Top Post Ad

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामधील भोंगळ कारभार


 केवळ वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याने शस्त्रक्रिया रखडल्याचे प्रकरण ताजे असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाच जणांना आपले जीव गमवावे लागले. रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रूग्णांचा  मृत्यू झाल्याचा आरोप केला. दररोज शेकडो रुग्णांची वर्दळ असलेल्या ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात अनागोंदी माजली आहे. कळवा रुग्णालयात रोज ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा आदी भागांसह जिल्ह्याच्या विविध भागांतून बाह्यरुग्ण विभागात ५०० च्या आसपास रुग्ण येतात. परंतु, केसपेपर काढण्यापासून ते डॉक्टरांकडे क्रमांक लागेपर्यंत एकेका रूग्णाला चार ते पाच तास लागतात. त्यातही अनेकदा डॉक्टरही नसतात. त्यामुळे त्यांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. बेड नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल करून घेतले जात नाही. परिणामी दूरवरून आलेल्या रुग्णांवर उपचार  होतच नाहीत. 

 आता पुन्हा एकदा या प्रकरणामुळे रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविंद्र सहाने ( वय २२) , सुग्रीव पाल ( वय ३०), आणि भाऊराव सुराडकर (वय ४५ ) या तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. त्याचे नाव समजू शकलेले नाही.

ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वरदान ठरत असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आता मृत्यूचा आगार बनला आहे. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारच मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईककडून केली जात आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचं असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे १००, आयसीयू बेड २०० तर ऑक्सिजन बेड २०० मागितले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाइकानी केला आहे. या तीनही केसमध्ये उपचार मिळाले नसल्याने आमचा रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर कळवा रुग्णालयाची रुग्ण ऍडमिट करून घेण्याची क्षमता संपली असून आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

गुरूवारी येथे उपचारासाठी आलेल्या रूग्णांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांना फोनवरूनही माहिती दिली. ही माहिती मिळताच डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी तडक छत्रपती शिवाजीमहाराज रूग्णालय गाठून पाहणी केली.  त्यावेळेस रूग्णालयात पाच रूग्णांचा मृत्यू झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यातच एकीकडे बेड उपलब्ध नसल्याचे कारण सांगून रूग्णांना दाखल केले जात नसतानाच दोन वाजता दगावलेल्यांची मृतदेहं आयसीयूमध्येच ठेवली असल्याचे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या निदर्शनास आले.  रुग्णांच्या नातेवाईकांनी यावेळी रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रूग्णांचा  मृत्यू झाल्याचा आरोप केला. यावर प्रशासन ठोस उत्तर न देऊ शकल्याने : पूर्वीचा जितेंद्र आव्हाड आसता तर, कानशील लाल केले असते" , अशा शब्दात डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.


ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्यसेवेचा बोजवारा!

'धर्मराज्य पक्षा'चे ठामपा आयुक्तांना खरमरीत पत्र...

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असल्याबाबतचे वृत्त, वर्तमानपत्रांत प्रकाशित झाल्यानंतर, रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल झालेल्या रुग्णांना सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे, बातमीच्या माध्यमातून उघड झाले आहे. ही बाब अत्यंत धक्कादायक आणि क्लेशदायक तसेच, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहरासाठी अत्यंत लाजिरवाणी अशी असल्याची टीका 'धर्मराज पक्षा'च्या वतीने करण्यात आली असून, त्याबाबतचे पत्र ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना पाठविण्यात आले आहे. 

वर्ष-१९९२ पासून; म्हणजे, रुग्णालयाच्या निर्मितीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे, वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. या ठिकाणी देण्यात येणारी आरोग्यसेवा ही चिंतेची बाब असतानाच, रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या विविध सेवा, रुग्णांना देण्यात येणारी औषधं, रुग्णालयाचा अवाढव्य विस्तार आणि त्यासाठी पाणी-वीज व मनुष्यबळावर येणारा खर्च पाहता, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे, ठाणे महानगरपालिका प्रशासनासाठी पांढरा हत्ती पोसण्यासारखेच आहे, असे पक्षाचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे. दरम्यान, शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना, तब्बल सहा-सहा महिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे भीषण वास्तव, प्रसिद्धीमाध्यमांद्वारे उघड झाले असून, शस्त्रक्रियेसाठी सहा महिने प्रतीक्षा करुन, आपल्या जीविताशी खेळण्यापेक्षा, नाईलाजास्तव येथील रुग्णांना, खासगी रुग्णालयांत धाव घ्यावी लागत आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना, कमीतकमी वेळेत उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी विविध उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. निवासी डॉक्टरांची संख्या वाढविणे, संगणकीकृत व्यवस्था मार्गी लावणे, याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. रुग्णालयाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊनदेखील, आरोग्यसेवेत सुधारणा होण्याऐवजी, ती अधिकाधिक बिघडत जाऊन, पुरता बोजवारा उडाला असल्याने, याप्रकरणी आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी, 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी, आपल्या पत्रातून केली आहे.     

ठाणे शहराच्या मध्यभागी असलेल्या विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) नवीन इमारतींचे बांधकाम सुरु करण्यात आल्याने, तेथील रुग्णांचा संपूर्ण भार हा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर पडत आहे. अशा परिस्थितीत, रुग्णालय प्रशासनाने, अतिरिक्त सोयी-सुविधांनी सुसज्ज असणे क्रमप्राप्त असताना, उलट छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील १४ पैकी ४ अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरासह, ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातून दररोज १००० ते १२०० रुग्ण, उपचार घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात येत असतात. त्यातील ३० ते ५० रुग्ण, दररोज उपचारार्थ रुग्णालयात दाखल (admit) होत असतात. मात्र, त्यांच्यावर योग्य ते उपचार होत नसल्याने, रुग्णालयातील आरोग्यसेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे अधोरेखित झालेले आहे. 

याच पार्श्वभूमीवर, 'धर्मराज्य पक्षा'चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या प्रशासकीय विभागाशी दि. १ ऑगस्ट-२०२३ रोजी, दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता, तिथे उपस्थित असलेल्या श्री. माळगांवकर यांनी, सविस्तर माहिती देण्यास असमर्थता दर्शवून, रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश हेच याबाबत अधिक खुलासा करतील असे सांगून, तुमच्याशी संपर्क साधला जाईल, असे सांगितले; मात्र, त्यानंतर अद्यापपर्यंत कोणीही संपर्क साधलेला नाही, याचीदेखील आठवण आयुक्तना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे. दरम्यान, ही बाब अत्यंत गंभीर असून, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आरोग्यसेवा सुस्थितीत आणण्यासोबतच, शस्त्रक्रियेसाठी कराव्या लागणाऱ्या सहा महिन्यांचा प्रदीर्घ कालावधी, तात्काळ २४ तासांवर आणावा आणि रुग्णालयात अधिक सुसज्ज आणि अद्ययावत यंत्रणा सुरु करावी, अशी आग्रही मागणी 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात शेवटी केली आहे. 

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रविंद्र सहाने ( वय २२) , सुग्रीव पाल ( वय ३०), आणि भाऊराव सुराडकर (वय ४५ ) या तिघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. त्याचे नाव समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड रुग्णालयांत पोहचले. आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com