Top Post Ad

मग आरटीई अंतर्गत सदर शाळेत प्रवेश का देण्यात आले


  अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नका – शिक्षणाधिकारी

मग आरटीई अंतर्गत सदर शाळेत प्रवेश का देण्यात आले

 ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळांवर दंडात्मक कारवाई जिल्हा परिषद ठाणे मार्फत करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २७ माध्यमिक शाळा अनधिकृत असून १० अनधिकृत शाळा सुरू आहेत व १७ शाळांनी शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केले आहे. तरी पालकांना सुचित करण्यात येते कि पुढील शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ करिता या अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये. अनधिकृत शाळांची यादी प्रकाशित करण्यामागे हाच उद्देश आहे कि पालकांनी पाल्याचे माध्यमिक शाळेत प्रवेश घेताना अनधिकृत शाळेत प्रवेश करू नये. पालकांनी अधिक माहिती घेऊनच पाल्याचे शाळेत प्रवेश निश्चित करावे असे आवाहन श्रीम.ललीता दहितुले, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी केले आहे.


जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी यांनी अनाधिकृत / मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांची यादीमध्ये श्रीमती कावेरीताई पाटील इंग्लिश मिडीयम शाळेचा ही उल्लेख केला आहे. मग RTE अंतर्गत या शाळेत विद्यार्थी कसे पाठवले ? जिल्हा परिषदेची ही दुटप्पी भूमिका नाही का ? याची चौकशी झालीच पाहिजे. आता अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत प्रवेश मिळवून दिल्यानंतर ही यादी प्रसिद्ध करणे म्हणजे पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक नाही आहे का ? असा सवाल ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते जगदीश खैरालिया यांनी उपस्थित केला आहे.


 (Box) अनधिकृत सुरू असलेल्या शाळांची यादी

1. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कुल, बेलापूर, नवी मुंबई

2. स्टार इंग्लिश हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र

3. डिवाईन ग्रेस हायस्कुल , वज्रेश्वरी ता.‍ भिवंडी  

4. बी.एस.एस इंग्लिश स्कूल ,गणेशनगर चितळसर, मानपाडा ठाणे

5. श्रीम कावेरीताई पाटील इंग्लिश मिडीअम स्कूल,कळवा ठाणे

6. आर एन इंग्लिश स्कूल कोन गाव भिवंडी ठाणे

7. फरान इंग्लिश मिडीअम स्कुल,गौरीपाडा, भिवंडी जि.ठाणे

8. ओमकार इंटरनॅशनल स्कुल,चौळे, ता. कल्याण जि.ठाणे

9. नारायणा ई-टेक्नो स्कूल,ढोकाळी गाव, ठाणे (प) ता. जि.ठाणे

10. देविका इंग्लिश मिडीअम स्कूल,रेतीबंदर रोड, मौजे काल्हेर,ता. भिवंडी,जि.ठाणे


  (box) शाळा बंद करण्याबाबतचे हमीपत्र सादर केलेल्या अनधिकृत शाळा

1. सेंट पॉल इंग्लिश सेंकडरी हायस्कुल चिंचपाडा नवी मुंबई मनपा क्षेत्र

2. श्री साई ज्योती सेकंडरी स्कुल, कोपरखैरणे, नवी मुंबई

3. प्रगती विद्यामंदिर अंबरनाथ

4. युनिक इंग्लिश मिडीयम स्कुल, कल्याण

5. होली मारीया कॉन्व्हेन्ट हायस्कुल, ठाणे मनपा क्षेत्र

6. सिम्बॅायसिस कॉन्व्हेंट हायस्कुल ठाणे

7. आतमन ॲकॅडमी ठाणे , ठाणे मनपा क्षेत्र

8. अरुण ज्योत विदयालय ठाणे, ठाणे मनपा क्षेत्र

9. नॅशनल इंग्लिश स्कुल, दापोडे ता.भिवंडी

10. नूर हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज,नूर बाग अल्मास कॉलनी रोड कौसा मुंब्रा ठाणे

11. श्रीम. भागीरथी वझे एज्युकेशन व वेल्फेअर ट्रस्ट,मानपाडा गाव डोंबिवली (पु) जि.ठाणे

12. श्री. विद्या ज्योती स्कूल,डावले, ठाणे

13. डायमेशन इंग्लिश स्कूल,सर्व्हे न 60/3 मौजे कौसा,मुंब्रा, जि.ठाणे

14. आदर्श विद्यालय, लोढा हेवन कल्याण

15. पारसिक स्पेशल स्कुल, मिरा भाईंदर ठाणे

16. आरकॉम इग्लिश स्कुल, ठाणे

17. नालंदा हिंदी विद्यालय ठाणे मनपा क्षेत्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com