Top Post Ad

हिंसेची वाळवी मणिपूर....


  मणिपूर गेल्या दोन-तीन महिन्यांपासून जळत आहे दोन जातीमध्ये तेढ निर्माण झालेला आहे, माणसे मारले जात आहे हे पुरेसे नसतानाही याहूनही लाजिरवाणी घटना समोर येत आहे, सोशल मीडियावर मणिपूर मधील या हाद्रवणाऱ्या घटनेचा व्हिडिओ बाहेर आला आहे. 

नेमके काय घडले! 
     या लाजिरवाण्या घटनेची तक्रार १८ मे २०२३ रोजी करण्यात आले होते. एफ.आय.आर नुसार पीडितांनी सांगितले की ४ मे २०२३ रोजी दुपारच्या सुमारास अंदाजे हजार एक लोकांच्या जमावाने थोबल मधील गावावर हल्ला केला. हल्ला करणारे मैतेई जातीचे होते. त्याचबरोबर यांनी घरात घुसून घरातील पैसे दागिनेसह किंमती वस्तू लुटल्या गेल्या आणि नंतर त्यांनी गावावर आगीचा गोळा टाकून, गाव जाळून टाकले. हल्ला झाल्याचे समजताच, तीन महिला त्यांचे वडील आणि भावासोबत जंगलाकडे पळाले पोलिसांच्या टीमने त्यांना वाचविले, तेवढ्यात जमावाने पोलिसांना थांबविले आणि त्यांच्याकडून त्यामहिला आणि त्यांच्या वडील व भावाला हिसकावून घेतले पोलीस स्टेशन तेथून जवळपास दोन किलोमीटरच्या अंतरावरती होते. पोलिसांच्या समोर जमावाने वडिलांची हत्या केली यानंतर तिथेच महिलांना कपडे काढण्यास मजबूर केले एक २१ वर्षे ची तरुणी होती, दुसरी ४२ वर्षाची होती आणि तिसरी ५२ वर्षाची बाई होती महिलांना त्या निर्वस्त्र मध्ये पुढे चालण्यासाठी दबाव आणला गेला, त्यावेळी त्यांच्यासोबत छेडछाड करण्यात येत होती २१ वर्षाच्या तरुणीवर जमावाने सामूहिक बलात्कार केला, तिच्या भावाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही ठार मारले. हा प्रकार घडत असताना दोन महिलांना त्यांच्या काही ओळखीच्या लोकांनी त्यांना घेऊन गेले...!

     प्रश्न असा निर्माण होतो की नेमके आपण कुठे चाललो आहोत.?  आज भारतातील मणिपूर राज्यामध्ये (आरएसएस प्रणित भाजपाचे सरकार आहे) गेल्या ८० दिवसापासून हिंसाचार चालू आहे या हिंसाचारापासून कोणाला काय मिळेल हे प्रश्नचिन्हच आहे..? परंतु देशांमध्ये ज्यांचं सरकार आहे ते सरकार पूर्णतः अपयशी ठरलेले आहे... ८० दिवस उलटून सुद्धा देशाचे गृहमंत्री यांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली दिसून येत नाही... त्याचबरोबर भारताचे प्रधानमंत्री इज्जतीला कमीपणा निर्माण होईल त्यामुळे ते मीडियासमोर येत नाही.

     ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे...या घटनेतून एकच गोष्ट निष्पन्न होते की देशाचे वातावरण पूर्णपणे दूषित झालेला आहे आणि या दूषित वातावरणामध्ये भारतीय नागरिक कसे राहू शकतात?      आपल्याला ह्या दूषित वातावरणाला संपवणे गरजेचे बनलेले आहे...
आपण व्यवस्थेच्या विरोधात बोलत नाही? 
आपण हिंसेच्या विरोधात बोलत नाही?
आपण अन्याय अत्याचाराला विरोधात बोलत नाही?
आपण स्त्रियांवर झालेल्या शारीरिक मानसिक अत्याचारा विरोधात बोलत नाही?
त्यामुळे तथाकथित राजकीय नेत्यांचे फावले जात आहे.
हिंसेला जात नसते, धर्म नसतो,
हिंसेला माणुसकी अवयव नसतो तर माणुसकीचे मारेकरीच असतात.
माझ्या देशातील सर्व बंधू-भगिनींना मातांना माझी नम्र विनंती आहे की या घटनेचा जाहीर निषेध करावा कारण एखाद्या महिलेचे कपडे काढून तिला विवस्त्र करून तिच्यावर शारीरिक मानसिक अत्याचार करणे हे या भारतीय संस्कृती मध्ये अशोभनीय आहे. 
परंतु देशाला शरमेने मान खाली करण्यासाठी मणिपूरच्या सरकारने भारतीयांना भाग पाडले आहे....#जाहीरनिषेध 
पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी व्यवस्थेची चिरफाड केली,
"रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो 
तुमची आय बहीण 
आजही विटंबली जाते हाटाहाटातून,
मवाल्यासारखे माजलेले 
उन्मत्त नीरो
आजही मेणबत्ती सारखी जाळतात माणसे चौकाचौकांतून
छाटले जातात 
आजही नगरानगरांतून 
रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो 
किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
मरेपर्यंत राहायचे का असेच युद्धकैदी?

नुसते "भारत माता की जय", बोलून झाले की संपले आमचे कार्य...किती दिवस किती महिने आणि किती वर्षे आपण हे सहन करायचे??????
....तरी देखील आपण बघून सुद्धा दुर्लक्ष करत आहोत....मणिपूर हिंसाचारामध्ये तिथल्या स्त्रियांवर शारीरिक अत्याचार होत आहे मीडिया दाखवणार नाही....कारण आरएसएस प्रणित भाजपाचे सरकार देशात आहे...

ॲड प्रज्ञेश चैतन्य सोनावणे ®© 2023
---------------------------------------

एखादा सत्ताधारी पक्ष आणि देशाचा प्रधानमंत्री सत्तेचा दुरुपयोग करून त्याच्या कारखानदार मित्राला फायदा पोचवण्यासाठी काय काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे मणिपूर.

काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांचा सहसंबंध समजून घेऊया.
१. किरण रिजिजू जे आधी कायदेमंत्री होते त्यांना भूविज्ञान मंत्रालय देण्यात आले, हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे म्हणजे नॉर्थ ईस्टचे.
२. २०१५ मध्ये नॉर्थ इस्टच्या डोंगराखाली अमूल्य खनिजे असल्याचा सर्वे समोर आला होता.
३. २०१७ मध्ये मणिपूर मध्ये भाजपचे बीरेन सिंग चे सरकार आले आणि लगेचच अडाणी आणि कंपनीने तिकडचे खनिज पट्टे बोली लावत नावे करून घेतले.
४. कुकी आदिवासीच्या ताब्यात असलेली जमीन फक्त आदिवासीच खरेदी करू शकतो आणि त्याची संमती नसेल तर तिथे उद्योग सुरु होऊ शकत नाही.
५. बिरेन सिंग मैतेइ जातीतून येतो, हा समाज शेती करतो, उद्योग-व्यवसाय करतो, संपन्न अशा समाजाला 'आदिवासी' घोषित करण्यासाठी वेगवेगळे सर्वे घडवून आणले गेले.
६. सर्व्हे करतांना कुकी वस्त्या वेगळ्या आहेत त्यांना मार्क केले गेलेच होते पण जिथे मिश्र वस्त्या होत्या तेथील कुकी घरांवर गुलाबी रंगाने मार्किंग करून ठेवले.
७. मार्च महिन्याच्या सुमारास एक आदेश काढून सर्व कुकी जमातींना त्यांच्याकडील लायसन्स आर्म शासनाकडे जमा करण्यास भाग पाडले.
८. हायकोर्टाने केंद्र शासनाच्या अधिकारांवर अतिक्रमण करत, गतिशीलता दाखवत स्वतःच मैतेइ जातीला 'आदिवासी' असल्याचे घोषित केले. 

कुकी जमातीने त्याला विरोध केला, 3 मे रोजी आंदोलन आयोजित केले,मैतेइ पूर्ण तयारीत होते याचा विरोध करायला. आंदोलन संपवून परत जाणाऱ्या कुकिंवर शसस्त्र हल्ले केले गेले, त्यांचे स्मारक ध्वस्त केले गेले, दिल्लीतला एक जुना व्हिडिओ मोर्फ करून 'कुकींनी मैतेइ मुलीवर बलात्कार केल्याचा व्हिडीओ व्हायरल करून आग भडकविण्यात आली आणि मग सुरू झाले सरकार पुरस्कृत मास किलिंग.

पोलीस अकॅडमी व विविध पोलीस स्टेशनवर हल्ला करून जमावाने AK45 व इतर आधुनिक हत्यारे पळवून नेल्याची स्क्रिप्ट व्यवस्थित प्रत्यक्षात आणून घेतली व तसं न्यूज चॅनेलच्या माध्यमातून देशाला सांगून टाकलं. पाठोपाठ इंटरनेट बंद करून तेथील काहीही सत्य बाहेर जाऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली गेली.

केंद्रातून पॅरामिल्ट्री मागवली जी कुकी आदिवासींना संरक्षण करण्याऐवजी मैतेइ वस्त्यांवर संरक्षणार्थ लावून स्थानीक पोलिसांना मैतेइ अतिवाद्यांसोबत आदिवासी कुकी वस्त्यांवर हल्ला करण्यासाठी पाठविले. नुसत्या बंदुका नाही तर रासायनिक विस्फोटकांचे साठे करून मैतेई अतिरेकी कुकींच्या समूळ नायनाट करण्याच्या तयारीत आहेत. बीरेन सिंग व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पूढील सगळी योजना फुलप्रूफ तयार ठेवली आहे, कुठेही काहीही बभ्रा होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली आहे.

शेकडो गावं, वस्त्यामध्ये जाऊन मैतेइ खुलेआम कत्तली करत सुटले. १० वर्षाची मुलगी असो वा ६० वर्षाची म्हातारी त्यांना सामूहिक बलात्कार करून खून केले, माणसांची मुंडकी कापून वस्त्यांच्या मध्यभागी खुंटीवर टांगून ठेवली आणि गावं-वस्त्या जाळून राख केल्या. रस्त्यांवर शेकडोंच्या संख्येनं प्रेत ताठरून, सडून पडली आहेत, आणखीही बरंच काही आहे जे समोर यायचं आहे.

जेसीबी ने मोठाले खड्डे खोदून शेकडो कुकी गाडून टाकले गेले आहेत आणि ही सर्व गावं आता मैतेईंच्या ताब्यात आहे, उद्या त्यांच्या नावे पण केली जातील. 
मग सरकारी सोपस्कार पार पाडून हे सर्व डोंगर पट्टे अडाणीला दिले जातील आणि सुंदर असा नॉर्थ ईस्ट केजीएफ च्या खदानी सारखा होणार आहे, जिथे कुकी आदिवासी गुलाम म्हणून राबवले जातील, शोषित होतील आणि किड्या मकोड्यांसारखे मरतील.

येत्या काही दिवसांत तिकडचे अनेक व्हिडिओ, फोटो समोर येणार आहेत जे आपल्याला माणूस म्हणवून घेण्याची लाज आणणार आहेत. सरकार दरबारी राबणारे न्यूज चॅनेल आणि भक्त यांपैकी कशालाच भीक घालणार नाही उलट बांग्लादेशी मुस्लिम, पाकिस्तान व चीन असे काय काय अँगल लावून जे झालं ते योग्यच झालं आहे याबद्दल मोठमोठ्या पोस्ट, रकाने लिहतील, आपण ते वाचायचं आणि षंढ बनून गप्प बसायचं...त्या कुकींच्या लाईनीत आपला नंबर येईपर्यंत..

हरिश म तायडे,
जनरल सेक्रेटरी, ऑल इंडिया युनियन बँक एससी/एसटी एम्प्लॉईज असोसिएशन. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com