Top Post Ad

ठाण्यात कॅन्सर रुग्णालय आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन


 ठाण्यात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटल आणि त्रिमंदिर संकुल यांचे भूमिपूजन  आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते रविवार, ३०जुलै रोजी दुपारी ४ वाजता ग्लोबल हॉस्पिटल, बाळकूम येथे होणार आहे. या सोहळ्यास दादा भगवान फाऊंडेशनचे दिपक देसाई शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर  गुजरातचे भूपेंद्र पटेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितपवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील,  मंत्री शंभूराज देसाई, रवींद्र चव्हाण,  यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्ट चे अध्यक्ष, सुप्रसिद्ध विकासक अजय आशर यांनी दिली आहे .

 ठाण्यात  जीतो एज्युकेशनल अॅण्ड मेडिकल ट्रस्टने महानगरपालिकेच्या सहयोगाने २०२०पासून शंभर खाटांचे अत्याधुनिक महावीर जैन रुग्णालय सुरू केले आहे. तेथे रुग्णांवर माफक दरात उपचार केले जात आहेत. याच संस्थेने कोविडचा सामना करण्यासाठी १२०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय ठाणे महानगर पालिकेस उभारून दिले होते. या रुग्णालयामध्ये महापालिकेच्या माध्यमातून सुमारे २० हजार रुग्णांवर नि:शुल्क उपचार करण्यात आले होते.  देशात वेगाने वाढत असलेला कर्करोग, त्याच्या उपचारासाठी होणारा खर्च, उपचारांची मर्यादित उपलब्धता, रुग्णांची गैरसोय, मानसिक आणि आर्थिक समस्या, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवास व्यवस्थेतील अडचणी यांची स्थिती लक्षात आल्यावर तज्ज्ञांच्या सल्ल्याने ठाणे शहरात अद्ययावत असे धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ३० वर्षांच्या कराराने ट्रस्टला जमीन उपलब्ध करून दिली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालय प्रस्तावित कर्करोग रुग्णालयासाठी तांत्रिक सहकार्य करीत आहे.  रुग्णालयाच्या बांधकामासोबत, उपचारसाधनांचा सुमारे ५००कोटी रुपयांचा खर्च ट्रस्ट करणार आहे.  

धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर रुग्णालयात ५००हून अधिक रुग्ण खाटा, बाह्यरुग्णसेवा (ओपीडी), आंतररुग्णसेवा, रेडिएशन, ऑपरेशन थिएटर, आयसीयू, एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय, डे-केअर सुविधा, पॅथॉलॉजी आदी सुविधा असतील. तसेच, उपचाराच्या काळात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या निवासासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली ६०० खाटांची धर्मशाळा उभारली जाणार आहे. ती अल्पदरात रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी उपलब्ध राहील. तसेच, मुंबईतील टाटा मेमोरिअल रुग्णालयामध्ये ज्याप्रमाणे रुग्ण सुविधा दिल्या जातात, त्याचप्रमाणे ठाणे कर्करोग रुग्णालयामध्ये रुग्णांना किफायतशीर दरात रुग्णसेवा दिली जाणार असल्याची माहिती अशर यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com