Top Post Ad

ठाणे मनोरूग्णालय सफाई सेवकांचे निषेध आंदोलन


 


 कामगार उप आयुक्त कार्यालयातर्फे ठेकेदार विरोधात चार फौजदारी गुन्हे दाखल करूनही रूग्णालय प्रशासन ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याने कामगारांचे शोषण होत आहे. याविरोधात  ठाण्यातील मनोरुग्णालयातील सफाई कामगारांनी १९ जून पासून प्रादेशिक मनोरूग्णालय समोर उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय सफाई कामगारांनी घेतला होता. परंतु वागळे इस्टेट पोलिसांनी नाकारल्याने व प्रशासन व ठेकेदार यांच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे १९ जूनपासून पासून सफाई कामगारांनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन सुरु केले. 

प्रादेशिक मनोरूग्णालयातील कंत्राटी सफाई कामगार गेली 15 वर्ष मनोरुग्णाची सेवा अतिशय इमानेइतबारे सतत करीत आहोत. मागील 4 वर्षा पासून लोकराज्य स्वयंमरोजगार सेवा सहकारी संस्था मार्फत काम सुरू आहे. चार वर्षांपूर्वी जे वेतन दिले तेच वेतन आजही देत असल्याने दर सहा महिन्यांनी वाढणारे विशेष भत्याची रक्कम ठेकेदार कामगारांना देत नसून ठेकेदार कडून किमान वेतन अधिनियम १९४८ चे अनुपालन केले जात नाही, 

मासिक वेतन ७ तारखेच्या आत देण्याचे कोर्टाचे आदेश असताना ठेकेदार कामगारांना कधीही वेळेवर वेतन अदा करत नाही, वेतनस्लिप दिली जात नाही, राज्य कामगार विमा योजनेची रक्कम पगारातून कपात करूनही पूर्ण रक्कम विमा कार्यालयात भरत नसल्याने कामगारांना वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. कर्मचाऱ्यांना वार्षिक भरपगारी रजा किंवा रजेचे वेतन अदा केले जात नाही. रेनकोट, गमबूट, साबण, टावेल ई. सुरक्षा साहित्य दिले जात नाही. या विरोधात हे आंदोलन असून मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरु राहिल अशी माहिती जगदीश खैरालिया (सरचिटणीस), दीनानाथ देसले (संघटक) अनिता कुमावत (संघटक) यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com