Top Post Ad

20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

 


 राज्यात सनदी अधिकाऱ्यांच्या पुन्हा एकदा बदल्या करण्यात आल्या आहेत. आज 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आता साखर आयुक्त म्हणून नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. संजीव जयस्वाल यांची म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. मात्र, जयस्वाल यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पदाचा पदभार देखील कायम राहणार. तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंडे यांचीदेखील बदली करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मराठी भाषा विभाग सोपवण्यात आला आहे. 

सुजाता सौनिक, IAS (1987) ACS (AR&OM), GAD, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (गृह), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.  एमएमआरडीएचे आयुक्त असलेले एस. व्ही.आर. श्रीनिवास  IAS (1991) यांच्याकडे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक असलेले 1991 च्या बॅचचे आयएएस अधिकारी लोकेश चंद्र यांची महावितरणच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी राधिका रस्तोगी यांची नियोजन विभागात नियुक्ती करण्यात आली.  आय.ए. कुंदन यांची अल्पसंख्याक विकास विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. 

संजीव जयस्वाल, IAS (1996) PS, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय यांची म्हाडाचे उपाध्यक्ष आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आशीष शर्मा, IAS (1997) AMC, BMC, मुंबई यांना PS(2), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. महावितरणचे  मुख्य व्यवस्थापकीय संचलक विजय सिंघल यांची बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  अंशु सिन्हा, IAS (1999) CEO, M.S.खादी ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांची सचिव, OBC बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अनुप कृ. यादव, IAS (2002) सचिव, अल्पसंख्याक विभाग. विभाग यांची सचिव, महिला आणि बालकल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 तुकाराम मुंढे, IAS (2005) यांची मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. अमित सैनी, IAS (2007) CEO, MMB, मुंबई यांची मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चंद्रकांत पुलकुंडवार, आयएएस (2008) आयुक्त नाशिक महापालिका यांची साखर आयुक्त, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. माणिक गुरसाल, IAS (2009), अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग) यांची मेरिटाईम बोर्डचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कादंबरी बलकवडे, IAS (2010) आयुक्त कोल्हापूर महापालिका यांची DG, MEDA, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

 प्रदिपकुमार डांगे, IAS (2011) Jt.Secy.-c-Mission Director, SBM (ग्रामीण), पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग. मंत्रालय, मुंबई यांना संचालक, रेशीम, नागपूर या पदावर नियुक्त केले आहे.  शंतनू गोयल, IAS (2012) आयुक्त, MGNREGS, नागपूर यांची सिडको, नवी मुंबई सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  पृथ्वीराज बी.पी., IAS (2014) जिल्हाधिकारी, लातूर यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. हेमंत वसेकर, IAS (2015) CEO, NRLM, मुंबई यांची आयुक्त, पशुसंवर्धन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. सुधाकर शिंदे, IRS (1997) यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com