेश कुठल्या परिस्थितीत दिला होता...?

पंतप्रधानपदी बसल्यानंतर केवळ तिसऱ्याच महिन्यात मिझोरामचा उग्र प्रश्न, अक्राळविक्राळ स्वरुपात इंदिरा गांधींसमोर उभा राहीला. अगदी थोडक्यात त्याची पार्श्वभूमी ही की, आसामच्या खडतर पर्वतीय (पहाडी) प्रदेशांना एकत्र करुन एक 'स्वतंत्र राज्य' बनवण्याच्या मागणीपासून ते अगदी 'मौतम-फ्रंट'चे (मौतम-दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर १९६० साली तयार झालेली व दुष्काळग्रस्त मिझो-जनतेला शिधा पुरवण्यासाठी मरमर मेहनत केल्याने अत्यंत लोकप्रिय झालेली संघटना) प्रमुख 'लाल डेंगां'च्या नेतृत्त्वाखाली भारतातून फुटून निघण्याच्या देशविघातक रक्तरंजित संघर्षापर्यंत... अनेक घटना १९५५ नंतर झपाट्याने घडू लागल्या होत्या. याच दरम्यान, १९५९ साली मिझोराममध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळाने ('मौतम-दुष्काळ', या नावाने संबोधित) हजारो माणसं दगावली आणि तेथील परिस्थिती पूर्णतया नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. साधारण दोन वर्षांनंतर १६१-६२ मध्ये (चीनने भारतावर आक्रमण केल्याच्या सुमारास) दुष्काळी-परिस्थिती बर्‍यापैकी नियंत्रणात आल्यानंतर लाल डेंगा यांच्या, याच काळात जागृत झालेल्या राजकीय-महत्त्वाकांक्षेपोटी, याच 'मौतम-फ्रंट'चं रुपांतरण 'मिझो नॅशनल फ्रंट' (MNF) मध्ये झालं आणि त्याचंही नेतृत्त्व भारतीय-सैन्यदलात पूर्वी 'हवालदार' असलेल्या लाल डेंगाकडेच चालून आलं... 

१९६६ पासून आपला 'सैनिकी-खाक्या' दाखवत लाल डेंगाने मिझोराम लगतच्या तत्कालीन पूर्व पाकिस्तान (इंदिरा गांधींनी 'बांगला देश' स्वतंत्र करण्यापूर्वीचा) व लाल चीनच्या चिथावणीने 'स्वतंत्र मिझोराम राष्ट्र' निर्मितीसाठी भारताविरुद्ध सरळ सरळ युद्धच पुकारलं. टेलिफोन संपर्क-यंत्रणा, वहातूक-व्यवस्था उध्वस्त करण्यात आली, सरकारी-आस्थापनांवर सशस्त्र हल्ले चढवण्यात आले. एवढंच नव्हे, तर लाल डेंगाच्या राक्षसी-महत्त्वाकांक्षेला विरोध करणाऱ्या व मनाने भारतीय असलेल्या बहुसंख्य मिझोरामी जनतेचा नरसंहार सुरु झाला. हा सगळाच अविचारी व विवेकशून्य हिंसाचारी राजकीय व्यवहार लाल डेंगाने स्थापन केलेल्या 'डॅगर-ब्रिगेड'च्या अधिपत्याखाली चालू होता. लाल डेंगा, स्वतः पाकिस्तानच्या कराचीत सुरक्षित बसून हे सर्व करत होता आणि 'बिगर-मिझोरामी' जनतेला, "मिझोराम सोडा अथवा आपले प्राण सोडण्यास तयार व्हा" अशा धमक्या कराचीतून देत होता. जवळपास मिझोरामचा भारताशी पूर्ण संपर्क-संबंध तुटल्यासारखा झाला होता व तशात, मिझोराममध्ये फारचं अपुरं भारतीय सैन्य तैनात असल्याची तेव्हा अडचणीची स्थिती होती. 

अशा अत्यंत गंभीर व विस्फोटक परिस्थितीत तत्कालीन लष्करप्रमुख जनरल माणेकशा यांनी, नुकत्याच पंतप्रधानपदावर आरुढ झालेल्या इंदिरा गांधींना, मोलाचा सल्ला दिला की, मिझोरामच्या दुर्गम डोंगराळी भागामुळे लष्कर पाठवल्यास लष्कर इच्छित स्थळी पोहोचायला खूप वेळ लागेल व कारवाईत यश मिळवताना फार मोठी लष्करी-जिवितहानी होईल. त्यापेक्षा, हवाईदलाच्या विमानांनी व हेलिकॉप्टर्सनी जर आयझाॅलमधील (आताचा मिझोराम) लाल डेंगाच्या अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर व काही विशिष्ट ठिकाणी एकाचवेळेस अचूक 'बाॅम्बफेक' करुन (सर्जिकल-स्ट्राईक्स) ते पूर्ण उध्वस्त केले तर, याअगोदरच जनतेपासून तूटून अलग पडलेल्या लाल डेंगाचं पेकाट साफ मोडून पडेल... झालंही अगदी तस्सच, बहुसंख्य मिझोरामी जनतेचा भारताला असलेला पाठींबा आणि या भारतीय हवाईदलाची अतुलनीय कामगिरीच्या बळावरच मिझोराम भारतात टिकला व भारतासाठी 'स्वतंत्र मिझोराम-राष्ट्रा'च्या रुपाने तयार होऊ पहाणारी, कायमस्वरुपी फार मोठी डोकेदुखी टळली.

...जरी बाॅम्बफेकीचा 'शिमगा' संपला होता; तरी, अशांत-मिझोरामचं 'कवित्व' शिल्लक उरलं होतंच'!
यासंदर्भात, विशेष उल्लेखनीय बाब ही की, पाकिस्तानच्या कराचीतून सूत्र हालवत, भारतातून फुटून मिझोरामला स्वतंत्र-राष्ट्र घोषित करणाऱ्या 'मिझोराम नॅशनल फ्रंट'चा लाल डेंगा, यांना चीन-पाकिस्तानच्या चिथावणीने केल्या ऐतिहासिक चुकांचा प्रचंड पश्चाताप होऊन उपरती झाली होती. त्यांनी, भारतीय राज्यघटनेवर आपली परिपूर्ण निष्ठा व्यक्त केली व लंडनहून ते भारतात परतले. हवाईदलाच्या हल्ल्यात जवळपास १०० मिझोरामी नागरिक मारले गेले होते, नागरी मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं... त्याच्या खाणाखुणा मिझोरामी जनतेच्या मनावर स्वाभाविकच उमटलेल्या होत्या व युनोसारख्या आंतराष्ट्रीय-स्तरावरही त्याची प्रतिक्रिया उमटली होतीच.

...या सर्वाचा साकल्याने विचार करुन, तत्कालीन पं. स्व. राजीव गांधींनी मोठ्या मनाने, तत्कालीन काँग्रेसचे मुख्यमंत्री 'ललथन हवला' यांना राजीनामा द्यायला लावला व १९८७ मध्ये झालेल्या मिझोराम राज्य-विधानसभा निवडणुकीत 'लाल डेंगा', हे 'मिझो नॅशनल फ्रंट' (MNF) चे मुख्यमंत्री बनले (ते पुढे फार काळ जगले नाहीत) आणि तिथूनच पुढे खऱ्याअर्थाने मिझोरामची, भारताचा एक अविभाज्य घटक म्हणून, 'शांति आणि समृद्धी'कडे खरी वाटचाल सुरु झाली... ती एवढी की, साक्षरता आणि सुशिक्षितता याबाबत भारतात नंबर एक, म्हणून गणल्या जाणाऱ्या केरळच्याही मिझोराम दोन पावलं आज पुढे आहे!

 ----------------------

आपल्या जातधर्म-विद्वेषी सडक्या मेंदूचा, आर्थिक-राजकीय लाभासाठी घाऊक 'सेल' (Sale) लावून बसलेल्या, नीचोत्तम 'अमित मालवीय' याच्या तालमीत... कुणीही व्यक्ति 'संसर्गजन्य' होऊन जेव्हा, रोगट-सडलेले विचार घेऊन बाहेर पडते; तेव्हा, ती व्यक्ती, कुठल्याही मोठ्या पदावर असो वा नसो... सध्याच्या, अशांत-दंगलग्रस्त मणिपूरच्या पार्श्वभूमीवर, मणिपूरमधल्या या दुष्कर्मांची अंडीपिल्ली झाकण्यासाठीच, तत्कालीन परिस्थितीचा काहीही संदर्भ न देतात, मिझोरामवरील तत्कालीन बाॅम्बफेकीवर अत्यंत बेजबाबदारपणे 'गरळ' ओकत असते!*

 इंदिरा गांधींनी वेळीच 'लष्करी-कारवाई' करुन मिझोराम भारताचा अविभाज्य भाग म्हणून निग्रहपूर्वक नुसताच टिकवून धरला असं नव्हे; तर, त्याला पूर्णतया भारतीय-प्रवाहात आणला... तो खरा 'सर्जिकल-स्ट्राईक' होता... ती कुठलीही 'फिक्स्ड् मॅच' नव्हती अथवा त्यात, २०१९च्या लोकसभा-निवडणुका जिंकण्यासाठी (काश्मीरचे भूतपूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या कथनानुसार) तब्बल ४० जवानांचं रक्त तर सोडाच, उलटपक्षी एकाही जवानाचं रक्त सांडलेलं नव्हतं! इंदिरा गांधींनी १९७५ साली उत्तम राजनैतिक भूमिका बजावत 'सिक्कीम' भारताशी जोडून दाखवला (जनता, मिझोरामची असो वा सिक्कीमची, काँग्रेसच्या राजवटीत त्यांना भारतात रहाण्यात 'आश्वस्त' वाटत होतं)... तुम्ही, निदान आता कुठल्याही प्रकारे (राजनैतिक वा लष्करी कारवाई करुन) पाकव्याप्त-काश्मीर ताब्यात घेऊन दाखवा, मगच फुशारक्या मारा!  इंदिरा गांधींनी 'बांगला देशा'ची निर्मिती घडवून पाकिस्तानचे दोन तुकडे करुन दाखवले व पाकिस्तानला कायमचा 'पंगू' बनवला! तुम्ही तर, चीनने आपले लचके तोडले, तरी वल्गना करण्यापलिकडे काहीही करत नाही आहात.

...म्हणूनच, इंदिरा गांधी, या भारतासाठी चंडिकेसारख्या पराक्रमी पंतप्रधान ठरल्या... भूतपूर्व पं. अटल बिहारी तर, इंदिरा गांधींना संसदेत जाहीररित्या 'दुर्गेचा अवतार' म्हणाले होते, हे एवढ्या लवकर विसरलात? ...१९६६ च्या मिझोरामवरील, 'आखरी रास्ता' म्हणून, योग्य समयी पोलादी-निर्धाराने केलेल्या 'सर्जिकल-बाॅम्बफेकी'ला जेव्हा, तुम्ही कलुषित मनाने आणि 'मालवीय' वळणाच्या, जातधर्म-विद्वेषी चिखलातच नव्हे; तर, थेट 'मालवीय-विष्ठे'त मळलेल्या पूर्वग्रहदूषित सडक्या अंतःकरणाने तुम्ही दूषणं देता... तेव्हा, ही भाजपाई लोकं, इंदिरा गांधींना 'दुर्गा' म्हणणार्‍या (त्यांचं त्यांनाच निरतिशय आदरणीय असलेल्या) स्व. अटल बिहारींच्या व्यक्तित्वाचा घनघोर अपमान करत असतात...* पण, या सडक्या मेंदूच्या अनपढ-गँवार लोकांकडे एवढा विवेक-विचार कुठून असणार?

...तेव्हा आता, वाचकांनीच इंदिरा गांधींच्या त्या मिझोरामवरील अतिरेकी अड्ड्यांवर व इतर विशिष्ट ठिकाणांवर बाॅम्बफेक करण्याचा निर्णय योग्य होता किंवा कसा, याचा निवाडा आपल्या विवेकबुद्धीने निवाडा करावा, हे उत्तम... धन्यवाद!


राजन राजे  (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)


धर्मराज्य पक्ष-. P  R.O. +91 96191 89105

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com