भाजपच्या मोदी सरकारने नऊ वर्षात राबविलेल्या विविध योजना प्रचार करण्याच्या उद्देशातून भाजपच्या वतीने ठाणे लोकसभा मतदार संघात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकाऱ्यांसह सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रात पुन्हा भाजपा-शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे, हेच आमचे ध्येय आहे. त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत. आमच्या कामांना जर कुणाचा विरोध असेल किंवा कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.
“जेव्हा एखाद्या खासदाराच्या राजीनाम्यापर्यंत विषय पोहोचतो, तेव्हा सर्व परिस्थिती व्यवस्थित आहे, असं काही नसतं. मुख्यमंत्र्यांच्याच घरापासून ही सुरुवात व्हायला लागली असेल, तर उभ्या महाराष्ट्रात काय चित्र असेल, याचा अंदाज आपण घेऊ शकतो,” - एकनाथ खडसे
एक वर्षापासून जेव्हापासून शिंदे गटाचे सरकार आलेलं आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली, या ठिकाणी सातत्याने शिंदे गट आणि भाजपमध्ये हे वाद चालूच आहेत. शिंदे गट विरुद्ध भाजप हा संघर्ष सातत्याने चालूच आहे. दरम्यान, काल खासदार शिंदे यांनी जे वक्तव्य केले ते मी गांभीर्याने घेत नाही. कारण, ती वक्तव्य अभ्यासपूर्णही नाहीत. राक्षसी महत्वकांशी पोटी, सत्तेच्या लालसेपोटी आणि गद्दारीमुळे जे सरकार महाराष्ट्रात एक वर्षांपूर्वी आलं ते राजीनामा देतील का? त्यांच्याकडे नैतिकता आहे का? त्यांच्याकडे निष्ठा आहे का? त्यांच्याकडे समर्पण आहे का? या प्रश्नांच उत्तर नाही असं आहे. त्यामुळे ते राजीनामा अजिबात देणार नाहीत. त्यांना बोलायचं एक असतं आणि नाटक करायचं असतं. एखाद्या चित्रपटामध्ये साईड अॅक्टर असतात ना, तसे ते आहेत. कधीतरी ते अॅक्टींग करतात - आनंद परांजपे
0 टिप्पण्या