Top Post Ad

खलाशी (sailors) युनियनच्या वतीने नाविक जागृती परिषद -2023 संपन्न

भारतीय मजदूर संघाच्या खलाशी (sailors) युनियनच्या वतीने नाविक जागृती परिषद दि १ जुलै रोजी वारकरी भवन, बेलापूर नवी मुंबई येथे संपन्न झाली.  सदर कार्यक्रमाचे उद्घाटन  केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी केले. त्यावेळी त्यांनी  शिपिंग इंडस्ट्री मध्ये कामगारांना येणाऱ्या अडीअडचणी बाबत माहिती करुन घेवून त्या लवकरच  सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. खलाशांनी मोठे बलिदान देत भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. जहाज बांधणी आणि नौवहन उद्योगाच्या वाढीमुळे भारताचा विकास होण्यास मदत होईल याची त्यांना जाणीव आहे आणि म्हणूनच आपण या क्षेत्राला सर्वतोपरी मदत केली पाहिजे. राज्य सरकार तसेच स्थानिक प्राधिकरणांचे सहकार्य ही काळाची गरज आहे. जहाज बांधणी, नौवहन क्षेत्र आणि पर्यायाने देशाला समृद्ध करण्यात सहाय्यभूत ठरेल, अशा पद्धतीने इतर सर्व बंदरांनी पुढे येत बंदरातील सुविधा वाढवण्यावर एकत्र काम केले पाहिजे, असे आवाहनही  नाईक यांनी केले.

देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यात खलाशांनी बजावलेली उत्कृष्ट कामगिरी निदर्शनास आणून देताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, "जनेबंप्रा गेल्या 34 वर्षांपासून सागरी उद्योगात कार्यरत असून देशाच्या अर्थव्यवस्थेत या संस्थेने अमूल्य योगदान दिले आहे. सागरी उद्योगाच्या सुधारणेसाठी करत असलेल्या त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे असेही ते म्हणाले.

सीबीडी बेलापूर नवी मुंबईच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनीही उपस्थित राहून मार्गदर्शन केले, बेलापूर नवी मुंबई पट्यात सिपिंग इंडस्ट्री मध्ये व नवीन शिकणाऱ्या मुलाची मोठ्या प्रमाणात फसवून होते आहे, इंडस्ट्री मध्ये अनेक अडचणी आहेत याबाबत लवकरच तोडगा काढला जाईल असे म्हात्रे म्हणाल्या.

प्रदेशाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष अनिल ढुमणे यांनी जनभागीदारीच्या माध्यमातून सुरु असलेल्या अनेक उपक्रमांची सविस्तर माहीत दिली. तर प्रदेश महामंत्री मोहन येणुरे यांनी भारतीय मजदूर संघाची तसेच सध्या कामगारांच्या हितास्तव करत असलेल्या कार्याची माहिती दिली, युनियनने सभासदांसाठी  हा कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणल्याबद्दल युनियन पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे प्रदेशाच्या वतीने अभिनंदन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनियन चे सरचिटणीस संदिप सिंग यांनी केले, तर युनियन अध्यक्ष आर पी विठ्ठल यांनी आतापर्यंत केलेल्या केलेल्या व करत असलेल्या कार्याची माहिती दिली, इंडस्ट्री मध्ये येत असलेल्या अडचणी मंत्री महोदयासमोर मांडल्या, त्या संदर्भात निवेदन मंत्री महोदय यांना दिले व त्या सोडवण्याची विनंती केली. या कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष एस के सिंग, मुंबई अध्यक्ष बापू दडस, जिल्हा सेक्रेटरी संदिप कदम उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप जेष्ठ कार्यकर्ते रवी रामजी यांनी केले. कार्यक्रमास मोठ्याप्रमाणावर प्रतिनिधी व सभासद उपस्थित होते. आभार प्रदर्शन व सामुदायिक राष्ट्रगायना नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. तर प्रदीप सिंह, महामंत्री यांनी आभार प्रदर्शन व्यक्त केले. 

 


केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी राज्यमंत्री मा: श्रीपाद नाईक,यांचा सत्कार करतांना सीफेरर्स युनियन चे प्रमुख आर पी वीट्टील अनिल धुमने, आ : मंदाताई म्हात्रे आणि विजय घाटे दिसत आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com