सध्या गौतमी पाटीलमुळे ब्राम्हणी नृत्यांगनांचे मार्केट डाऊन झाले म्हणून तीला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असे काही लोकांचे म्हणणे आहे, अशा लोकांना सांगितले पाहिजे की, जी मिडीया गौतमीबाबत रोज काही ना काही बातम्या टाकून तीला वारेमाप प्रसिद्धी देत आहे ती लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, सकाळ, साम, झी, स्टार, टीव्ही 9, एबीपी माझा इत्यादी सर्व मिडिया ब्राम्हणी मीडिया आहे. ब्राह्मणी नृत्यांगनांचे मार्केट डाऊन होत असते तर या ब्राम्हणी मीडियाने गौतमी पाटील सारख्या एका सामान्य बहुजन मुलीला डोक्यावर घेतले असते का? हा साधा प्रश्न आहे.
मुळात गौतमी पाटील जे डान्सचे कार्यक्रम करते त्या कार्यक्रमांची लेवल आणि मानसी नाईक, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे इत्यादी नट्यांच्या डान्सच्या कार्यक्रमाची लेवल यात खूप फरक आहे. त्यामुळे गौतमीमुळे ब्राम्हणी नट्यांचे नुकसान होतय असे समजणे हा टोटल अडाणीपणा आहे. चित्रपटातील किंवा टीव्ही कार्यक्रमातील नट्यांना गौतमीच्या सुपाऱ्यांमुळे काहीही फरक पडत नाही. फरक पडतो तो बहुजन समाजातीलच त्या नर्तिकांना ज्या लावणी, सांस्कृतिक नृत्यांचे कार्यक्रम करतात. त्या मुली देखील सर्वसामान्य घरातीलच असून डान्स करताना गौतमी जे विचित्र चाळे करते ते चाळे बाकीच्या त्या सर्वच मुली करु शकत नाहीत किंवा करु इच्छित नाहीत. म्हणून गौतमीच्या सुपाऱ्यांचा परिणाम या सामान्य डान्सर मुलींच्या कमाईवर होतोय, मोठ्या नट्यांच्या कमाईवर नाही. दोन्हींच्या पातळ्या काही प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे.
गौतमीच्या समर्थनातील काही पांचट विचारवंत असाही विचार करताना दिसतात कि, लोकांना सिनेमात उघड्या नागड्या नट्या नाचताना बघायला चालतात मग गौतमीचा डान्स का नाही चालत? असा प्रश्न मांडणाऱ्या विचारजंतानी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, सिनेमांचे पडद्यावरील दृश्ये आणि प्रत्यक्ष स्टेजवरील लाईव्ह सांस्कृतिक कार्यक्रम यात जमीन आसमानचा फरक आहे. उघडे नागडे सीन देणाऱ्या नट्या त्यासाठी लाखों रुपये घेतात शिवाय त्यांनी त्यासाठी आपली सर्व लाज सोडलेली किंवा विकलेली असते. त्या तशा उघड्या नागड्या अश्लील डान्स करतात मग ह्यांनी केला तर काय झाले, असे म्हणणे म्हणजे ते नागडे फिरतात म्हणून आम्हालाही नागडे होऊन फिरुद्या असे म्हणण्यासारखे आहे. तात्पर्य हे की, सिनेमातील काम आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील कला सादरीकरण यातील फरक या पांचट विचारजंतांनी अवश्य लक्षात घ्यावा.
गौतमीच्या विचित्र चाळ्यांची अचानक क्रेझ निर्माण झाल्यामुळे तीच्या कार्यक्रमांची डिमांड वाढली. कारण मुळातच रसिक प्रेक्षकांचा दर्जा हा पुर्णपणे घसरत चाललेला आहे, अशा चवटाळ प्रेक्षकांना कलेतील सौंदर्य नव्हे तर अश्लील अदाकारी बघण्याची चाड जास्तच वाढतेय. म्हणूनच गौतमी सारख्या नर्तिकेने दोन चार अश्लील विचित्र चाळे काय केले तर लगेच या चवटाळ प्रेक्षकांनी तीला डोक्यावर घेतले आणि तीच्याच कार्यक्रमाची मागणी करु लागले. शिवाय मिडिया जाणिवपूर्वक तीला लोकांच्या आणखीच डोक्यात घुसवित असल्याचे दिसत आहे. गौतमी पाटील ही केवळ तीच्या डान्समधील अश्लील आणि विचित्र चाळ्यांमुळे प्रसिद्ध झाली आहे, तीच्या नृत्यामुळे नक्कीच नाही. अन्य नृत्यांगनांचे मार्केट बंद करण्याइतका तीच्या नृत्याचा दर्जा नक्कीच नाही.
गौतमी ही एक चांगली नृत्यांगना तरी आहे का? तीचे डान्स नीट बघितले तर सहज लक्षात येते की तीला लावणी किंवा इतर डान्स सुद्धा धड येत नाही. एक चांगली नृत्यांगना म्हणावे असे तीच्या नृत्यात कोणतेही कौशल्य नाही की ज्यावर ती स्वतःचे करीअर घडवेल किंवा एक यशस्वी नृत्यांगना म्हणून फार काळ टिकून राहिल. जितकी जलद गतीने ती हवेत गेली तितक्याच जलद गतीने ती खाली आदळलेली दिसेल कारण शेवटी हवेचा फुगा फुटतो आणि उत्तम दर्जाच टिकतो. तीच्या नृत्याला विशेष असा दर्जा नाहीच केवळ एका डान्सच्या कार्यक्रमात तीने अश्लील चाळे केलेल्या नृत्याची एक व्हिडिओ रील सोशल मीडियावर जास्त व्हायरल झाली आणि बदनामी में भी नाम होता है या निगेटिव्ह पब्लिसिटी सुत्रानुसार ती रातोरात प्रकाशझोतात आली इतकेच. त्याआधीही ती नृत्य करताना असे चाळे करत होती परंतु तीला फार डिमांड नव्हते.
मीडियाच्या नजरेत आल्यापासून मिडिया गौतमीला जी प्रसिद्धी देत आहे ती जाणिवपूर्वक देत आहे असे स्पष्ट दिसत आहे. याचे कारण देशात उरलीसुरलेली भारतीय कला संस्कृती मोडित काढण्याचे काम आंतरराष्ट्रीय कार्पोरेट धोरणांनूसार मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहे. सिनेमा, वेब सिरिज, डेली सोप टिव्ही मालिका यातून सातत्याने पेरणी होत असलेल्या उत्तेजक दृश्यांनी कळस गाठला आहे, तर उत्तरप्रदेश बिहार सारख्या राज्यांमधील नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमात देखील अश्लीलतेला अगदी उत आल्याचे दिसत आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचा बिहार करण्यासाठी गौतमीचे डान्सिंग चाळे पुरक ठरावे आणि तीला अन्य मुलींनी फॉलो करीत हे प्रमाण अधिकाधिक वाढावे या हेतूने मिडिया गौतमीला अवाजवी प्रसिद्धी देत आहे. कारण गौतमी नाचताना असे विचित्र हावभाव करुन जर इतकी प्रसिद्ध होत असेल तर आपणही असे करुन पहावे, अशी भावना महाराष्ट्रभर नृत्याचे कार्यक्रम करणाऱ्या इतर काही मुलींची देखील बनु शकते हे
मानसशास्त्र मिडिया आणि मिडियामागील कॉर्पोरेट सुत्रधारांना चांगलेच माहीत असते. विविध कार्पोरेट अजेंड्यानूसार देशातील ही ब्राह्मणी मिडिया लोकांना एकप्रकारे ट्रेन करीत असते. म्हणून सिनेमातील नट्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमातील नर्तिका यांना तुलनात्मक दृष्टीने एकाच पातळीवर पाहणे अवास्तविक आहे. बहुजन समाजातील सुज्ञ लोकांनी गौतमीसारख्या शोभेच्या बाहुलीचे समर्थन करण्याआधी जरुर विचार करावा की, आपल्या घरातील, नात्यातील मुली देखील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात, कॉलेज शाळेच्या गॅदरिंगमध्ये नृत्य सादर करण्यासाठी भाग घेतात, गौतमीची प्रेरणा घेऊन उद्या तुमच्या मुलींनी तसे नृत्य केले तर तुम्हाला ते चालेल.. रुचेल.. आवडेल का? गौतमीच्या डान्सची ही दळभद्री क्रेझ जर शाळा कॉलेजच्या गॅदरिंगपर्यंत घुसली तर किती पालकांना, शिक्षकांना आवडेल? या सर्व गोष्टींचा सामान्य लोकांनी विचार करावा आणि मग समर्थन करावे की नाही ते ठरवावे.
शेवटी ही महत्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे की वेगवेगळे आंतरराष्ट्रीय कार्पोरेट अजेंडा राबविण्यासाठीच तुमचे मन, मेंदू आणि मानसिकता घडविण्याचे काम मेनस्ट्रीम मिडिया सातत्याने करीत असते आणि त्यासाठी सहाय्यक ठरणाऱ्या व्यक्तींना कोणत्या ना कोणत्या निमित्ताने काही काळ जाणिवपूर्वक प्रसिद्धीझोतात, चर्चेत ठेवत असते. या चर्चेतूनच सामान्य लोक निरर्थकपणे त्या व्यक्तीचे समर्थन किंवा विरोध करीत राहतात, मात्र अशा व्यक्तींना जाणिवपूर्वक इग्नोर करणेच सामाजिकदृष्ट्या अधिक योग्य असते.
हर्षद रुपवते
0 टिप्पण्या