Top Post Ad

मग बार्टीची अ‍ॅलर्जी का?

सोमवार दिनांक ५ जून २०२३ रोजी रात्री ९ वाजता सह्याद्री वाहिनीवर सारथी या शासकीय शिक्षण सेवा देणाऱ्या संस्थेची माहिती देण्यात आली. निवेदिका व संस्थेचे आजी-माजी संचालक संस्थेच्या कामाचे समर्थन करताना दिसले. कुणबी-मराठा समाजातील मुलांच्या हितासाठी सारथी सर्व प्रकारे सहकार्य करत असल्याचे वारंवार सांगण्याचा प्रयत्न झाला. त्याचवेळी काही विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींना बोलते करून, सारथीमुळेच आम्हाला पुढील शिक्षणाची संधी मिळाल्याबाबतच्या कृतज्ञतेचा पाढा वदवून घेण्यात आल्याचे दृश्य महाराष्ट्राने पाहिले.
साथीच्या माध्यमातून कुणबी-मराठा समाजातील युवकांना संधी मिळाली याबद्दल आनंदच आहे. नव्हे ती काळाची गरज आहे. मंडल कमिशनने ११ कसोट्या लावल्या नसत्या तर सारथीचा जन्मही झाला नसता. ओबीसींच्या न्याय हक्काबाबत बोलताना साथीचे संचालक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अपेक्षित असलेल्या सामाजिक न्यायाची स्तुती करत होते! शाहू महाराजांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय फक्त ओबीसींपुरता मर्यादित आहे काय? तसे नसते तर मागासवर्गीयांतील अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करणार्या बार्टी ला तिलांजली का दिली गेली? याबाबत संबंधित विभागाने स्पष्टीकरण दिले पाहिजे.

५ मे रोजी दादर (पू) येथे प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमधील अक्षय भालेरावच्या खूनाबद्दल निषेध धरणे आयोजित करण्यात आली, तद्वतच राज्यभरात ब्रिटनला परत आणण्यासाठी राज्यभरात आंदोलने व्हायला हवीत. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांपुढे आवाहनवजा कार्यक्रम आम्ही ठेवीत आहोत. आव्हान स्वीकारा आणि बार्टीला परत आणा. २०२४ च्या निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून राज्य सरकार ओबीसींना खूष करण्यासाठी, तसेच सह्याद्रीच्या माध्यमातून कुणबी-मराठा समाजाचे लांगूलचालन सुरू केले आहे हा धोका ओळखून पुढील लढ्याची आखणी व्हावी यासाठी हा लेखनप्रपंच...!

गुणाजी काजिर्डेकर, 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com