Top Post Ad

तर, प्रशांत कॉर्नर प्रकरणी 'दूध का दूध, पानी का पानी' होऊ शकेल....


  •      महापालिकेच्या भ्रष्टाचारी बजबजपुरीमुळेच, ठाणे 'शहर', म्हणजे 'जहर'  झालंय! प्रशांत कॉर्नर प्रकरणी एकूण एका कर्मचाऱ्यांची व आजुबाजुच्या लोकांकडून विचारणा अथवा याबाबत, शपथपत्रं का घेतली जात नाहीत? त्यावेळचं संपूर्ण दुकानातलं Footage का उपलब्ध केलं जात नाही; तसेच, आजुबाजुचंही CCTV Footage का घेतलं जात नाही ? असा सवाल धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष यांनी केला आहे.  शिवाय, संबंधितांच्या मोबाईलचा (ड्रायव्हर, बाॅडीगार्डसकट) CDR घेतला तर, 'दूध का दूध, पानी का पानी' होऊ शकेल.असेही त्यांनी स्पष्ट केले. 
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत काॅर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित करणे. तशी अफवा पसरवून कंपनीची बदनामी केल्याप्रकरणी प्रशांत काॅर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे नौपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजय यांना मंगळवारी अटक केली. ठाणे सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर, अजय जया यांना, गुरुवारी (१ जून-२०२३) वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाल्यानंतर, 'धर्मराज्य पक्षा'चे अध्यक्ष राजन राजे यांनी, अजय जया यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन, ठाणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या सूडबुद्धीने राबविलेल्या दडपशाही  कारभारावर एकच शरसंधान साधले. यावेळी शिवसेना (ठाकरे) ठाणे प्रदेशचे प्रवक्ते चंद्रभान आझाद, 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष महेशसिंग ठाकूर आणि सचिन शेट्टी उपस्थित होते. 

पहाटे साडेपाच वाजता गुन्ह्याची नोंद होते... तर, अजय जयाच्या घरी पोलिस, त्याअगोदरच म्हणजे, पहाटे 2.30 वा. एखाद्या दरोडेखोर किंवा अतिरेक्यावर धाड घालावी तसे, हाती कुठलीही कागदपत्रं न घेता किंवा अजय जयाला रीतसर नोटीस न देता....आक्रमकपणे व छुप्यारितीने का पोहोचले? असाही सवालही राजे यांनी उपस्थित केला. "आतापर्यंत भ्रष्टाचाराची बजबजपुरी म्हणून दुर्लौकिक असलेली ठाणे महानगरपालिका, अचानक इतकी संवेदनशील व्हावी की, थेट 'प्रशांत कॉर्नर'च्या, त्यांच्यादृष्टीने अनधिकृत असणाऱ्या 'तथाकथित' वाढीव बांधकामावर तोडक कारवाई व्हावी? मुळात आम्ही, कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिकदृष्ट्या मुळीच कधि विरोधात नसतो, आम्ही व्यक्तिविरोधात नव्हे; तर, वाईट प्रवृत्तींविरोधात लढतो.

मुख्यमंत्र्यांच्या सूनबाई त्या ठिकाणी खरेदीला आल्या होत्या की, नव्हत्या... याविषयी, नुसती वाचाळता करण्यापेक्षा, वेळीच सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधितांचा सीडीआर (CDR) तपासून घेतला असता; तर, आज हा एवढा तमाशा झालाच नसता. पहाटे अडीच वाजता अजय जयाला पोलीस अटक करायला येतात, हा कोणी दहशतवादी आहे की, नक्षलवादी आहे? गुन्हा दाखल झाला संध्याकाळी साडेपाच वाजता आणि पोलिसांची धाड पडते पहाटे अडीच वाजता, तेही कोणतेही अटक वॉरंट किंवा रीतसर कागदपत्रांची पूर्तता न करताच? आम्हाला हे कळत नाही, ते पोलीस होते की, खाकी वर्दीतले गुंड? या अशा भ्रष्टाचारी बजबजपुरी व्यवस्थेमुळेच ठाणे शहर, हे 'जहर' झालंय, दहशतीपोटी नरक झालंय!" अशा शब्दांत राजन राजे यांनी, ठाणे महापालिका प्रशासन आणि पोलिसांच्या दडशाहीविरोधात संताप व्यक्त केला. 

"आमच्या पक्षाचा जीव छोटा जरी असला; तरी, त्याची तत्त्वं, धोरणं फार मोठी आणि सभस्त जनकल्याणकारी आहेत. "शिवछत्रपतींची राजनीती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा संदेश आणि महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाशी" नातं असणारी आमची 'जीवनमूल्ये' आहेत. माझ्याविरोधातही व्यक्तिशः कितीतरी खोटे खटले सुरु आहेत, म्हणून आम्ही कधी खचून गेलो नाही. सत्याचा मार्ग खडतर जरुर; पण, तो अंतिमत: शाश्वत असतो. सध्या देशात जे काही चाललंय, राज्यघटना गुंडाळून ठेवली गेलीय... एकाधिकारशाही निर्माण झालीय. जे देशात, दुर्दैवाने तेच ठाणे शहरात सुरु आहे. मग, या व्यवस्थेला 'शासन' म्हणायचं की, 'दुःशासन'? ही 'लोकशाही' आहे की, हुकूमशाही-पोलिसशाही, हे एकदा जाहीर करा.

एका 'तथाकथित' खरेदीच्या घटनेवरुन, महापालिकेने यायचं आणि 'प्रशांत कॉर्नर'वर तोडक कारवाई करत... ठाण्यात दहशत निर्माण करण्याविरोधात आम्ही ही पत्रकार परिषद घेतल्याचे राजन राजे यांनी स्पष्ट करुन, आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि प्रस्थापित व्यवस्थेवर जोरदार घणाघात केला  मुख्यमंत्र्यांच्या सूनबाईंना वा खासदारांच्या धर्मपत्नी म्हणून जरुर काही 'प्रोटोकॉल'नुसार सवलती-सुविधा मिळव्यात, नव्हे मिळायला हव्यातच... त्याविषयी, आमची तक्रार नाहीच; कारण, राजकारण्यांच्या घरच्या मंडळींना चोवीसतास मनस्ताप, असुरक्षितेतचा सामना वगैरे सहन करावा लागत असतो. मुख्यमंत्र्यांच्या सूनबाई, या व्यक्तिशः मला मुलीसारख्याच...त्याबद्दल, त्यांच्याप्रति आस्था, माया असणारच. पण, अशा तऱ्हेनं त्यांच्या दुकानातल्या कथित भेटीने ठाणे-शहर प्रशासनिक व्यवस्थेनं धुमाकूळ घालावा, हे लोकशाहीत अशोभनीय, अस्विकारार्ह व अतिशय संतापजनक असल्याचे मत राजे यांनी व्यक्त केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com