Top Post Ad

सोहळा आनंदाचा २०२३' कार्यक्रमाचा १५०० महिलांनी लुटला आनंद

 


  'सध्या सोशल मीडियाने प्रत्येकाला वेड लावले आहे. 'ती किंवा तो सध्या काय करत असेल?' एखाद्या मालिकेत नट-खलनायकाची आजची काय डेव्हलपमेंट आहे, याची सर्वांनाच उत्सुकता असते. तसेच आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तिमत्त्वांच्या दिवसभराच्या उपक्रमांची माहिती घेण्याची सवय अनेकांना लागली आहे. अशाच लाखो नेटीझन्सना पालघरमधील रंजिताच्या दिनक्रमाच्या रिल्स-व्हिडिओने जणू वेड लावले आहे. अनेकांना रंजिता पाटील हे नाव नवीन नसावे, कारण तिच्या सब्सक्रायबर्स आणि फॉलोअर्सची संख्या लाखोंच्या घरात आहे. 

ह्याच आपल्या रंजीताने २४ जून शनिवारी ठाण्यातील प्रसिद्ध गडकरी रंगायतनमध्ये खास महिलांसाठी 'सोहळा आनंदाचा २०२३' हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विधवा महिलांकडून दीपप्रज्वलन करण्यात आले. विनामूल्य असणाऱ्या या कार्यक्रमात मंगळागौरचे खेळ, लावणी, डान्स, मनोरंजनात्मक खेळ आणि सोबतच मानाची पैठणी, सोन्याची नथ अशी भरघोस बक्षिसे महिलांनी जिंकली आणि विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला मराठी चित्रपटातील स्टार कलाकारही उपस्थित होते. 

महिला पोलीस अधिकारी, अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस, महिला रिक्षा चालक, महिला सफाई कामगार, घरगुती पदार्थ विकणाऱ्या ताई, महिला डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील महिलांचा येथे सन्मान करण्यात आला. ह्या रंगारंग कार्यक्रमाचा रंजिताच्या Crazy Foody Ranjita ह्या Youtube चॅनेलवर लाखो दर्शकांनी घरबसल्या आनंद लुटला. क्रेझी फूडी रंजिता या यूट्यूब चॅनेलचे तब्बल ५ लाख ८० हजाराहून अधिक सब्सक्राइबर्स आहेत. तर इन्स्टाग्रामवर १ लाख १० हजारांचा टप्पा तिने ओलांडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com