Top Post Ad

नव्या संसद भवनासमोर महिला महापंचायत... ?


 जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, पोलिस फोर्सच्या पुढे त्यांचा हा प्रयत्न फोल ठरला आहे.  कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अनेक आंदोलक खेळाडूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे हे आंदोलन आता वेगळ्या वळणावर आले आहे.  

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांच्या प्रचंड फौजने कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी काहीशी झटापट झाल्याचंही समोर आलं आहे. 

 महिला महापंचायतीसाठी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत मोर्चा काढणाऱ्या अनेक कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आंदोलकांना बसेसमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी नेले आहे. महिला महापंचायतीसाठी जंतरमंतर ते नवीन संसदेपर्यंत मोर्चा काढणाऱ्या अनेक कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आंदोलकांना बसेसमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी नेले आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर जेएनयूचे विद्यार्थीही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. AISA कार्यकर्ते गंगा ढाब्यावर जमून घोषणा देत आहेत. AISA चा दावा आहे की दिल्ली पोलिसांनी अघोषितपणे कॅम्पसमध्ये कलम-144 सारखी परिस्थिती लागू केली आहे. कुस्तीपटूंना ताब्यात घेतल्यानंतर जेएनयूचे विद्यार्थीही त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. AISA कार्यकर्ते गंगा ढाब्यावर जमून घोषणा देत आहेत. AISA चा दावा आहे की दिल्ली पोलिसांनी अघोषितपणे कॅम्पसमध्ये कलम-144 सारखी परिस्थिती लागू केली आहे.


 आंदोलन सुरूच राहणार  “आमचं आंदोलन संपलेलं नाही. पोलिसांच्या ताब्यातून सुटून आम्ही पुन्हा जंतर मंतरवर सत्याग्रह सुरू करू. या देशात आता हुकुमशाही चालणार नाही. तर, महिला कुस्तीपटूंचा सत्याग्रह चालेल. आम्ही शांततेने मार्च करत होतो. मात्र, त्यांनी जबरदस्तीने आम्हाला ओढून नेले आणि ताब्यात घेतले. एवढेच नाही तर आम्ही देशद्रोही नाही, आम्ही तिरंगा घेऊन शांततेने जात होतो, पैलवानांना ताब्यात घेतले आहे, न्याय मागणाऱ्या बहिणी-मुलींना ताब्यात घेतले जात आहे. -  महिला कुस्तीपटू साक्षी मलिक 

“ ते आज संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करत आहे, पण ते देशातील लोकशाहीची हत्या करत आहेत.  एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे, ” असं सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.

या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट केला आहे. “राज्याभिषेक पूर्ण झाला. अहंकारी राजा रस्त्यावर जनतेचा आवाज चिरडत आहे”, असं ट्वीट राहुल गांधींनी केलं.

“खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात, अभिमानानं तिरंगा अंगाखांद्यावर घेऊन भावुक होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात; तेव्हा ऊर अभिमानाने भरून येतो आणि कित्येक डोळ्यांत स्वप्नं पेरली जातात..आजचं हे दृश्य मान शरमेनं झुकवणारं..अंतर्मुख व्हायला लावणारं..”, असा संताप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com