Top Post Ad

धर्मांतर प्रकरणातील फोलपणा उघड, ठाणे पोलिसांनी दिले स्पष्टीकरण


  ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रा परिसरात एकही धर्मांतराचे प्रकरण आढळले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.  कथित धर्मांतर प्रकरणी रविवारी ठाणे पोलिसांनी एकाला अलिबाग येथून ताब्यात घेतले. शाहनवाज खान असे त्याचे नाव असून मागील काही दिवसांपासून गाजियाबाद पोलीस त्याचा शोध घेत होते. शाहनवाज हा मुंब्रा येथे वास्तव्यास होता. त्याने अनेकांचे धर्मांतर घडविल्याचा दावा गाजियाबाद पोलिसांनी केला होता. परंतु, त्याची अधिक चौकशी केली असता या चौकशीत धर्मांतराचे एकही प्रकरण पोलिसांना सापडले नाही.

ठाणे डीसीपी (झोन १) गणेश गावडे म्हणाले, “आम्ही आरोपी शाहनवाज खानची चौकशी केली असून मुंब्र्यामध्ये धर्मांतराची कोणतीही घटना घडली नसल्याचे यातून स्पष्ट झाले आहे. गाझियाबाद पोलिसांनी खानला ठाणे कोर्टात हजर केले होते. ठाणे कोर्टाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. म्हणजेच, तीन दिवसांच्या आत गाझियाबाद येथील न्यायालयात त्याला हजर करणे बंधनकारक आहे. तसंच, त्याला सुरक्षितपणे घेऊन जाणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मुंब्रा येथे सुमारे ४०० लोकांचे सामूहिक धर्मांतर केल्याची माहिती मिळाली आहे, ज्याची अद्याप पडताळणी करणे बाकी आहे. अशी माहिती गाझियाबाद पोलीस उपायुक्त निपुण अग्रवाल यांनी माध्यमांना दिली. याआधारे मुंब्रा ज्यांच्या अखत्यारीत येतो, त्या ठाणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून मुंब्रा येथे राहणाऱ्या शाहनवाज हा मुलांशी संपर्क साधून झाकीर नाईक याच्या भाषणाविषयी चर्चा करत होता. त्यानंतर तो मुलांचे धर्मांतर करत असे. या घटनेप्रकरणी गाजियाबाद येथील कविनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गाजियाबाद पोलीस मुंब्रा शहरात शाहनवाजचा शोध घेत होते. 

दरम्यान महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवून एका समाजाला बदनाम करुन त्याद्वारे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याची तसेच मुंब्रा-कौसा बदनाम करुन आपणाला बदनाम करण्याचा हा कट होता. आता हा कट उघडकीस आला आहे. त्यामुळे उत्तरप्रदेश सरकारने माफी मागावी तसेच महाराष्ट्र सरकारनेही आपली नाराजी उत्तर प्रदेशला कळवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केली.

 हा दंगल पेटवण्याच्या कटाचा एक भाग होता. येथील एका समाजाची प्रतिमा राक्षस अशी उभी करुन त्याचे भय निर्माण करायचा प्रकार सुरु झाला होता. हा प्रकार अत्यंत खालच्या स्तरावरील आहे. महाराष्ट्रामध्ये जेथे कधी दगड उचलला गेला नाही. तिथे दंगली घडविण्यात आल्या आहेत. ज्या कोल्हापूरवर छत्रपती शाहू महाराजांचे संस्कार आहेत; जिथे सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकसंघ ठेवून नगर उभारले. तिथे दगड उचलले जात आहेत. आज वाईट वाटते की तिथे पानसरे-एन.डी. पाटील नाहीत; ते दोघे असते तर त्यांनी रस्त्यावर उतरुन शांतता निर्माण केली असती, असे डॉ. आव्हाड म्हणाले.  

 मुंब्रा येथे कोणत्याही प्रकारचे धर्मांतर झालेले नाही आणि तशी कोणतीही माहिती आम्हाला प्राफ्त नाही, अशी घोषणा ठाणे पोलिसांनी केली आहे. ही आनंददायी घोषणा आहे. उत्तर प्रदेशच्या गाझीयाबादमधील अधिकाऱयाने चारशे जणांचे धर्मांतर झाले, असे म्हटले. त्यामुळे ठाणे पोलिसांचीही लाज गेलेली आहे. मुस्लीमांबद्दल द्वेष निर्माण करण्यासाठी हिंदू समाजाला वेगळी दिशा दाखवण्यात आली. त्यातून दोन्ही समाजांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा उद्देश होता. हिंदू समाज काय एवढा अरिपक्व आहे की तो धर्मांतराचा रस्ता निवडेल. ही महाराष्ट्राला बदनाम करण्याची आणि महाराष्ट्रात अस्वस्थता पसरवून एका समाजाला बदनाम करुन त्याद्वारे दोन धर्मांमध्ये द्वेष निर्माण करण्याची तसेच मुंब्रा-कौसा बदनाम करुन आपणाला बदनाम करण्याचा हा कट होता. 

पण, पहिल्या तासातच आपण आव्हान दिल्याने कोणाला काही करता आले नाही अन् त्याला माघार घ्यावी लागली. त्यामुळे राज्य सरकारने हे गांभीर्याने घ्यावे. तसेच, उत्तर प्रदेशने माफी मागायला हवीच शिवाय ठाणे पोलिसांनीही उत्तर प्रदेश सरकारला एक नाराजीचे पत्र उत्तर प्रदेश सरकारला पाठवायला हवे की तुम्ही असे बेजबाबदार वर्तन तुम्ही करु शकत नाही, असे ठणकावायला हवे. आज मुंब्रा परिसर हा ठाण्यातील कोणत्याही भागापेक्षा चांगला आहे. म्हणजे कळवा-मुंब्रा भागाची सुंदर प्रगती होत आहे. ही प्रगती बघवत नसल्यानेच हे षडयंत्र रचण्यात आले असल्याचेही आव्हाड म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com