Top Post Ad

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करा


 ठाण्यात पर्यावरण दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

बारसू रिफायनरी प्रकल्प रद्द करा. पर्यवरणाचे रक्षण करा. या मागण्यांसाठी ५ जून पर्यावरण दिनी ठाणे जिल्ह्यातील विविध संस्था संघटनांच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी यांना सदर प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले. रद्द करा रद्द करा, विनाशकारी रिफायनरी प्रकल्प रद्द करा" "कोकण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे" "एकच जिद्द, रिफायनरी रद्द" अशा गगनभेदी घोषणा आदोलकांकडून देण्यात आल्या. 

या आंदोलनाप्रसंगी ठाणे शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय म गो., जगदीश खैरालिया, आंदोलनाचे निमंत्रक सत्यजीत चव्हाण, उदय चौधरी, शिरीष भेटी, वंदना शिंदे, पर्यावरणवादी कार्यकर्त्या प्रणाली राऊत, शिवसेना (उदव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे प्रवक्ते चंदमान आझाद, 'धर्मराज्य पक्षाचे माहिती अधिकार ठाणे कक्षप्रमुख अनिल महाडिक, पक्षाच्या आंदोलन समितीचे प्रमुख कार्यवाह संतोष तावडे, आंदोलन समिती सदस्य संजय दळवी, धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघाचे कामगार प्रतिनिधी अरविंद सावंत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

बारसू येथे प्रस्तावित असलेल्या तेल शुद्धीकरण कारखान्याला (रिफायनरीला ) व इतर अनेक गावांत होणाऱ्या निक्षारीकरण प्रकल्प, प्लास्टिक निर्माण, औष्णिक वीजनिर्मिती, धरण इ. सलग्र कारखाने प्रकल्पांना ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. हा विरोध घटनात्मक पद्धतीने स्वातंत्र्यदिनी किंवा प्रजासत्ताकदिनी ग्राम सभेमध्ये रीतसर ठराव मंजूर करून व ते शासनाला सर्व स्तरावर देऊन व्यक्त झाला आहे. मुळात देशाची गरज १९ कोटी टन कच्या तेलाच्या शुद्धीकरणाची असताना २४ कोटी टन तेल शुद्धीकरण केले जात आहे. अधिकचे तेल युरोपात निर्यात केले जाते. तेथील सरकारे व सत्ताधारी स्वतःच्या देशात प्रदूषण न करता ते भारतात करून घेतात. हि वस्तुस्थिती आहे. मात्र मुठभर राजकारण्यांच्या हितासाठी हा प्रकल्प कोकणातील सर्वसामान्य जनतेच्या माथी मारला जात आहे. तो तात्काळ रद्द व्हावा 

प्रकल्पाला विरोध करणान्या आंदोलकांचा आवाज चिरडण्यासाठी प्रचंड पोलीस बळाचा वापर करून दडपशाही केली जात आहो. बारसू पंचक्रोशीतील जनतेला रिफायनरीमुळे व त्यांच्या जिवनावर विपरीत परिणाम होणार आहेत. हे सांगण्याच्या संवैधानिक अधिकार आहे. म्हणूनच बारसू रिफायनरी व पेट्रो केमिकल प्रकल्प रद्द करावा व प्रकल्प विरोधी आंदोलनाला पाठींबा द्यावा. या करिता आज ५ जून २०२३ रोजी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ठाणे जिल्हालाधिकारी कचेरीवर निदर्शने करून आम्ही शासनाचे लक्ष्य वेधत असल्याचे निदर्शन करणाऱ्यांना सांगितले.

कोकणातील स्वर्गासमान निसर्गाचा विध्वंस होवून हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स AQI) जो वारसू सारख्या ठिकाणी स्वच्छ, आरोग्यदायक, म्हणजे ३५ चे आसपास आहे, तो दिल्ली सारखा २०० ते ४०० बनून, हवेतील ऑक्सिजन कमी कमी, आणि विषारी वायू वाढून कोकणी माणसाला हळूहळू पण ठामपणे रोगी बनवणार. कोकणाला अतिशय समृद्ध पश्चिम घाट अन समुद्र किनारा लाभला आहे ज्यामुळे ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळतात. काजू, आंबा, फणस, रातांबे, नितांत सुंदर मंदिरे, आमच्या श्रद्धा, जैव विविधता, जगप्रसिद्ध कातळ शिल्प, हे अतुलनीय वैभव आहे. खाडी, खेकडे तसऱ्या, कोळंबी प्रकल्प, साडे (पठार) आहेत. त्यावर चारा मिळतो. भात शेती होते. कातळ सडे हि एक समृद्ध परिसंस्था आहे. त्यावर जैवविविधता आहे. एवढे असूनही सडे हे पडजमीन, वैरानजागा असा बहुतेकांचा फार मोठा गैरसमज पसरविला जात आहे. रिफायनरी उभारल्यास हवा, पाणी, जमीन प्रदुषित होतिल. मासेमारीसाठी चे नंदनवन असलेला समुद्र किनारा मासे उत्पादित करण्याची क्षमता गमावून बसेल. मच्छीमारांचा पारंपरिक वहिवाटीचा हक्क जाईल. प्रदूषणकारी औद्योगिकक्षेत्रामुळे बाधित जैवविविधता आणि निसर्ग सौदर्य यावर विपरीत परिणाम होईल.

जागतिक परिषदांमध्ये माननीय पंतप्रधानांनी सांगितल्या प्रमाणे आपल्याला कार्बन उत्सर्जन, जागतिक तापमान वाढ कमी करत आणायची आहे. त्यातील गांभीर्य कृपया समजून घ्या. त्यासाठी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपाययोजनांचे करार केले आहेत. त्यांच्या अहवालनाला दुर्लक्षित करणे योग्य नाही ? रिफायनरी म्हणजे असे कारखाने, जेथे तेल, डांबर, प्लास्टिक बनवले जाते. हे वायू प्रदूषणाचे प्रमुख स्रोत आहेत. या मधील रसायनांमुळे कर्करोग, पुनरुत्पादन क्षमता हानी, श्वासोच्छवासाच्या समस्या, दमा, जन्मजात दोष, डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे, तणाव यासारख्या गंभीर आरोग्य समस्या निर्माण होतात. तरी या सर्व बाबी विचार करून शासनाने हा प्रकल्प तात्काळ रद्द करावा असे आवाहन यावेळी सर्व वक्त्त्यांनी केले.

जैवविविधतेने समृध्द असलेले कोकण हे त्यामुळे केवळ बारसूला जागतिक सास्कृतिक वारसा असलेल कातळशिल्प आहे म्हणूनच नव्हे, तो मुध आहेच पण कोकण, हे निसर्गाच अलौकिक लेण आहे काश्मीर भारताचं नंदनवन असेल, तर कोकण हा 'जागतिक जैवविविधतेचा वारसा' आहे आणि तो अत्यंत पराकोटीने व काळजीपूर्वक जपला पाहिजे धूर ओकणारा, प्रचंड कार्बन उत्सर्जन करणारा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही होत असलेला 'तेलशुद्धीकरण प्रकल्प हा जागतिक तापमानवाढीची अकाळविक्राळ पर्यावरणीय समस्या पाहाता, त्याज्यच. परंतु कोकणासारखी निसर्गसुंदर अलौकिक भूमी ही त्यासाठी सर्वात अयोग्य जागा होय" असे जाहीर आवाहन 'धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी यावेळी केले. 

"तेल शुद्धीकरणाचे प्रकल्प, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही होवोत, ते प्रदूषणकारी आहेत आणि अशा प्रकल्पासाठी कोकण ही अत्यंत अयोग्य जागा आहे" असे ठाम प्रतिपादन राजे यांनी करून, आता अवघ्या विश्वाची जीवनशैली अर्थव्यवस्था संपूर्णपणे बदलण्याची वेळ आलीय. आपल्याला गांधीवादाखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही. कायमस्वरुपी शाश्वत, जे निसर्गावर कमीतकमी आघात करणारे असेल, अशी जीवनशैली आपल्याला स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नसताना, आपण आपल्या पुढच्या पिढीचं आयुष्य धोक्यात चालतोय एक दोन-चार पिढ्या मजा मारुन जाणार आणि पुढल्या पिढीच्या भविष्यात तुम्ही अंधाराचं ताट वाढून ठेवणार आहात का? असा संतप्त सवाल राजे यांनी बोलताना उपस्थित केला

  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक जनतेचा प्रकल्पाला विरोध असेल तर, त्यांच्यावर आम्ही प्रकल्प लादणार नसल्याचे वक्तव्य एकदा केले होते. तोच धागा पकडून राजन राजे म्हणाले की, "स्थानिक जनतेच्या असंतोषाचा उद्रेक बारसूत झालेला आहे आणि त्याचे पडसाद इकडे ठाण्यात उमटलेले आहेत. जे जे या आंदोलनाशी निगडित आहेत, अशी अनेक मंडळी आज इथे आलेली आहेत. जीवन सुरक्षित राखणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आता गंभीर होऊन या सगळ्या पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर वेगळा विचार करावा लागेल आणि हाच संदेश सर्वसामान्यांत पोहोचविण्यासाठी विनाशकारी रिफायनीला प्राणपणाने विरोध करण्यासाठी आम्ही सगळेजण आता संघटित झालेलो आहोता अशा शब्दात 'धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com