Top Post Ad

महिलांना ब्लॅकमेल प्रकरणी भाजपच्या किरिट सोमैय्यांना जोडे मारो आंदोलन

 

 


  महिलांना ब्लॅकमेल करण्याचे काम किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर याचे पडसाद आज सर्वत्र उमटले. ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. भारतीय जनता पक्षाचे नेते किरिट सोमैय्या यांचा कथित आक्षेपार्ह व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. किरिट सोमैय्या यांच्या कथित आक्षेपार्ह व्हीडीओ प्रकरणावरून ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे.

 


 राज्यात विविध ठिकाणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी या विरोधात आंदोलन पुकारले होते. ठाण्यातही खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात महिला शिवसैनिकांनी किरिट सोमैय्या यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारत त्यांची प्रतिमा पायदळी तुडवत आंदोलन केलं.

भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल  झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळात दिसून आले. विधान परिषदेत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन दिले.  विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर हा मुद्दा उपस्थित केला. या प्रसंगी बोलताना दानवे म्हणाले की, केंद्राची सुरक्षा घेऊन महिलांना ब्लॅकमेल केले जात आहे. 8 तासाचे व्हिडिओ आहेत. मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्रद्रोही आहे. आपले सरकार नैतिकतेबद्दल बोलते. पण किरीट सोमय्या यांच्यासारखे दलाल महाराष्ट्रात महिलांवर अच्याचार करत आहेत. त्यांच्यावर आता सरकार काय कारवाई करणार? माझ्याकडे त्यांचे किळसवाणे पेन ड्राईव्ह आहे. त्यातील दृश्य बघू शकत नाही. त्यात घाणेरडे शब्द आहेत, असे सांगत दानवे यांनी तो पेन ड्राईव्ह सभापतींना दिला.

कोणाच्या राजकीय आयुष्यात बदनामी काय असते, खोटे आरोप जेव्हा एखाद्या माणसावर केले जातात तेव्हा काय होते ते आम्ही भोगले आहे. ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्याची चौकशी लावा. उपमुख्यमंत्री सभागृहात आहेत त्यांना जी काही मोठ्यातली मोठी चौकशी लावायची आहे ती लावा. आता हे शोधणे सरकारचे काम आहे की ती महिला कोण आहे. हे जनतेला समजलेच पाहिजे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. याबाबत एसआयटी लावा. त्यांनी जो खुलासा केला आहे त्यात हा व्हिडिओ बनावट आहे असे कुठेच म्हटले नाही. त्यांची सुरक्षा काढून घेण्याची मागणीसुद्धा परब यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com