Top Post Ad

सेंथील' आणि 'सेंगोल'...


 'सेंथील' आणि 'सेंगोल'... एक जळजळीत 'सत्यता'; तर, दुसरा सत्यतेचा निव्वळ भव्यदिव्य 'आभास' !!!
दोन्ही प्रयोग दाक्षिणात्यच......

'सेंगोल'.....
हा एक दाक्षिणात्य (तामिळनाडू) चेरा, चोला आणि पंड्या वंशांच्या सत्ता-हस्तांतरणाचं प्रतिक असलेला सोन्याच्या वर्खाने (सोन्याचा नव्हे) मंडित साधारण ५ फूट लांबीचा व वरच्या टोकावर नंदीची प्रतिमा असलेला 'राजदंड', जो कधिही पं. नेहरुंना लाॅर्ड माऊंटबॅटन वा राजाजी वगैरे कुणीही दिल्याचा काडीमात्र पुरावा नसतानाही (पं. नेहरुंसारखी महान-विशाल व्यक्तित्वं, असल्या भाकड कर्मकांडांवर कधिही विश्वास ठेवत नाहीत), तसा धांडोरा पिटला जातोय. एकाबाजुला, भाजपाई भाडखाऊ 'आयटी ट्रोल-आर्मी'कडून पं. नेहरुंसह नेहरु-गांधी घराण्याची अश्लाघ्य भाषेत रासवट पद्धतीने खोटी बदनामी करत रहायचं... पण, दुसर्‍या बाजुला भारताच्या पहिल्या पंतप्रधानांची म्हणजेच, पं. नेहरुंची 'हिमालयीन उंची' गाठण्याच्या निर्लज्ज प्रयत्न करायचा, केवळ या हीन उद्देशानेच 'सेंगोल'रुपी भातुकलीचा खेळ 'बालबुद्धी' भाजपाई चाणक्यांनी, काल रोजी (२८ मे-२०२३) नव्या संसद-भवनाच्या उद्घाटन-सोहळ्यानिमित्त खेळून पाह्यलाय, इतकचं! या केविलवाण्या प्रयोगातून निष्पन्न झालं इतकचं की, पं. नेहरु नावाच्या हिमपर्वताच्या, आकाशगामी उंचीपुढे दिल्लीश्वरांच्या गावकुसातील टेकड्यांची 'ठेंगणीठुसकी उंची' साफ उघडी पडलीय!

.'सेंगोल'नंतरची दुसरी 'सेंथील' बाब.....

 'शशिकांत सेंथील', हा एक नवयुवक ४४व्या वर्षी IAS सेवेतून मुदतपूर्व निवृत्ती घेऊन, आपला सहकारी सुनिल कानुगोलू याच्यासह 'प्रशांत किशोर पॅटर्न'सारखाच एक प्रयोग ('सेंथील-प्रयोग' म्हणजे, ४०% सरकार किंवा PayCM सारख्या प्रभावी घोषणा अथवा नॅरेटीव्हज मांडत बूथपातळीपासून सुरुवात करत काँग्रेस प्रदेशाध्यक्षापर्यंत, सक्षम समन्वय राखणारा यशस्वी कर्नाटकी-प्रयोग) राबवत... नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा-निवडणुकीत काँग्रेसला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलणारा!

'सेंथील-प्रयोगा'तून दणदणीत हार पदरात पडल्यानंतर व त्यातून, दाक्षिणात्य-प्रवेशाचा दरवाजा आपल्याच तोंडावर आपटून बंद झाल्यावर... 'सेंगोल'सारख्या, केविलवाण्या राजकीय धडपडी जेव्हा, राज्यकर्ते करु पहातात; तेव्हा, ते आपल्या कारभारातल्या विसंगती स्वतःच उघड्या पाडत, आपल्या स्वतःलाच हास्यास्पद ठरवतात. कसं, ते जरा पाहूया... 

‘अदण्ड्योऽस्मि’ म्हणजेच, "मी कुणाकडूनही दंडनीय नाही", असा राज-अहंकाराचा दर्प असणार्‍या राजाला ‘धर्म दण्ड्योऽसि’... अर्थात, "तू ही धर्मानुसार (सध्याच्या घडीला 'राज्यघटनात्मक कायद्या'नुसार) दंडनीय आहेस"... असं धर्मगुरुंकडून 'सेंगोल' (राजदंड) राजाच्या मस्तकी लावून सांगितलं जायचं आणि त्याप्रसंगी, जे उच्चारण केलं जायचं, त्याचा अर्थ, "विनम्रतेनं तू राज्यकारभार कर", असा असायचा. 

पण, आजवरचा दिल्लीश्वरांच्या राज्यकारभाराचा अनुभव, याच्या घोर विपरीत तर दिसत आलायच; परंतु जोडीला काल नव्या संसद-भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी, ज्यापद्धतीने ब्रिजभूषण शरणसिंग नावाच्या भाजपा-खासदारावर (आणि, तो बेशरमपणे उद्घाटन-सोहळ्यात मारे उपस्थिती लावून होता) लैंगिक-शोषणाचा आरोप करत आंदोलन करणाऱ्या आमच्या ऑलिंपिक-विजेत्या हरयाणवी महिला-पहिलवान भगिनींशी, दिल्लीश्वरांच्या आज्ञेनुसार क्रूर व माणुसकीला काळीमा फासणारा व्यवहार दिल्ली-पोलिसांकरवी करण्यात आला, तो पहाता... या सगळ्याच दिल्लीश्वरांना, 'सेंगोल'सारख्याच छडीने मतपेटीद्वारे, २०२४ च्या लोकसभा-निवडणुकीत भारतीय-मतदार साफ फोडून काढतील, याबाबत कुणाच्याही मनात तिळमात्र शंका नको... तोच त्यांना समुचित 'दंड' होय... कारण, आपल्याच कृतिने ते 'दंडनीय' ठरलेत! 

...त्या दृष्टीनेच, अशा कितीही हुलकावणी देत, आपलं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी रोज नवनवी 'हुलकटावणी' (ग्रामीण मराठी शब्द) भाजपाने लोकसभा-निवडणुकीपूर्वी आणली... तरीही, हिंडेंनबर्गने उजेडात आणलेलं 'अदानी प्रकरणा'ची संयुक्त संसदीय समितीतर्फे (JPC) सखोल चौकशी आणि "अदानीचे ते २०,००० कोटी रुपये नेमके कोणाचे" व त्याच्या जोडीला, "राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते, नव्या संसद-भवनाचा उद्घाटन का झालं नाही; तसेच, हे नव्या संसद-भवनाचं उद्घाटन होतं की, पं. नरेंद्र मोदींचा राज्याभिषेक???...हे राहुल गांधींनी उपस्थित केलेले महत्त्वपूर्ण ज्वलंत प्रश्न, आपण दिल्लीश्वरांना निरंतर विचारतच रहायचे... धन्यवाद!

...राजन राजे (अध्यक्ष : धर्मराज्य पक्ष)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com