Top Post Ad

आर्थिक मागास मराठ्यांना आरक्षण जाहीर करा ... मुंबई मराठी एकता संघाची मागणी

 


 महाराष्ट् राज्यातील मराठा समाजामधील आर्थिक मागास घटकांना आरक्षण देण्यात यावे, अशी आग्रही मागणी मुंबई मराठी एकता संघाचे अध्यक्ष अमोल नाईक यांनी केली आहे. आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देतानाच ही मागणी करण्यात आली आहे.   मराठा आरक्षणाच्या मागणीत मराठी एकता संघाचे उपाध्यक्ष शरद मांजरेकर,शशीकांत साळगावकर, संतोष भोईटे,योगेश गावडे,प्रकाश धुळप ,संदेश वाडकर,महेश खांडेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा दिला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते ओबीसीमधून देण्यात यावे,अशी आग्रही मागणी मुंबई मराठी एकता संघाच्या कायदेशिर सल्लागार अँड.वंदना जाधव यांनी केली आहे. मुंबई मराठी एकता संघ फोर्ट  शाखेच्यावतीने राज्यातील विविध मराठा समाजातील आंदोलनाला नेहमीच पाठींबा दिला जातो.   याआधी मराठा समाजाने  मोर्चे, आंदोलने आयोजित करण्यात आली होती. आझाद मैदानावर सकल मराठा मोर्चानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी अधिक पुढाकार घेवून तातडीने शासनस्तरावर कार्य हाती घ्यावे, अशी मागणीही अँड. वंदना जाधव यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com