Top Post Ad

राष्ट्रवादीने केली खोक्याऺची होळी

 


 राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहरात पन्नास खोक्यांची होळी करीत "गद्दार दिन" साजरा करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर आनंद परांजपे यांना पोलिसांनी अटक केली. 

मागील वर्षी 20 जून रोजी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या 40 आमदारांनी सुरतमार्गे गुवाहाटी गाठून महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. त्याचा निषेध करण्यासाठी डाॅ.जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले. पन्नास खोके असे कागद चिकटवलेले खोके यावेळी जाळण्यात आले. या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांनी मुंबई-सुरत-गुवाहाटी असा संदेश लिहलेले टी शर्ट परिधान केले होते. या आंदोलनानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आनंद परांजपे यांना अटक करून सोडून दिले. 

 या प्रसंगी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी गद्दारांची तुलना सूर्याजी पिसाळ यांच्याशी केली. ते म्हणाले, वर्षभरापूर्वी सुर्याजी पिसाळांच्या औलादींनी महाराष्ट्राशी गद्दारी करून सुरतेकडे प्रयाण केले होते. त्याचा निषेध म्हणून आजचे आंदोलन करण्यात आले. पन्नास खोक्यात स्वतःला विकणाऱ्यांचे चारित्र्य काय असेल हे सांगायलाच नको. पण, हे पन्नास खोके किती पुरणार आहेत. येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना मतपेटीतून धडा शिकवणारच आहे. आता जे काही सर्व्हे येत आहेत. ते सर्व मॅनेज आहेत. 

शिंदे सरकार आणि भाजपचा गाशा 100 जागांच्या आतच गुंडाळावा लागणार आहे. कारण, गेल्या वर्षभरात महिलांना मारहाण करण्याची संस्कृती महाराष्ट्रात वाढीस लागली आहे. रोशनी शिंदे आणि आयोध्या पौळ ही ती उदाहरणे आहेत. अयोध्या पौळला मारणार्या महिला या जयभीम नगरमधील नव्हती. गेले वर्षभर दादागिरी करणे, खोट्या केसेस टाकणे असेच प्रकार या लोकांनी केले आहेत. त्यावरून पन्नास खोक्यावाले मनातून किती क्रूर आहेत, हे स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com