Top Post Ad

पक्षप्रचारासाठी चक्क पदपथावर अतिक्रमण...


 ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या चालायला पदपथच उरले नाहीत. बहुतेक पदपथ फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत. तर उरले सुरले पदपथ नगरसेवकांच्या कट्टा संस्कृतीने गिळंकृत केले आहेत. यामुळे नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई करून त्यांना हटवले जाते. मात्र कायमस्वरुपी पदपाथवर उभे राहिलेला कट्टा अर्थात सत्ताधाऱ्यांच्या प्रचार शेडना मात्र पालिका अधिकारी पहात देखील नाहीत. ठाण्यातील बहुतेक मोक्याच्या जागा या सत्ताधाऱ्यांनी वाचक कट्टा अथवा अन्य कारणाने अडवल्या आहेत आणि त्यावर बिनदिक्कत पणे एकीकडे महापालिकेचा लोगो तर दुसरीकडे स्वत:च्या पक्षाची जाहिरात करण्यात येत आहे. याबाबत कुणाजवळ दाद मागायची असा सर्वसामान्य ठाणेकरांना प्रश्न पडला आहे.


 एकूणच ठाणे शहरात जागा मिळेल तिथे हे प्रचार शेड उभे असून त्याला वाचक कट्टा असे गोंडस नाव दिले गेले आहे. या प्रचार शेडमधून राज्यकर्त्यांचीच प्रचार यंत्रणा राबवली जाते. ठाण्यातील नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत चेंदणी कोळीवाडा सिडको ते थेट कळवा नाका पर्यंत असलेला सिडको रोडवर नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र वाहतूक कोंडी झाल्यानंतर नागरिकांना चालायला जागाच नसते. कारण या संपूर्ण पदपथावर सत्ताधाऱ्यांनी प्रचार शेडद्वारे अतिक्रमण केले आहे. हे प्रचार शेड महापालिकेच्या निधीतूनच नगरसेवकांनी बांधले असल्याने सर्वसामान्य माणूस या विरोधात आवाज उठवू शकत नाही. अन्यथा राजकीय वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  परिणामी संपूर्ण पदपथ या नगरसेवकांच्या प्रचार शेडने व्यापला आहे. 

 


महापालिकेच्या निधीतून अर्थात सर्वसामान्य नागरिकांच्या करातून हे शेड उभारले जात आहेत. मात्र त्यावर केवळ स्वत:च्या पक्षांच्या नेत्यांचे फोटो आणि आपले स्वत:चे फोटो लावण्यात येत आहेत. इतकेच नाही तर नगरसेविकांच्या पतीचेही फोटो त्यावर विराजमान आहेत. पालिका प्रशासन याला मंजूरी कशी काय देते असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिक विचारू शकत नाही. ही सर्व नगरसेवकांची प्रचारकेंद्र झाली आहेत. यावर ठाणे महानगर पालिका आयुक्त अंकुष ठेवणार आहेत की नाही. पदपथावरील अतिक्रमण कधी हटवणार, असा सवालही येथील नागरिकानी उपस्थित केला.

महागिरी कोळीवाडा आणि दादोजी कोंडदेव स्टेडीयम परिसरातील सर्व पदपथांवर नगरसेवकांनी आपले प्रचार शेड उभारले आहेत. वाचककट्टा, विश्रांती कट्टाच्या नावाखाली या परिसरातील एकही पदपथ मोकळा राहिलेला नाही. इतकेच नव्हे तर चक्क वाहतुकीसाठी असलेल्या रोडवर देखील नगरसेवकांनी कट्ट्याचे बांधकाम सुरु केल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे ठाणे महानगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याने परिसरातील नागरिकांना चालणे मुश्कील झाले आहे. सिडको ते कळवा नाका पर्यंतचा  विशेष करून स्टेडियमच्या लगत असलेला सर्व पदपथ या प्रचारशेडनी व्यापला आहे.  नगरसेवकांनी वाचककट्टाच्या नावावर स्वत:च्या प्रचाराकरिता हे शेड  बांधले असल्याचा आरोप येथील सामाजिक संघटना करीत आहेत. मात्र याबाबत पालिका जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सिडको रोडवर खारटन रोड परिसरात तर तंदुरी धाबा असलेल्या ठिकाणी हे प्रचार शेड बांधण्यात आले आहे. ज्याचा उपयोग येथील धाब्यावर येणाऱ्या गिऱ्हाईकांना होत आहे. हा अनधिकृत असलेला धाबा बाजुला महापालिकेने नगरसेवकांच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या शेडचा एखाद्या हॉटेलप्रमाणे वापर करीत आहे. 

 


शहरातील रस्ते, दुभाजक  तसेच चौकात अनधिकृतपणे जाहिरात फलक, बोर्ड, बॅनर्स, स्टिकर तसेच भिंतीपत्रके लावून शहर विद्रुप करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेविरुद्ध महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण कायदा- १९९५' अंतर्गत तात्काळ कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करणे गरजेचे असताना महापालिका प्रशासन याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सत्ताधाऱ्यांचेच हे प्रचार शेड असल्याने दाद मागायची कुणाकडे -

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com