राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात सर्व बड्या वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले आहे. आज वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावार देण्यात आलेल्या जाहिरातीवर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर छापण्यात येऊन यामध्ये राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्व्हेक्षणाच्या आधारे जाहीर करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे. मतदान सर्वेक्षणानुसार, भारतीय जनता पक्षाला 30.2 टक्के आणि शिवसेनेला 16.2 टक्के जनतेने दिला कौल म्हणजेच महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिवसेनेच्या या युतीला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे. मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणात, एकनाथ शिंदे यांना 26.1 टक्के तर देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. म्हणजेच, महाराष्ट्रातील 49.3 टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शविल्याचा दावा करण्यात आला आहे.
या जाहिरातीचा खर्च कोणी केला. हा पैसा सरकारच्या तिजोरीतून झाला की त्या दोन हजारांच्या नोटा बाहेर आल्या त्यातून खर्च केला, केलेला सर्वे खरा आहे की, खोटा यामध्ये आम्हाला पडायचे नाही, पण हे सर्वेक्षण कुठे झाले, मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात झाले की गुजरातमध्ये झाले, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या आहेत. पण हा वेगळा प्रकार आहे. त्यांनी स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं आणि प्रसिद्ध केलं. कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं किती टक्के लोकांचा कौल आहे, याची कसलीच माहिती देण्यात आली नाही. साधारणपणे एक्झिट पोल येतात, परंतु ते कोणी केलेत ते सांगितलं जातं. तसा हा सर्व्हे कोणी केला आहे, याची माहिती दिली जाते. परंतु अशा प्रकाची सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रमच आपल्या राज्य प्रमुखांनी केला आहे. मुळात जाहिरात कशासाठी केली जाते, जेणेकरून आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचावी. पण यांनी केवळ स्वतःची प्रसिद्धी केली आहे. शिवसेना आमचीच असा दावा करणाऱ्यांनी जाहिरातीत मोदी साहेबांचा फोटो टाकला आहे. स्वतःचाही फोटो टाकला, पण बाळासाहेबांचा फोटो सोईस्कररित्या वगळला आहे. राज्याचा विकास आणि लोकांचे प्रश्न पद्धतशीरपणे यांनी बाजूला ठेवले आहेत. - अजित पवार (विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र)
हा जो सर्व्हे आला आहे, तो सर्व्हे कोणत्या एजन्सीने केला? त्याचा काहीच अधिकृत खुलासा त्यांनी केला नाही. केवळ स्वत:चा ढोल बडवून आपली वाहवा करून घेण्याचा प्रयत्न या सर्व्हेच्या माध्यमातून होतोय. तुमच्या घरात येऊन मी तुमचं घर कसं उद्ध्वस्त करू शकतो? हे एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं आहे. एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा दुटप्पीपणा जाहिरातीतून स्पष्ट झाला आहे - विनायक राऊत
तुमची जाहीरात खोटी आहे, जनतेच्या मनात धूळ फेकणारी आहे. या सर्वेक्षणाला आधार काय, ही तर पक्षाची जाहीरात असून जनता आत्ता तुमच्या बाजूने राहिली नाही, एकनाथ शिंदे चांगले प्रोड्यूसर आणि दिग्दर्शक आहेत, अंबादास दानवे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकारणात मोठी झेप घेतली आहे. जाहिरातीत महाराष्ट्रात शिंदे आणि हिंदुस्थानात मोदी असा मथळा आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटले. परंतु त्या जाहिरातीवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नाही. शिंदे सातत्याने म्हणतात की त्यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (एकनाथ शिंदेंचा पक्ष) आहे. परंतु त्यांच्या जाहिरातींवर बाळासाहेबांचा फोटो नसतोच. या सगळ्याचे आश्चर्य आहे. फडणवीसांना ते विसरले तर विसरू दे पण किमान बाळासाहेबांना विसरता कामा नये, - छगन भुजबळ
'आज पेपर वाचून खूप आनंद झाला. महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले आहेत, हे जे सत्तेत आहेत त्यांनीच कबूल केलं. 2024 मध्ये रयतेचे राज्य येत आहे. सरकारचे अपयश पहिल्या पांनावर आले आहे. स्वतः कमी मार्कने पास झाला आहेत, हे कबूल करणारा पक्ष आहे. त्यांनी आकडेवारी दिली आहे 53.6 लोकांनी यात त्यांना नाकारले आहे. देवेंद्र फडणवीस दोन नंबरला आहेत हे सांगून यांचा अपमान नाही का? 35 टक्के लागतात पास व्हायला हे ग्रेस मार्क घेऊन पास झाले आहेत. दोघांचे मिळून 46 टक्के होतात. लोकांनी यांना नाकारले आहे ते यांनी कबूल केलं आहे.' या जाहिरातीमुळे भाजप-शिवसेना यांच्यातील अंतर्गत कलह समोर आलाय. मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात लोकप्रिय नेता म्हणून एकनाथ शिंदे यांना पसंती असल्याचा दावा जाहिरातीमध्ये करण्यात आलाय. श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातील स्थानिक भाजप नेत्यामधील कलह शांत होत नाही, तोपर्यंत नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस दोन नंबरला आहेत हे सांगून यांचा अपमान नाही का? खासदार सुप्रिया सुळे
या जाहिरातीनंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील धुसफूस समोर आल्याची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजचा (13 जून) कोल्हापूर दौरा अचानक रद्द केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सर्व्हेनुसार मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना अधिक पसंती असेल, तर भाजपने त्यांचे ऐकावे आणि शिंदेंना भाजपने पूर्ण नेतृत्व द्यावं आणि त्यांच्या पक्षाने 70, 80, 90 जागा मागितल्या आहेत त्यांना तेवढ्या द्याव्यात, - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
0 टिप्पण्या