“संभाजी भिडे यांचं खरं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दामहून संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं, इतिहास मोडणाऱ्यांविरोधात आपल्याला उभे राहावे लागेल. कारण, जोपर्यंत आपला इतिहास माहिती होणार नाही, तोपर्यंत आपण भविष्याकडे बघू शकत नाही. राज्यक्रांतीकारकापासून समाजक्रांतीकारपर्यंत हा आपला वारसा आहे. महात्मा फुलेंनी सांगितलंय, ‘सत्तेविना सर्व कळा झाल्या अवकळा.’ सत्ता असेल, तर तुम्ही समाजासाठी पाहिजे ते करू शकता,” असे वक्तव्य छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
'संभाजी भिडे यांचं नाव मनोहर कुलकर्णी आहे की नाही ते स्पष्ट करावं, त्यांना संभाजी भिडे हे नाव का घ्यावं लागलं संभाजी भिडे हे नाव घेण्याची गरज का भासली. आपापल्या नावाने प्रबोधन करा. पंरतु हे नाव घ्यायचं, आणि बहुजन समाजात जायचं, ते बरोबर नाही. ते बाहेर काय बोलतात हे सर्वांना माहिती आहे, त्याला आम्ही विरोध करणार', 'कोणत्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही. महात्मा फुले यांना भिडेंनी आपला वाडा दिला म्हणून तिथे शाळा सुरू झाली. ब्राम्हण आहेत म्हणून विरोध नाही. पुर्वी ब्राम्हणांच्या मुलींनाही शिक्षण नव्हतं. ते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलं. त्याचा जो काही ऐतिहासीक पुरावा आहेत त्याच्यावर चर्चा करता येईल'
मी ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीत शिवाजी, संभाजी, धनाजी सगळी नावे आहे. पुढे मुलं झाली तर नक्कीच संभाजी, शिवाजी नावं ठेवील. जे कोणी लोकं त्यांची (संभाजी भिडे) बाजू घेतात, किंवा त्यांनी स्वतः स्पष्ट करावं. ते एवढ्या निर्भिडपणे महात्मा गांधी, फुले यांच्याबद्दल बोलतात, अगोदर त्यांनी स्वतःचे नाव स्पष्ट करावे', तसेच सरकारमध्ये आहे म्हणुन मी माझी भूमिका बदलणार नाही. माझी जी भूमिका आहे तिच्यावर मी ठाम आहे ती बदलणार नाही. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा माझा हेतु नाही असंही छगन भुजबळ म्हणाले आहेत.
यावर काँग्रेस नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली. वडेट्टीवारांनी भुजबळांच्या वक्तव्याला पाठिंबा दर्शवला. तसेच शब्द फिरवला नाही, तर ते खरे भुजबळ असं म्हणत टोलाही लगावला. ते रविवारी (२० ऑगस्ट) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, “छगन भुजबळ म्हणाले ते खरं आहे, ती वस्तूस्थिती आहे. भुजबळ तिथे राहून वस्तूस्थिती बोलत असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो. आम्ही छगन भुजबळांकडे बहुजनांचे नेते म्हणून बघत होतो. ते या वाक्यावर ठाम राहिले, डगमगले नाहीत, वक्तव्य मागे घेतलं नाही, शब्द फिरवला नाही तर ते खरे भुजबळ.”
या आधीही संभाजी भीडे यांच्याबद्दल यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या... हा माणूस इतका घाणेरडा आहे. संभाजी भिडे ज्या भागातून येतात तेथे फोन लावला आणि हा कसा माणूस आहे असं विचारलं. तेव्हा स्थानिक लोकांनी सांगितलं की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय. दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाने फिरू देत आहे. आम्ही संभाजी भिडेंवर गुन्हे दाखल करा म्हणून आग्रह धरला तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले. संभाजी भिडेंवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक केली पाहिजे. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे असंच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरवली, १५ ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला, तर याला जबाबदार गृहखातं, पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल,” पंडित नेहरूंचं देशासाठी नखाइतकंही योगदान नाही असं संभाजी भिडे (मनोहर कुलकर्णी) म्हणतात, मग यांनी योगदान दिलं आहे का? नेहरू देशासाठी ११ वर्षे तुरुंगात होते. ११ वर्षे तुरुंगात असलेल्या व्यक्तिला हे असं कसं बोलू शकतात. ते युवकांची डोकं खराब करत आहेत. युवकांची पिढी खराब करण्याचं याचं षडयंत्र आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. हे लोक निर्लज्जासारखे वागत आहेत. पोलिसांनी संभाजी भिडेंवर कारवाई केली पाहिजे. त्यांना अटक का होत नाही? त्यांनी काहीही बरळायचं, महात्मा गांधी, महात्मा फुलेंचा अपमान करायचा. साई बाबांना काहीतरी बोलायचं, पंडित नेहरूंबद्दल काही तरी बोलायचं आणि हे काय दुधाने धुतले आहेत का?” -
0 टिप्पण्या