Top Post Ad

ये आझादी झुठी है... १६ ऑगस्ट रोजी मुंबईत बहुजन आक्रोश मोर्चा'


 १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि १६ ऑगस्टला ये आझादी झुठी है, देश की जनता भूखी है म्हणत या स्वातंत्र्यांविरोधात अण्णा भाऊ साठे यांनी मोर्चा काढला होता.

आरएसएसच्या भाजप प्रणित मोदी सरकारच्या विरोधात येत्या १६ ऑगस्ट  रोजी आझाद मैदान, मुंबई येथे ‘ये आजादी झुठी है। देश की जनता भुखी है!’ या कार्यक्रमांतर्गंत बहुजन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती दिली. टेक्सास गायकवाड यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना दिली. सुमारे २०० ते २५० कार्यकर्तेच्या उपस्थितीत या मोर्चाचे उद्घाटन छत्रपती शिवरायांचे वंशज व दलित पँथर महाराष्ट्राचे अध्यक्ष फत्तेसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ई.व्ही. एम. मशिनचे प्रतिकात्मक रितीने  फोडुन करण्यात येणार आहे  या देशातील जनतेस भाजप सरकारने भिकेस लावले आहे. याच्या निषेधार्थ, केंद्र सरकारचा व महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध करण्यासाठी या आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या संदर्भात विविध मागण्यांचे निवेदन राज्यातील विविध संघटनेच्यावतीने आपापल्या शहर व जिल्ह्यात भाजप सरकारच्या धोरणाविरूध्द महामहीम ना. दौपदी मुर्मू, राष्ट्रपती भारत सरकार, मा. न्यायमूर्ती चंद्रचूड, मुख्य न्यायाधीश सुप्रिम कोर्ट, नवी दिल्ली, मा. निवडणूक आयुक्त, निर्वाचन भवन, नवी दिल्ली यांना देण्यात येणार आहे. या आक्रोश मोर्चात भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, दलित पँथरच्या वतीने प्रा. अपरान्त अरूण कांबळे, बुध्दविहार कृती समिती, देहू रोडच्या वतीने अशोक गायकवाड, भारतीय बौध्द महासभेच्या वतीने भाऊसाहेब बनसोडे, बिरसामुंडा आदिवासी संघटनेचे राजाभाऊ सरनोबत, नागसेन माला, संविधान बचाओ आंदोलनाचे विशाल हिवाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

साहित्यसूर्य अण्णाभाऊ साठे यांनी दि. १६ ऑगस्ट १९४७ रोजी आझाद मैदान मुंबई येथे या व्यवस्थेच्या विरोधात स्वातंत्र्यदिनानिमित्त आक्रोश केला होता. या आक्रोशाची पुनरावृत्ती करीत, बहुजनांना बरबाद करणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात हा भारतीय रक्षक आघाडीचा मोर्चा होत आहे. आक्रोश मोर्चा एस. सी., एस.टी., ओबीसी, बौध्द, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि लिंगायत बांधवांच्या हितरक्षणासाठी व त्यांच्या न्याय मागणीसाठी काढण्यात येणार आहे. भाजपच्या मोदी सरकारच्या कार्यकाळात खाजगीकरण, आरक्षणावर आघात, अल्पसंख्यांक व दलित आदिवासी जनतेवर अन्याय, संविधान बदलण्याची भाषा, भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असताना हिंदू राष्ट्राची निर्मिती, महिलेवर होणारे अन्याय, नग्न धिंड, मणीपूरची घटना, पुलवामा हत्याकांड असे विविध प्रश्न भाजप सरकारच्या काळात निर्माण झाले असून हा देश सध्या अशांत व तणावपूर्ण वातावरणात आहे. 

हे सरकार दंगली घडवण्याचे काम करत आहे  हिंदू जनमोर्चा आता  हे नाटक आहे . यांना सैनिक म्हणून पुढे आणलेले आहे.  ईडी सीबीआयला या सरकारने आपल्या हातात ठेवले आहे २०१९ पासून, बहुजनांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. या सरकारने सर्व शासकीय उद्योग विकले आहेत हा फार मोठा गुन्हा आहे हे सर्व उद्योगधंदे भारत सरकारने आपल्या हाती ठेवले पाहिजेत. एसटी एसटी ओबीसी यांच्यावर अन्याय झाला आहे   मणिपूर मध्ये महिलांवर अन्याय झाला आहे या घटनेमुळे देशाची जागतिक पातळीवर नाचक्की होत आहे. मणिपूर सरकार बरखास्त  करण्यात यावे. आरएसएस म्हणतो हिंदुराष्ट्र झाले पाहिजे या सर्वावरती गुन्हा दाखल झाले पाहिजे. हिंदूंच्या  नावावर मत मागत आहेत त्या उमेदवाराला त्याची उमेदवारी रद्द करण्यात यावी.  तसेच कोणत्याही भारतीय कायद्याच्या चौकटीत नसणारी आरएसएसवर बंदी आणावी व या संघटनेची संपत्ती जप्त करावी. सरकारचे प्राण ई.व्ही. एम. मशिनमध्ये आहे. महाराष्ट्रात  जिल्ह्य जिल्ह्यात मध्ये गावात ई.व्ही. एम. मशिनचे दहन करून तसेच त्यांचे फोटो काढून राष्ट्रपतींना पाठवून देण्याचे  काम कार्यकर्त्यांनी करावे . असे आवाहन टेक्सास गायकवाड यांनी केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com