Top Post Ad

फुटपाथ काबीज करणाऱ्या उत्सव हॉटेलवर कारवाई का नाही?

उत्सव हॉटेलने तर चक्क फुटपाथ काबीज केली आहे 

ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात असलेल्या सुप्रसिद्ध ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानावर ठाणे महानगर पालिकेने नुकतीच कारवाई केली आहे. दुकानासमोरील जागेत एक शेड उभारण्यात आली होती आणि त्याचबरोबर बांधकामही करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या बेकायदा बांधकामावर पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. यामध्ये बांधकाम आणि शेड तोडून टाकण्यात आली. या कारवाईबाबत खुलासा करताना महापालिकेने ही नेहमीची कारवाई असून या मागे कोणताही हेतू नसल्याचे सांगितले. तसेच आजुबाजूच्या परिसरातील अनेक दुकानांवर कारवाई केल्याचेही महापालिकेने स्पष्टीकरण दिले. 

मात्र त्याच परिसरातील उत्सव हॉटेलने तर संपूर्ण फूटपाथवर आपला पसारा मांडला आहे. या हॉटेलने संपूर्ण फुटपाथ ताब्यात घेऊन त्यावर शेड बांधली आहे. मात्र पालिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याला यावर कारवाई करण्यास लक्ष गेले नाही याबाबत परिसरातील नागरिकांनी ही आर्थिक देवाण-घेवाणीची बाब असल्याचे मत व्यक्त केले. आजही हे हॉटेल अर्धेअधिक फूटपाथ काबीज करून आहे. मात्र पालिकेचे अधिकारी याकडे कानाडोळा करीत आहेत. या परिसरात अनेक दुकानांनी बेकायदा शेड उभारण्याबरोबरच बेकायदा बांधकाम केले आहे. परंतु ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानावरच केवळ कारवाई झाल्याने समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत

प्रशांत कॉर्नल या दुकानावरील कारवाईमागे एका बड्या नेत्याच्या पत्नीचा अहंकार दुखावल्यामुळे पालिकेने ही कारवाई केल्याची यावरून उघड होत आहे. या दुकानाच्या मालकांनी याबाबत व्हीडीओद्वारे स्पष्टीकरण दिले असले तरी. पालिकेचा दुजाभाव यामागे दिसून येत आहे. उत्सव हॉटेलवर कारवाई का नाही असा प्रश्न मात्र ठाणेकरांना पडला आहे. म्हणूनच प्रशांत हॉटेलवरील कारवाईवर पालिकेचा कोणताही अधिकारी बोलण्यास तयार नसल्याने साशंकता निर्माण झाली आहे.   एका बड्या नेत्याने फोनवरून केलेल्या आदेशान्वये नुकतीच कारवाई केली. मात्र याच परिसरात असलेले उत्सव हॉटेल मात्र या पालिका अतिक्रमण विभागाला दिसले नाही का असा सवाल आता निर्माण होत आहे.  उत्सव हॉटेल चक्क फूटपाथवरच उभे आहे. अशी ठाण्यात कितीतरी हॉटेल आहेत ज्यांनी संपूर्ण फूटपाथ अडवली आहे. याबाबत पालिका प्रशासन झोपलेले आहे का असा सवाल ठाणेकर करीत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

JANATA  NEWS  xPRESS
 READ / SHARE  / FORWARD 
निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation G pay 8108603260 
संपादक: सुबोध शाक्यरत्न M-8108658970
click here 👉- join Our WhatsApp group:
आपल्या साहित्याचे स्वागत आहे.
Email- pr.janata@gmail.com