२६ मे-२०२३ रोजी ठाण्यातील 'प्रशांत काॅर्नर' दुकानात, सत्तेच्या अहंकारातून 'राजकीय इशाऱ्या'ने, 'ठामपा'करवी जी दहशतवादी तोडफोड करण्यात आली होती... त्या, कटू व अत्यंत निंदनीय प्रसंगाच्या 'मासिकपूर्ति'च्या निमित्ताने...
संपूर्ण महिना उलटून गेला तरीही. 'प्रशांत काॅर्नर'च्या एकूणएका कर्मचाऱ्याची, यासंदर्भात चौकशी का केली गेली नाही... संपूर्ण प्रसंग विदीत करणारी त्यांची शपथपत्रं का घेतली गेली नाहीत व अजूनही आजुबाजुच्या लोकांकडून वादग्रस्त प्रसंगाबाबत सखोल विचारणा का होत नाहीय? त्या वादग्रस्त प्रसंगावेळचं, संपूर्ण दुकानातलं (दुकानाच्या आतबाहेरचं) CC Footage का उपलब्ध केलं जात नाहीय; तसेच, आजुबाजुचंही CCTV Footage का घेतलं जात नाहीय? याशिवाय, संबंधितांच्या मोबाईलचा (ड्रायव्हर, बाॅडीगार्डसकट) CDR घेतला तर, 'दूध का दूध, पानी का पानी' सहजी होऊ शकेल....
पहाटे साडेपाच वाजता जर, गुन्ह्याची नोंद होते व कथितरित्या, त्यानंतर काहीकाळाने त्यावर सक्षम अधिकाऱ्याची सही होते...आणि, 'धर्मराज्य पक्षा'चे ठाणे-संघटक व कार्यकर्ते असलेल्या 'अजय जया'च्या घरी तर पोलिस, त्याअगोदरच तीन-साडेतीन तास म्हणजे, पहाटे २.०० च्या सुमारास, एखाद्या दरोडेखोर वा अतिरेक्याला पकडण्यासाठी धाड घालावी तसे, हाती कुठलीही कायदेशीर कागदपत्रं न घेता किंवा रीतसर नोटीस न देताच... आक्रमकपणे व छुप्यारितीने पोहोचलेच कसे?
____________________
आमच्या 'धर्मराज्य पक्षा'चा जीव जरी छोटा असला; तरी, त्याची तत्त्वं-धोरणं फार मूलगामी, व्यापक व जनकल्याणकारी आहेत! "श्रीकृष्णाचा जीवनसंदेश, शिवछत्रपतींची राजनिती, समाजवाद तसेच मार्क्सच्या साम्यवादाचा गाभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'समतेचा संदेश' आणि 'दरिद्री-नारायणाच्या उत्थाना'ची म. गांधींची संकल्पना तसेच त्यांचा अहिंसेचा संदेश"... ही 'धर्मराज्य पक्षा'ची 'जीवनमूल्ये' आहेत... "Zero Tolerance Towards CORRUPTION And EXPLOITATION OF MAN & NATURE", हे आमचं 'ब्रीद' आहे आणि त्याबाबत, आम्ही कुठलीही तडजोड करणे नाहीच.
'सत्याचा मार्ग' खडतर खरा; पण, तोच अंतिमत: शाश्वत व समाजाच्यादृष्टीने अंति हितकारक असतो. सध्या देशात जे काही चाललंय, ज्यापद्धतीने 'राज्यघटना' गुंडाळून ठेवली जातेय... एकाधिकारशाही, हुकूमशाहीचा नंगानाच सुरु आहे, देशात विघटनक्षम अशी मोठी अस्वस्थता आहे, देशाच्या पूर्वोत्तर भागात (मणिपूर) हत्याकांड व अग्निकांड सुरु आहे... दुर्दैवाने, थोड्याफार फरकाने तेच ठाणे शहरात सुरु आहे. ठाण्यातील 'व्यवस्था', हे 'शासन' नसून 'दुःशासन' आहे! ठाण्यात 'रामराज्य' तर सोडाच; पण, 'हिंदुत्वा'च्या बुरख्याआड चक्क 'रावणराज्य' सुरु आहे... गगनचुंबी इमारती, चकाचौंध माॅलटाॅल, रुंद-विस्तीर्ण रस्ते, पंचतारांकित बागा यामुळे ही 'ठाण्याची लंका' वरकरणी कोणाला 'सोन्या'ची भासेल... पण, या ठाण्यातील राजकीय रावणांच्या लंकेच्या नसानसातून दहशतीचं, अन्याय-अत्याचाराचं नासलेलं रक्त वहातंय... तिच्या रंध्रारंध्रातून घाण व दुर्गंधीयुक्त 'पू' वहातोय... पण, त्याबद्दल चकार शब्द काढायची कोणाची हिंमत नाही, ही मंदिर-मस्जिद-चर्च-गुरुद्वारामधील पवित्र शांतता नाही, ही आहे भयाण 'स्मशान-शांतता'... भयंकर दहशतीमुळे हे 'जिवंत मुडद्यां'चं शहर झालंय आणि इथल्या खाकी वर्दीतल्या पोलिसदलाचा चेहराच खाकी पोखाखासारख्या खाकी रंगाच्या धुळीने माखलेला, मलिन झालेला आहे... त्या चेहर्यासकट, त्यांचं या शहरातलं 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' असं लिखित ब्रीद असलेलं अस्तित्वंच पुसल्यासारखं झालंय!
हकनाक १४४ कलम लावण्याचा बहाणा करतअत्यंत सनदशीररित्या, शांततामय आंदोलन करण्याचाही आमचा घटनात्मक-अधिकार देखील ठाणे-पोलिस प्रशासन धुडकावून लावत आहे आणि त्याचवेळेस ठाण्यात 'तोडफोड-संस्कृती'च्या राजकीय पक्षांची मात्र आदोलनं शहरात बिनदिक्कत चालू आहेत व त्यांना ना कुणी अडवत, ना कुणी जाब विचारत... या दुर्दैवी प्रकाराला काय म्हणावं देशात सध्या, जे काही चाललंय (जातधर्म-विद्वेष, अदानी-प्रकरण, भांडवलशाहीचं थैमान व अमानुष 'आर्थिक-विषमता', ऑलिंपिकपदक विजेत्या महिला-पहिलवानांचं बड्या सत्ताधुंद राजकारण्याकडून लैंगिक-शोषण, विरोधकांवरील ईडी-सीबीआय-आयटी या सरकारी-दमनयंत्रणांकरवी एकतर्फी कारवाई, गोदी-मिडीया'तून 'असत्याचा बाजार' मांडला जाणं इ. इ.) ही 'लोकशाही' आहे की, 'हुकूमशाही'? ही 'लोकशाही' आहे की, पोलिसांची 'ठोकशाही'?
*सद्यस्थितीत न्यायदान-यंत्रणा, हाच एकमेव आशेचा लुकलुकता किरण... न्यायालय, हाच या अंधारयुगातील शेवटचा आधार आणि त्याचं आधाराने अजय जयाला आज आश्वस्त केलंय व त्याच्यातला 'सत्य व न्याया'साठी धडपडणारा 'चळवळ्या' जिवंत ठेवलाय...* त्याप्रित्यर्थ, ठाण्यातील न्यायालयाचे, समस्त ठाणेकरांनी आभार मानावे, तेवढे थोडेच आहेत. व्यवस्थेतल्या एखाद्या प्रभावशाली व्यक्तिच्या नातलगाच्या 'कथित' अवमानावरुन, महापालिका-कर्मचाऱ्यांनी 'वरुन आलेल्या' आदेशाने थेट दुकानात घुसायचं आणि दुकानाची प्रचंड तोडफोड-नासधूस करत ठाण्यात दहशत निर्माण करायची... हे कितपत योग्य ठरेल?
आमच्या अजय जयाने, कुठल्याही व्यक्तिच्या विरोधात नव्हे; तर, नेमक्या त्या 'दहशती'विरोधातच आवाज उठवला. 'अजय जया' या, शहरातल्या सदसद्विवेक बुद्धीचा राखणदार (Conscience-Keeper) असलेल्या नवतरुणाने आवाज उठवला; तर, "चोर सोडून संन्याशाला फाशी" देण्याचा प्रयत्न, ठाणे शहरातील 'व्यवस्थे'करवी व्हावा? ...म्हणूनच, आता ठाण्यापासून सुरुवात-रुजूवात होऊन प्रत्येक शहरं-उपनगरं-गावपाड्यांमध्ये 'व्यवस्थे'तल्या भ्रष्टाचार, दहशत-दादागिरी आणि हडेलहप्पी कारभाराविरुद्ध जीवावर उदार होऊन निर्भयपणे 'सत्यकठोर' आवाज उठवणाऱ्या धाडसी व नितीवान तरुण-तरुणींची मोठी साखळीच तयार व्हायला हवी... तरच, तेथील कारभारात मूलभूत सुधारणा होतील व देशातील लोकशाहीदेखील जिवंत राहील!
...वाईट जास्तीचं यासाठी वाटतं की, कथितरित्या "प्रचंड 'व्यावसायिक दबाव-दडपणा'खाली, आपलाच 'आत्मद्रोह' करत 'दुकानात काहीच घडलं नाही' असा, 'तो मी नव्हेच' टाईपचा निलाजरा खोटा अवतार धारण करणाऱ्या मालकाचा व्हिडीओ हाती लागताच"... ज्याला, 'लोकशाही'चा 'चौथा-स्तंभ' म्हणायचं त्या, 'लोकमत' दैनिकासारख्या मोठ्या दैनिकाचा समावेश असलेल्या वृत्तपत्रसृष्टीनं घाईघाईने, या 'प्रशांत काॅर्नर' तोडफोडीची धड विचारपूस न करता वेड्यावाकड्या बातम्या छापल्या. हे सारं आक्रित, त्यांना करोडोंच्या जाहिराती व निधी पुरवणाऱ्या राजकीय-धटिगणांना खूष करण्यासाठी होतं व त्यातून, अजय जयाची व पर्यायाने 'धर्मराज्य पक्षा'ची नाहक यथेच्छ बदनामी केली गेली... हे ही एकवेळ आम्ही समजून घेतलं; पण, त्यानंतर गेले महिनाभर सातत्याने 'अजय जया'ला जामीन मिळाल्यावर 'पत्रकार परिषद' घेऊन (ज्यात, ही 'बातमीछाप' मंडळी आलीच नाहीत), आमची बाजू लेखी मांडून; तसेच, प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करुनही काडीमात्रदेखील आमची बाजू छापत नाहीत... या वृत्तपत्रीय पाजीवृत्तीला, नीचपणाला काय म्हणावं?
...असो, 'सत्ते'च्या राक्षसी दडपणाखाली 'सत्य' झाकू पहाणाऱ्यांना,* आम्ही म. म. देशपांडे या नावाच्या कवीने लिहीलेल्या फक्त, 'चारच ओळी' खालीलप्रमाणे उद्धृत करतो...
- सारा अंधारच प्यावा... अशी लागावी तहान...
- एका साध्या सत्यासाठी... देता यावे पंचप्राण !
...तेव्हा, आम्ही कुठल्या 'राजाची रयत नव्हे'; तर, आम्ही आहोत, "स्वतंत्र-सार्वभौम देशाचे नागरिक'!* म्हणूनच, या देशातलं 'लोकशाही-तत्त्व', या देशाचं सर्व नागरिकांना 'मूलभूत हक्क' प्रदान करणारं संविधान व 'प्रजासत्ताकत्व' पुढील पिढ्यापिढ्यांसाठी जिवंत ठेवण्यासाठी,* हा आमचा लढा, हा आमचा अट्टाहास आहे... 'धर्मराज्य पक्षा'चा तो निर्धार आहे!! कुणाही व्यक्तिविशेषाच्या वगैरे विरोधातला, हा आमचा लढा मुळीच नव्हे, हा लढा दुष्ट, वाईट प्रवृत्तींविरोधात आहे... आणि त्याबाबत, न्याय-सत्याच्या प्रस्थापनेसाठी 'प्राणत्याग' करायचीही आमची तयारी आहे,* एवढंच संबंधितांनी ध्यानात घ्यावं... धन्यवाद!
.राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)*_
0 टिप्पण्या