Top Post Ad

सर्वसामान्य वर्गाला बरबाद करणारी... कंत्राटी-पद्धती


   तळागाळातील वर्गाला बरबाद करणारी... कंत्राटी-पद्धती'ची 'अवदसा'; फक्त, काॅर्पोरेटीय-क्षेत्रातच वापरली जाते, असं नव्हे; तर, आता जातधर्मीय-दंगलींचीही 'कंत्राटं' दिली-घेतली जातात... मणिपूरपासून, महाराष्ट्र (कोल्हापूर), हरियाणापर्यंत (नूँह, फरीदाबाद, गुरुग्राम, मेवात) संपूर्ण देशभर!

...त्याची उपकंत्राटं (Sub-Contracts) देखील दिली जातात ती, आदिवासी-ओबीसी जमातींच्या हातात शस्त्रं देऊन, म्हणजेच, त्यांचं 'क्षत्रियीकरण' करुन. पण, या *'मंडल'वाल्या (मंडल-आयोग) वर्गाचं गरजेनुसार एकवेळ 'क्षत्रियीकरण' करत त्यांना 'मांडलिक' बनवलं जातं... पण, त्यांचं 'कमंडलीकरण' करुन वर्णवर्चस्ववादी-शोषकवर्गाच्या बरोबरीच्या पंक्तिला मात्र,* त्यांना कधिच बसवलं जातं नाही!

'एकलव्या'ला 'शूद्र' म्हणून धनुर्विद्या शिकवण्यास द्रोणाचार्य महाभारतात सपशेल नकार देतात... मात्र, *धनुर्विद्येत स्वतःहून पारंगत झालेल्या एकलव्याला गरजेपोटी, कुरुक्षेत्रावरील युद्धात कौरव सैन्यात आग्रहपूर्वक सामावून घेतलं जातं; पण, 'उच्चवर्णीय आणि एकलव्य' यातला 'पंक्तिभेद', महाभारतात एकलव्याच्या मृत्यूपर्यंत कायमच अस्तित्वात रहातो...* अगदी तस्सचं! 

...वर्णवर्चस्ववादी-शोषकवर्गाची 'गुलामी' स्विकारण्याची एकलव्याची, जी क्षुद्र मानसिकता ('गुरुदक्षिणा' म्हणून द्रोणाचार्यांनी क्रूरपणे व अन्यायकारकरित्या एकलव्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून घेतलेला असतानाही) महाभारताच्या पानापानावर दिसून येते... त्याचीच, 'री' ओढताना मराठा, ओबीसी आदिवासी व मागासवर्गीय समाज, आज आधुनिक भारतातही दिसून येतो, या दळभद्री-क्षुद्र वृत्तीला आणि दुर्दैवाला काय म्हणावं?

*'क्षत्रियीकरण' झालेल्या, या 'मंडल'वाल्या नव-शस्त्रधारी मंडळींना, 'कमंडल'धारी मंडळींच्या पायाशी पूर्ण निष्ठा वाहून, 'नागपुरी कमंडल-विचारधारे'ची 'गुलामी', ही पत्करावीच लागते!* त्याशिवाय, त्यांना इतर कुठलाही पर्याय उपलब्ध नसतोच. भ्रष्टाचारातून कमावलेली अपसंपदा टिकवून धरण्यासाठी व केल्या पापकर्मांमुळे होणाऱ्या संभाव्य तुरुंगवासातून सुटका करवून घेण्यासाठी; तसेच, 'भांडवली-व्यवस्थे'च्या आशिर्वादाने सहजी उपलब्ध होऊ शकणाऱ्या सत्ता-संपत्तीच्या अनावर मोहापायी... आपल्याच हाडामांसाच्या, आपल्याच रक्ताच्या बहुजन समाजाचा 'घात' करायला, हा 'मंडल'वाला नव-शस्त्रधारीवर्ग एका पायावर तयार होताना दिसतो, या अधम स्वार्थाला व नीचतेला काय म्हणावं? 

*बहुजन समाजातील मूठभर राजकीयदृष्ट्या 'स्मार्ट', 'बाहुबली' (म्हणजेच संधिसाधू, बदमाष, गुंडपुंड)* मंडळींना हाताशी धरुन, पडद्यामागून 'रक्तपिपासू-शोषक व्यवस्था' (भांडवलदार + राजकारणी + सरकारी अधिकारी) चालवणारी हीच मूठभर संख्येची मंडळी, देशाच्या कारभाराची सगळी सूत्रं हलवत असतात. पहिल्या फळीच्या नेत्यांच्या खालोखाल, विविध राजकीय-पदांच्या वाटलेल्या खिरापतीने सुखावलेले (False-Trappings Of Power) अनेक

बहुजन कार्यकर्ते, पदाधिकारीही असतात. ही राजकारणातली दुसरीतिसरी *'फळी'* म्हणजे, व्यवस्थेचे पक्के ठरलेले *'बळी'! अगदी, *कंपन्या-काॅर्पोरेट क्षेत्रात जसं घडत असतं; अगदी तसंच, वरपासून खालपर्यंत, अशी 'जी हुजूर' म्हणत, जराही विचार न करता वरच्यांचे सगळे आदेश निमुटपणे पाळण्यात धन्यता मानणारी,* कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांची कोडगी-नीतिमत्ताशून्य बहुजनजमात, याच भांडवली-व्यवस्थेची भक्कम 'आधारशिला' बनलेली असते.

तिचं परिस्थिती, *थोडा तपशीलातला बदल वगळता, मुस्लिमांमध्येही मौजूद आहेच... फरक इतकाच की, 'नागपूर'ची जागा 'हैद्राबाद' घेतं... मंदिरं-देवळात पौरोहित्य करणाऱ्या जमातीची जागा, मदरसे-मस्जिदीतले मुल्ला-मौलवी-इमाम घेतात, बस्स्!*

*'मंडल-आयोग व सच्चर-आयोग',* या दोन आयोगांकडून, या दोन्ही हिंदू-मुस्लिम जातधर्मीय बहुजनवर्गांची हलाखीची, लाचारीची परिस्थिती अतिशय केविलवाण्यारितीने उघडी पडूनही, त्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत?

_"मुकी बिचारी कुणीही हाका, अशी मेढरं बनू नका,_

_जाते घडी अपुली साधा, काय करा ते आता करा"..._ 

असं कितीही कोणी तळमळून सांगितलं; तरीही, तळागाळातील गोरगरीब हिंदू-मुस्लिमांच्या दंगलप्रवण हिणकस मानसिकतेत अजून बदल घडायला तयार नाही... त्यामुळेच, देशातली सत्ताधुंद राजकीय मंडळी, निवडणुका जिंकण्यासाठी व आपल्या भांडवलदार-मित्रांच्या फुटेस्तोवर फुगलेल्या ढेर्‍या, अजून ठासून भरण्यासाठी... याच बहुजन हिंदू-मुस्लिमांची माथी भडकावून कधिही हुकमी दंगली पेटवू शकतात, ही वस्तुस्थिती आहे... 

*नागपूर, हवं तेव्हा-हवं तिथे, देशात हुकमी 'मणिपूर-कोल्हापूर' घडवू शकतं...हैद्राबाद, देशात नूँह-मेवात-फरीदाबाद घडवू शकतं... हे अनुभवल्यावर, या भांडवली-व्यवस्थेच्या नीच-अमानुष 'नागपुरी-हैद्राबादी'  डावपेचांना उठसूठ सहजी 'बळी' पडणारी, ही हिंदू-मुस्लिम बहुजन मंडळी नक्की माणसं आहेत की, निर्बुद्ध जनावरं, हा प्रश्न पडल्याखेरीज रहात नाही...!!!*

..राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)*_

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com