Top Post Ad

एक होता *'चांदोबा'* !.....

 


 .. . मित्रांनो! 
चांदोबा 'बद्दल लिहिण्याचे कारण असे की, या सर्वाधिक खपाच्या मासिकातून आपल्याला सुंदर चित्रांनी सजविणारे चित्रकार के. सी. शिवशंकर यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी चेन्नई मध्ये नुकतेच दु:खद निधन झाले. त्यांनी जवळपास पन्नास वर्षाहून अधिक काळ' चांदोबा 'साठी चित्रं काढली. त्यातील वेताळाला पाठीवर टाकून हातात तलवार घेऊन निघालेला विक्रम कोणीही विसरु शकत नाही.                          .                              ' चांदोबा' या मराठीतल्या मासिकाने सर्वच लहान - थोर मंडळींना त्या काळात वेड लावलेलं होते एवढे नक्की! मूळात 'चांदोबा' हे काही लहान मुलांचेच मासिक म्हणून विख्यात नव्हते, तर ते  संपूर्ण कुटुंबाचेच मासिक होते.             चांदोबातल्या गोष्टी या उत्कंठावर्धक तर असतच पण संस्कारवर्धकही असत. गोष्टीची सुरूवात ही 'कोणी एके काळी काशी राज्यात ब्रह्मदत्त नावाचा राजा राज्य करीत असे....' अशी वाचली रे वाचली की ती गोष्ट पूर्ण केल्याशिवाय वाचकांना चैन पडत नसे....                .                      चांदोबाचे संस्थापक नागीरेड्डी आणि चक्रपाणी हे होते. १९४७ ला सुरूवातीला तेलगु आणि तामीळ भाषेतून 'चंदामामा' सुरू झाला.   १९५२ च्या एप्रिल महिन्यात 'चांदोबा' चा पहिला अंक मराठीतून प्रकाशित झाला. मामा आणि आजोबा हे दोघेही आपल्याला तसे अधिक जवळचे असतात. या दोघांचे मिश्रण म्हणजे 'चांदोबा' आपल्याकडे लहान मुलांना चंद्राकडे बोट दाखवून 'चंदामामा' म्हणून मुलाला दाखवितात त्यावरून या मासिकाचे नाव हिंदीत 'चंदामामा' ठेवण्यात आले आणि मराठीत 'चांदोबा'!                 .       .                  भारतातल्या सर्व लहान मुलामुलींना - थोरांनी चांदोबाचा आनंद मनमुराद घेतला.                                    .                  साधारण वहीच्या आकारात या मासिकानं जी वाचनाची आवड निर्माण केली त्याला तोड नाही. ह्याला कारण त्यातील बोलकी रंगीत चित्रे. चित्रांना सजविणारे चित्रकार के. सी. शिवशंकर! त्यांची चित्रे शालीन होती. साडी किंवा परकर पोलक्या मधील मुली, स्त्रीया, वृध्दां नेहमीच संस्कारी दिसायच्या. पुरूष मंडळी झब्बा धोतर किंवा सुरवात मध्ये असायचे. केसांचा भांग हा राजकुमारा सारखा असायचा चित्रांमधील पात्र सौष्ठवपूर्ण असायची अंकातील चित्रांची मांडणी टिपीकल असायची अंकाच्या उजव्या व डाव्या बाजूची चित्रं फ्लॅशकट असायची अंकाच्या मधले चित्र फुलपेज असायचे. तेच बहुदा मुखपृष्ठावर वापरले जायचे. अंकाच्या शेवटी जगातल्या आश्चर्याकारक वास्तूची सचित्र माहिती दिलेली असायची. त्यानंतर जोडफोटोचं एक पान असायचं, एकाच विषयावर दोन फोटो आणि त्याखाली शीर्षक किंवा एकादी काव्यपंक्तीअसायची, काही गोष्टी क्रमशः चालू असायच्या. त्याकथां मधील पात्रांची नांव महाराष्ट्रीयन वाटायची हातात अंक आल्यावर एका बैठकीत अंक वाचून काढला जात असे. त्याकाळात टीव्ही नव्हते त्यामुळे लहान मुलांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. महिन्याला नियमित येणारा 'चांदोबा' वाचणे हा तर आनंदाचा एक भाग होताच. परंतु चांदोबाचे जुने अंक मिळवून ते आधाशासारखे वाचणे या सारखा अलौकिक आनंद दुसरा त्याकाळी नसावा. 'चांदोबा' चा जुना अंक म्हणजे मनोरंजनाचा खजिना वाटायचा...       .                         .                    आमची पिढी मोठी झाली, टीव्ही आला आणि मुलांचं वाचन कमी झालं. नंतर चॅनल्स वाढली, मुलांसाठी २४ तास कार्टून, काॅमिक्स गोष्टींची भारतीय व परदेशी वाहिन्या सुरू झाल्या काही वर्षांनंतर हेच मोबाईलवर पहायला मिळू लागेल. साहाजिकच मुलांना वाचायला मासिक  हातात घेणे नकोसे वाटू लागेल.... तेंव्हा मुलांना सांगावे लागेल एक होता ' *चांदोबा* '!.....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com