Top Post Ad

पाठ्यपुस्तकातून लोकशाही हद्दपार.... एनसीआरटीईने अभ्यासक्रमातून धडा वगळला


 एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि दहावीचा अभ्यासक्रम पुस्तकातून लोकशाहीचा धडा वगळल्याने तसेच महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थी मोफत गणवेशाचा घोळ विषयी वंचित बहूजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश कमिटी आक्रमक, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश ह्यांचे कडे केली तक्रार.

एनसीईआरटीने काही महत्वपूर्ण अभ्यासक्रम आणि दहावीचा अभ्यासक्रम पुस्तकातून लोकशाहीचा धडा वगळला असून लोकशाही देशात ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब आहे.तसेच महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थी मोफत गणवेशाचा घोळ घालण्यात आल्याने ह्या गैरकारभारविरुद्ध संतप्त वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र कमिटीने एल्गार पुकारला असून वंचित बहूजन युवा आघाडी, महाराष्ट्र प्रदेश कमिटी आक्रमक, राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश ह्यांचे कडे केली तक्रार केली आहे तसेच राज्यभरातील वंचित युवा आघाडी पदाधिकारी ह्यांना देखील अश्याच आशयाच्या तक्रार दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
ह्या बाबतीत सविस्तर असे की, भारता सारख्या लोकशाही प्रधान देशात एनसीएआरटीने कपातीच्या नावावर दहावीचा अभ्यासक्रमातून लोकशाहीचा धडा हद्दपार करण्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.नुसती लोकशाही हा धडा वगळला नसून सोबतच लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरची आव्हाने हे घटकही वगळण्यात आलेत.देशातील विद्यार्थी ह्यांचे मानसिक जडणघडण ह्या साठी दहावी महत्वाचा टप्पा आहे.मात्र लोकशाहीचा आत्मा असलेल्या लोकशाही आणि विविधता, चळवळी, राजकीय पक्ष, लोकशाहीसमोरची आव्हाने हे घटक हे महत्त्वाचे विषय काढून घेण्याचा गंभीर अपराध करण्यात आला आहे.
तसेच दहावीच्या सायन्सच्या पुस्तकातून आवर्तन सारणी म्हणजेच पिरियॉडीक टेबलही काढून टाकण्यात आले आहे.एनसीईआरटीने अभ्यासक्रम आणि पुस्तकांत केलेले बदल हा आदिम युगात घेऊन जाण्याचा प्रकार आहे.
लोकशाहीचा धडा वगळल्याने शालेय जीवनातून लोकशाही सारखा महत्वाचा विषय वगळून अराजकता निर्माण करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच सायन्सच्या पुस्तकातून डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वगळल्यात आला असून मानवाच्या निर्मिती बाबत आता कथा पुराणे आणि आख्यायिका ह्या अभ्यासक्रम म्हणून घातले जाण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. त्या नंतर आता हा नवा मुद्दा समोर आला आहे. याआधी अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास, गुजरात दंगलीशी संबंधित मजकूर, नक्षलवादी चळवळीची ओळख, दलित चळवळीतील लेखकांची नावं वगळली होती.जाणीवपूर्वक काही विशिष्ट घटकांचा इतिहास आणि योगदान नाकारले जात आहे.ह्या वर युवा आघाडी आक्रमक झाली आहे.
सोबतच महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थी मोफत गणवेशाचा घोळ घालण्यात आला असून सरकारचे नियोजन फसले आहे.ह्यावर देखील युवा आघाडी पुढे आली आहे.समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत गणवेशाचा घोळ घातला गेला आहे.शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी 'एक राज्य एक गणवेश' या योजनेअंतर्गत सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाची घोषणा केली होती. मात्र नियोजनाच्या अभावामुळे ती फसल्याचं चित्र आहे. दरवर्षी मे महिन्यात जिल्हास्तरावर शालेय गणवेशाचा निधी मिळतो. तो शाळांकडे विद्यार्थीसंख्येनुसार वर्ग केला जातो आणि शाळा व्यवस्थापन समिती कापड खरेदी, गणवेश शिवून घेणे ही प्रक्रिया सुरु करते. मात्र, अद्याप हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही.
यावर तोडगा म्हणून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना केवळ एकच गणवेशाचा जोड द्यावा,अशा सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. दुसरा गणवेश कधी मिळणार हे अद्याप निश्चित नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत सहा दिवस एकच गणवेश घालून जावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या या गोंधळामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये नाराजी आहे. राज्यातील सर्व शाळा या १५ जूनला सुरु होणार आहेत. त्याआधी शाळेत गणवेश पोहोचणे गरजेचे होते. त्यामुळे सरकारच्या हातात आता काही दिवस आहेत. या कालावधीत स्कूल ड्रेस तयार ठेवणे गरजेचे असणार होते. मात्र, तसे न झाल्याने पुन्हा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
सरकारी शाळांमध्ये मोफत देण्याचे राज्य सरकारने घोषित केले होते. गणवेश यंदा राज्यस्तरावर खरेदी करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन होता. राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आणि सर्व विद्यार्थिनींना शासन मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देते. यंदापासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे. त्यासाठी सरकारकडून सूचना करण्यात आल्या होत्या.
एकंदरीत महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील शिक्षण विभाग पूर्णपणे अपयशी असून विद्यार्थ्यांना वेठीस धरणारे निर्णय घेतले जात आहेत. करीता ह्या गंभीर विषयाची दखल राष्ट्रपती आणि सरन्यायाधीश ह्यांनी घ्यावी ही विनंती.करण्यात आली आहे.
डॉ निलेश विश्वकर्मा - प्रदेश अध्यक्ष
9420123555
राजेंद्र पातोडे- प्रदेश महासचिव
9422160101
राज्य कार्यकारणी सद्स्य - अमित भुईगळ, शमीभा पाटील, ऋषिकेश नांगरे ,पाटील, अक्षय बनसोडे,चेतन गांगुर्डे, विशाल गवळी, विनय भांगे, अमोल लांडगे, अफरोज मुल्ला, सूचित गायकवाड, अमन धांगे वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com