नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट ) जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप भीम आर्मी या संघटनेने केला आहे ईतर आरोपीसोबत बोंडारकर यांना देखील या प्रकरणात आरोपी करण्यात यावे अशी मागणी या संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देवून करण्यात आली आहे
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली या गावात १ जून रोजी अक्षय भालेराव या युवकाची भरदिवसा हत्या करण्यात आली या हल्ल्यात भालेराव याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा भाऊ आकाश हा गंभीर जखमी झाला . सदर प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात ९ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ७ आरोपी अटकेत आहेत सदर ९ आरोपीसोबतच शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंडारकर हे या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याने त्यानादेखील आरोपी करावे भालेराव यांच्या कुटुंबीयास तातडीने नुकसान भरपाई म्हणून अर्थिक मदत देण्यात यावी.
भालेरावचा भाऊ जखमी आकाश यास शासकीय नोकरी देण्यात यावी.भालेराव प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी भालेराव यांच्या कुटुंबास तात्काळ कायमस्वरुपी पोलीस संरक्षण देण्यात यावे. प्रत्येक ग्रामीण भागातील बौद्ध वस्तीत पोलीस चौकीची स्थापना करण्यात यावी.सर्व आरोपींची मालमत्ता जप्त करण्यात यावी.कार्यकर्त्याचा समावेश असलेल्या अनुसूचित जाती जमाती आयोगा मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आशा मागण्या भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी केली आहे
0 टिप्पण्या