Top Post Ad

नेमेचि येतो पावसाळा आणि खड्ड्यात घालतो ठाणेकरांना

 


  ठाण्यातील विविध महत्वाच्या रस्त्यांवर दरवर्षी पावसाळ्यात पडणारे खड्डे व यामुळेच होत असलेली वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. पावसाळ्यापूर्वी मोठ-मोठ्या घोषणा देणारे पालिका प्रशासन आणि खड्ड्यामुळे ठाण्यातील नागरिकांचे विस्कळीत  होणारे जनजीवन या विरोधात कॉंग्रेसने  ठामपा मुख्यालयासमोर तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. शहराध्यक्ष अँड.विक्रांत चव्हाण याच्या नेतृत्वाखाली प्रदेश सचिव व ठाणे प्रभारी संतोष किणे, कॉग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, महिला अध्यक्षा वैशाली भोसले, प्रदेश सदस्य जे.बी.यादव, शकीला शेख, महेद्र म्हात्रे, निशिकांत कोळी, रमेश ईदिसे, प्रवक्ते राहुल पिंगळे, रविंद्र कोळी, मंजूर खत्री, स्वप्नील कोळी, शिरीष घरत, चंद्रकांत मोहीते, प्रकाश मांडवकर आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. 

ठाण्यातील रस्ते कामात १६ टक्के दलाली घेतली जात असून यामुळे कामाचा दर्जा कसा मिळणार,  महापालिका प्रशासन म्हणते की सर्व चांगले आहे. पण, आयुक्तांनी माझ्याबरोबर फिरावे, मी त्यांना ठीकठीकाणी नेऊन परिस्थिती दाखवेल, असे आव्हान  विक्रांत चव्हाण यांनी यावेळी दिले.  यंदाच्या पावसाळ्यात ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने अनेक रस्त्यांचे नुतनीकरण केले. याशिवाय, शहरातून जाणारे महामार्गांची दुरुस्तीची कामे पावसाळ्यापुर्वी करण्यात आली. रस्ते नुतनीकरणामुळे शहरातील अंतर्गत रस्ते सुस्थितीत असले तरी महामार्गांवर मात्र खड्डे पडले आहेत. पाऊस, खड्डे आणि त्यात रस्त्यावर साचणारे पाणी यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. 

त्याचबरोबर शहरातील अनेक अरुंद रस्त्यांवर दुभाजक बसविण्यात आले असून यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. पावसाळ्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ठाण्यातील रस्त्यावरील खड्ड्याबाबत पाहणी दौरा झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात फोटोसेशन करण्यात आले होते. जागोजागी खड्डेमुक्त ठाणे अशा प्रकारचे फलक लावण्यात आले होते. परंतु पहिल्याच पावसात रस्त्यांवरील खड्ड्याबाबत खरे चित्र समोर आले आहे.  ठाण्यातील प्रत्येक रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले आहेत, जिथे वर्षानुवर्ष पावसाळ्यात पाणी तुंबत होते, तिथे आजही तिच अवस्था आहे. कोणत्याही प्रकारच्या नियोजनाविनाच कामे करण्यात आल्यामुळे हि परिस्थिती ओढवली आहे. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहीती देण्यात येते. मुख्यमंत्र्यानी स्वतःच्या वागळे इस्टेट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली तरी त्यांना खरी परिस्थिती लक्षात येईल, असेही विक्रांत चव्हाण यावेळी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com