Top Post Ad

के सी आर महाराष्ट्राला राजकीय पर्याय देणार - हरिभाऊ राठोड

 


 महाराष्ट्रात जी राजकीय परिस्थिती उद्भवली आहे त्याला जनता कंटाळली आहे. शेतकरी वर्ग चिंतेत आहे, पाऊस वेळेवर पडत नाही, दुबार पेरणीची वेळ आली आहे, परंतु सरकार पक्ष फोडाफोडीत मश्गुल आहे.  सर्वसाधारण जनता ही राजकीय नाटकाला कंटाळली आहे.  पुढच्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना (दोन्ही), कॉग्रेस, राष्ट्रवादी (दोन्ही पक्षाला मतदान करणार नाही कारण त्यांना पर्याय बी आर एस चा दिसत असल्याचे स्पष्ट मत माजी खासदार आणि बी आर एस चे वरिष्ठ नेते हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. प्रसिद्धी माध्यमांना पक्षाची भूमिका जाहिर करण्यासाठी आज मुंबईतील पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत राष्ट्र समितीचे शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माणिक दादा कदम (पाटील), नवी मुंबईचे संतोष दादा चौधरी वरिष्ठ नेते अशोकराव अल्हाट व इतर अनेक कार्यकर्ते हजर होते.

बी आर एस हा शेतकऱ्यांचा पक्ष म्हणून राज्यात उदयास येत आहे. प्रचंड प्रमाणात शेतकरी वर्ग सामान्य जनता तथा  माजी खासदार व माजी आमदार पक्षात सामील होत आहे. शेतकऱ्यांना अनेक सुविधा तेलंगणामध्ये देण्यात येत आहे त्या सर्व योजना राज्यात लागू करून तेलंगणा पैटर्न के सी आर हे आपल्या राज्यात आणणार आहेत. शेतकऱ्यांना एकरी दहा हजार, चोवीस तास वीज व मोफत वीज तसेच शेतकर्याना पाच लाखाचा वीमा उत्तरवण्याची योजना आहे. मुंबई व इतर महानगरातील दोन रूम किचन झोपडपट्टी धारकांना केसीआर योजनेत देण्यात येईल. मोफत पाणी व नळ जोडणी देण्यात येईल. शहरी भागात 200 युनिट, तर ग्रामीण भागात शंभर युनिट मोफत वीज देण्यात येईल. रिक्षा व टॅक्सी चालकांचा पाच लाखाचा विमा उतरवण्यात येईल. किमान वेतन दुपटीने करण्यात येईल, सर्व गरीब विद्यार्थ्यांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येईल सर्व मागासवर्गीय घटकांच्या सर्वांगीण उन्नती करिता  सर्वप्रकारच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, 125 फुटांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि अनुसूचित जातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना रुपये पाच लाखापर्यंत उद्योग उभारणीसाठी ना परतावा रक्कम अनुदान म्हणून देण्यात येईल असे आश्वासन राठोड यांनी यावेळी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com