*गौतम अदानी कुणाचा ?*
NDTV या गौतम अदानी याच्या मालकीच्या TV चॅनल वर *जाणते राजे शरद पवार यांची मुलाखत झाली ती पवार व अदानी यांची गरजच होती*. नाहीतर एनडीटीव्ही विकत घेण्याचा फायदा काय गौतम अदानीची बाजू सावरण्यासाठी शरद पवार यांची निवड अचूक होती.
अदानी प्रसिद्धी व वादाच्या भोवर्यात येण्यापूर्वी कितीतरी दिवस अगोदर ते पवार यांच्या छत्र छायेत आले होते.
26th नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात गौतम अदानी सह कुटुंब हॉटेल ताज मध्ये अडकले होते अदानी कुटुंबाला सहीसलामत बाहेर काढण्याची किमया तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील यांच्या करवी शरद पवारांची हे सत्य आहे.
शरद पवारांचे उजवे हात प्रफुल्ल पटेल यांच्या गोंदिया मतदारसंघात अदानी यांना कोळसा खाणी देण्याचा आग्रह पवार साहेबांचा होता, व त्यासाठी तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यासोबत पवार यांना दोन हात करावे लागले होते ,पवार यानीच गौतम अदानी यांना कोळसा पाठोपाठ वीज निर्मितीच्या उद्योगात उतरण्याची सुचना केली होती, आज अदानी वीज निर्मितीच्या क्षेत्रात अव्वल नाव आहे. मुंबई शहराला व इंडियन रेल्वेला अदानी वीज पुरवित आहे .
एअर इंडिया व इंडियन एअर लाइनच्या महाराजांना भिकारी बनविण्याचे कारस्थान प्रफुल्ल पटेल उड्डाणमंत्री असतानाच सुरू झाले होते. ह्याच पटेल महाशयांनी Air India व Indian Airlines या दोन कंपन्यांचे विलिनीकरण केले, कारण पुढे खाजगी करण करताना त्रास नको, ह्याच पटेलांनी आखाती देशात जाणारे फायद्याचे रूट जेट व मल्ल्या सारख्या खाजगी कंपनीला दिले. कारण Air India तोट्यात जावी पटेल यांनी पुढे कमाल केली, त्यांनी जितेंद्र आव्हाड याला हाताशी धरून पायलट वैमानिकाचा संप घडवून आणला. डबघाईला आलेला उद्योग Airport JVK ya खाजगी कंपनीला विकण्यात आला ही JVK कंपनी तोट्यात गेल्यावर दिल्ली मुंबई सारखी महत्वाची विमानतळ अदानी यांनी JVK कडून घेतली आहे .
एकेकाळी किरकोळ विक्रेता असलेले अदानी हिरे विक्रीच्या धंद्यात उतरले, त्यात त्यांनी बख्खळ कमाई केली, त्यानंतर त्यांनी पायाभूत सेवा क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. साधारणपणे तीस वर्षापुर्वी गुजराथ राज्याचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल असताना चिमणभाई व अदानी यांचे मैत्री संबंध होते. या मैत्री स्नेहामुळे चिमण भाई पटेल यांनी पन्नास हजार एकर जमिनीवर मुद्रा बंदराचे पुनः बांधणीचे विकसित करण्याचा ठेका गौतम अदानी यास दिला ,त्यापुर्वी अदानी यांना बंदर विकासाचा काडीमात्र अनुभव नव्हता, असे असताना देखील अदानी यांनी मुद्रा या कृञिम बंदराच्या विकास केला, ज्याचा आज जगात बोलबाला आहे अशा प्रकारे कसलाही अनुभव नसलेल्या अदानी यांना पहिला ठेका कॉन्ग्रेस पक्षाच्या चिमण भाई पटेल यांनी दिला.
अदानी व पवार यांचे संबंध देखील जिव्हाळ्याचे राहिले आहेत,
2014 च्या निवडणूक काळात पवार यांचे गौतम अदानी याच्या माऊंट अबुधाबी येथील निवासस्थानीचे वास्तव्य गाजले होते.
दोन वर्षा पुर्वी पवार व पटेल रात्रौ एक वाजता खाजगी विमानाने अहमदाबाद येथील अदानी यांच्या फॉर्म हाऊस वर अमित शहा यांची गुप्त भेट झाली होती , *आम्हाला वाटले असेल संजय राऊत अनिल देशमुख यांच्या सुटकेसाठी......*
16 जून 2022 रोजी गौतम अदानी पत्नीसह दोन दिवसांच्या मुक्कामी बारामती येथे गेले होते ,रोहित पवार यांनी *पवार अदानी यांच्या गाडीचे ड्रायव्हिंग केले होते ,अजित पवार दोन दिवसात फिरकले नाहीत.*
गम्मत म्हणा किंवा योगायोग असेल 16 व 17 जून अदानी बारामती येथे त्याच वेळी 20 जून 2022 रोजी *महाविकास आघाडी उद्भव ठाकरे सरकार गडगडले ........*
आता पहिल्या मुद्द्याकडे वळूया पवारांची NDTV मुलाखत
jPC संसदीय संयुक्त समितीच्या मागणीसाठी कॉन्ग्रेस व विरोधी पक्षांनी लोकसभा व राज्यसभेचे कामकाज महिनाभर चालू दिले नाही ,त्याच *JPC ला विरोध करत पवार यांनी न्यायालयीन समितीच्या मागणीला जोर दिला आहे.* शिवाय hindenbarg व त्याचा अहवाल याला जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही देशाने उद्योगपतीच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे ,
*भारत जोडा यात्रेनंतर ताजे टवटवीत होवून आलेल्या राहुल गांधी यांनी मोदी यांना घेरण्या साठी अदानी चे ब्रम्ह अस्त्र उभारले होते* पवार यांनी अडाणी च्या फुग्यातील हवा काढून घेतली, जे राहुल गांधी मोदी सरकार हे अदानी अंबानी यांचे सरकार असा टोमणा मारीत होते .
पवार यांनी *अदानी कुणाचे असा सवाल उपस्थित करून राहुल गांधी यांची बोलती बंद केली आहे.......*
तानसेन ननावरे
जेष्ठ रिपब्लिकन नेते
मो.8169218015
0 टिप्पण्या