Top Post Ad

नायब तहसिलदारासह तलाठ्यावर भुमाफियांचा हल्ला


 जिल्हाधिकारी ठाणे यांची भुमाफिया यांचेवर तहसीलदार ठाणे व नायब तहसीलदार ठाणे यांचे मार्फत करडी नजर
नायब तहसिलदारासह तलाठ्यावर भुमाफियांचा हल्ला 
पोलिस येताच भूमाफियांनी काढला पळ

ठाण्यातील मुब्र्यांमधील डावले गाव याठिकाणी  भूमाफियांनी शासकीय भूखंडावर (कलेक्टर लॅडं) वर अतिक्रमण करुन दोन तीन मंजली इमारत उभारुन त्यात अतिक्रमण केले होते,बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयांचे अंतर्गत तहसीलदार ठाणे येथील नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या माध्यमातून व ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यास सुरु केली दोन मंजली इमारतीला पाडल्यानतंर भूमाफियांनी घोळका करुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर व शीळ तलाठी रोहन वैष्णव यांच्या वर जमाव करुन हल्ला केला ह्या हल्यात अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली 

त्यानतंर स्थानिक पोलिस घटना स्थळी दाखल झाल्यनतंर भूमाफियांनी तेथून पळ काढला.नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्या सह तलाठ्यावर हल्ला केल्याप्रकरणी शीळ डायघर पोलिस ठाण्यात तीन भूमाफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी डावले गाव मधील त्या नागरिकांना एक महिन्याची मुदत दिली आहे,त्यानंतर ही कारवाई पुर्ण करणार असल्याचे नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनी सांगितले.या कारवाई वेळी मंडळ अधिकारी रविंद्र काळे,तलाठी रोहन वैष्णव,तलाठी विश्वनाथ राठोड,तलाठी जीवन कोरे,तलाठी प्रीती घुडे,तलाठी राहुल भाटकर,तलाठी राहुल भोईर आणि ठाणे महापालिका अतिक्रमण विभाचे अधिकारी आदीजण उपस्थित होते.

मुब्र्यांतील डावले परिसरात कारवाई करण्यापुर्वी नायब तहसिलदार व तलाठ्यानी पोलिस संरक्षणाची मागणी केली होती, पोलिस यांना येण्यास थोडा उशीर झाल्याने ह्या अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडलेली आहे,कुठेतरी कल्पिता पिंपळे यांच्या हल्ल्यानंतर अश्या प्रकारे आजही आधिकाऱ्यावर हल्ला होण्याच्या घटना होताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे नक्कीच पोलिस प्रशासन अश्या कारवाई वेळेस अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी संक्षम ठरेल का ? हेच पाहण म्हत्त्वाचे असणार आहे, पोलीस आले पण वेळेत आले असते तर कारवाई पूर्ण होऊ शकली असती, पण पोलीस यांनी गुन्हा दाखल करून घेण्यास पूर्ण सहकार्य केलं आहे आणि पुढे मोठा पोलीस फोर्स घेऊन परत कारवाई करू असे देखील आश्वासित केल आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com