शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामांचा पाढा वाचला. एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले, “मला आठवतंय श्रीकांत डॉक्टर झाला. एमबीबीएस झाला. सर्जन झाला. त्याने मला एकच गोष्ट मागितली. मला रुग्णालय बांधून द्या, असं तो म्हणाला. पण मी तुम्हाला सांगतो, त्याचा बाप त्याला रुग्णालय बांधून देऊ शकला नाही. रुग्णालय बांधायचा विचार करायचो, तेव्हा कुठली तरी निवडणूक यायची. मग रुग्णालयाचा विषय मागे पडायचा. ह्या एकनाथ शिंदेंनी कर्ज काढून निवडणुका लढवल्या आहेत. निवडून आल्यानंतर आम्ही निवडलेली माणसं घेऊन मातोश्रीवर जायचो. त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल द्यायचो. हे माझ्या नेतेमंडळींनाही माहीत आहे. मी पक्षात मिळेल ते काम केलं. कष्ट केलं. वयाच्या २१ व्या वर्षी मी बेळगावच्या तुरुंगात ४० दिवस होतो. माझ्यावर कितीतरी केसेस झाल्या. अनेक वेळा तुरुंगवास झाला. पण तुम्ही (उद्धव ठाकरे) काय केलं? व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेत्यांनीही तेच भोगलंय म्हणून शिवसेना मोठी झाली,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे बोलले कि मी माझ्या मुलाला हॉस्पिटल बांधून देऊ शकलो नाही.. पण वस्तुत: श्रीकांत शिंदे यांचे MBBS पूर्ण झाले 2011 साली, MS पूर्ण झाले 2015 साली, त्यांचे MBBS पूर्ण झाले त्यावेळेस त्यांचे पिताश्री एकनाथ शिंदे हे दुसऱ्यांदा आमदार होते. श्रीकांतरावांचे MS पूर्ण होण्याआधीच ते खासदार झाले. तसेच त्यांचे MS पूर्ण झाले तेंव्हा एकनाथ शिंदे हे कॅबिनेट मंत्री होते. स्वतः श्रीकांत त्यावेळेस खासदार होते त्यामुळे दवाखाना टाकण्यापुरते पैसे स्वतः खासदार तसेच मंत्री असणाऱ्या बापाकडे नसतील असं शक्यच नाही. सव्वा कोटीची land cruiser गाडी घ्यायला पैसे होते, ठाणे सारख्या महानगरात ३ मजल्यांचा बंगला बांधायला पैसे होते.... पण दवाखाना बांधून द्यायला पैसे नव्हते अशी टिका सोशल माध्यमातून होत आहे.
देशात अनेक लोकप्रतिनिधी असे आहेत जे आपले प्रोफेशन सांभाळून आपला छंद जोपासतात. भाजपचे खा. राजीव प्रताप रुडी हे पायलट म्हणून अधूनमधून आपली सेवा देतात. अमोल कोल्हे हे खासदार असूनही अभिनय कौशल्य जपत नाटक, चित्रपट करतात. मा. मधू दंडवते व श्री संदानंद वर्दे यांनी आपली प्राध्यापकी सोडली नाही. वीणाताई सुराणा यांनी वैद्यकीय सेवा दिली. कपिल सिब्बल, पी चिदम्बरम तर केंद्रीय मंत्री राहिले होते तरी त्यांनी वकिली सोडली नाही. मा. ग प्र प्रधान हे सभापती राहिले पण मरेपर्यंत बहुमूल्य ज्ञानवाटपाचा शिक्षकी पेशा सोडला नाही. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. श्रीकांत शिंदेंना जर खरंच मेडिकलमध्ये रस असेल तर आताच एकनाथ शिंदेंनी सुरु केलेल्या 'आपला दवाखाना' योजनेतून दवाखाना जरूर सुरु करावा. अजून काही त्यांचे वय गेलेले नाही. आता तर वडीलही मुख्यमंत्री आहेत. नाहीतर महाराष्ट्र एका जगद्विख्यात सर्जनला मुकेल. असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.
.
0 टिप्पण्या