अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ केंद्राने बसवले महामृत्यूंजय यंत्र
अखिल भारतीय श्रीस्वामी समर्थ आध्यात्मिक व बालविकास मार्ग दिंडोरी प्रणितच्या वतीने समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच सव्वा कोटी महामृत्युंजय मंत्राचा जप करण्यात आला. अपघातात मृत्यू झालेल्या २५ जणांच्या आत्म्यास शांती मिळावी व भविष्यात अपघात होऊ या उदात्त हेतूने हा विधी करण्यात आल्याचे सांगितले जाते. सुमारे दीडशे महिला-पुरुष भाविक यात सहभागी झाले होते. श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रामार्फत महामृत्यूंजय यंत्र बसवण्यात आले आहे. यामुळे आजूबाजूच्या पाच-दहा किलोमीटरमध्ये अपघात होणार नाही तसेच अपघात झाला तर मृत्यू होणार नाही, असा दावा स्वामी समर्थ सेवा केंद्र समन्वयकांनी केला आहे.
समस्यांवर दैवी उपाय शोधणं हे समाज आहेत. एका बाजूला कुणावर तरी श्रद्धा असणं आणि त्यातून व्यक्तीला भावनिक आधार वाटणं ही वेगळीअधोगतीकडे नेणं आहे. त्यापेक्षा त्यावर योग्य ते उपाय योजले पाहिजेत अशा प्रकारे दैवी शक्तीचा दावा करणे, त्यातून लोकांना फसवणं आणि ठकवणं हा जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा आहे. याबाबत पोलिसांनी दखल घ्यावी म्हणून अंनिसने मागणी केली होती. आमच्या मागणीची दखल घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि चौकशी करत गोष्ट आहे. परंतू त्याच्या नावाखाली दैवी चमत्काराचा दावा करणं आणि लोकांना फसवणं हा गुन्हा आहे. त्यामुळे या प्रकरणी कारवाई होणं आवश्यक आहे. रस्त्यावर जे अपघात होतात त्याला भौतिक कारणं असतात. रस्त्यांची स्थिती, ड्रायव्हरचं आरोग्य, त्याची व्यसनाधिनता, समृद्धी महामार्गावर सध्या हायवे हिप्नॉसिससारख्या गोष्टींची चर्चा होते आहे. त्या गोष्टी दुरुस्त करणं, त्यावर काम करणं ही समाज म्हणून आपल्या सगळ्यांची आणि प्रामुख्याने शासनाची जबाबदारी आहे. ज्यावेळी या समस्यांना दैववादी उत्तरं शोधली जातात त्यामधून समाजाची अधोगती होते आणि ते गंभीर आहे हे सगळ्यांनी समजून घ्यायला हवं.” डॉ. हमीद दाभोलकर (अं.नि.स.)
एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर देव धाबा गावानजीक एका खाजगी बसला झालेल्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागेवर मृत्यू झाला होता. या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र सिंदखेडराजा यांनी एक श्रद्धांजली कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाचे आणि पूजेचे व्हिडीओ निलेश आढाव या स्वामी समर्थ केंद्राच्या पदाधिकाऱ्याने समाजमाध्यमात व्हायरल करून अशी पूजाअर्चा केल्याने यापुढे अपघात होणारच नाही असा दावा केला होता. याची दखल सिंदखेड राजा पोलिसांनी घेत याविरुद्ध जादूटोणा व अनिष्ट रूढी प्रतिबंधक कायद्याच्या कलम दोन आणि पाच नुसार गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा दाखल होताच आमचा कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही व नव्हता परंतु जर अनावधानाने माझ्या बोलण्याने काही अंधश्रद्धा पसरली असेल तर मी माझे शब्द परत घेतो असे आढाव याने म्हटले आहे.
भाईंदरमध्ये राहणारी ३५ वर्षीय विवाहित महिला तिच्या दैनंदिन जीवनातील विविध समस्यांमुळे त्रस्त होती. ही बाब तिने जवळच्या मैत्रिणीला सांगितली असता, तिने स्वतःच्या आयुष्यातील समस्याही मुकेश दर्जी नामक मांत्रिकाने दूर केल्याचे सांगितले. तसेच पीडितेलाही मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पीडित महिला या मांत्रिकाकडे गेली असता, त्याने आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील. परंतु, पूजा करावी लागेल व स्वतःसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करावे लागतील असे सांगितले. त्यानुसार मागच्या तीन ते चार वर्षांपासून मांत्रिक हा पीडित महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. सर्व आयुष्यात ठीक होईल असे ,आश्वासन तिला दिले जात होते. मात्र, त्यानंतरही आपल्या जीवनात काहीही बदल होत नसल्याने भाईंदर पोलिस ठाण्यात नुकतीच मांत्रिकाविरोधात पीडितेने तक्रार दाखल केली होती. त्यावरून भाईंदर पोलिसांनी अघोरी व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत मांत्रिकाला सोमवार दिनांक २४ जुलै रोजी अटक केली.
0 टिप्पण्या