Top Post Ad

मी ‘मन की बात’ करायला नाही, तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे


  उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. बारसू रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट अतिशय महत्त्वाची होती. या ठिकाणी त्यांना सभा घेण्यास परवानगी नाकारली असली तरी  सरकारवर जोरदार टीकास्र सोडताना उध्दव ठाकरे म्हणाले, आपल्याच जनतेला नुकसान पोहचवून सरकार विकास करणार असेल तर असा विकास नको. , लोकांची डोकी फुटली तरी चालतील, कोकणातील लोक भिकारी झाले तरी चालतील. मात्र, रिफायनरी झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे. मात्र, बारसूमधील लोकांना रिफायनरी नको असेल तर इथे रिफायनरी होता कामा नये, जर हुकूमशाहीने हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला. उपऱ्यांची सुपारी घेऊन भूमिपुत्रांच्या घरांवर वरंवटा फिरवणार का? ते मला मुळीच मान्य नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

आज मी कोकणात ‘मन की बात’ करायला आलेलो नाही, तर ‘जन की बात’ ऐकायला आलो आहे. शिवसेना ही बारसूतील लोकांच्या पाठिशी आहे. जर येथील लोकांना रिफायनरी नको असेल तर काहीही झालं तरी इथे रिफायनरी होऊ देणार नाही,  मी मुख्यमंत्री असताना टाटा एअरबस, बल्कड्रग्ज पार्क असे अनेक प्रकल्प महाराष्ट्रात आणले होते. मात्र, हे सर्व प्रकल्प गुजरातला हलवण्यात आले आणि आता वादग्रस्त प्रकल्प महाराष्ट्राच्या माथी मारण्यात येत आहेत. त्यामुळे राख महाराष्ट्राला आणि रांगोळी गुजरातला असं मी होऊ देणार नाही. आपल्याच जनतेला नुकसान पोहोचवून हे सरकार विकास करणार असेल तर असा विकास आम्हाला नको असे उद्धव ठाकरे यांनी सरकारला ठणकावले.

जागतिक वारसा वास्तूचा ठेवा असलेली कातळशिल्पे सोलगांव येथे असून बारसू येथे येऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पामुळे ही कातळशिल्प धोक्यात येणार आहेत. त्यामुळे ही कातळशिल्पे वाचविण्यासाठी आपण जागतिक संघटनेला पत्र लिहिणार असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे त्याची आठवणही पर्यावरण संघटनेला पत्र पाठवून करू देणार असल्याचीही ठाकरे यांनी दिली.

 बारसूतील प्रस्तावित रिफायनरीवरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आंदोलनही करत आहेत. तर पोलिसांकडून या आंदोलकांविरोधात बळाचा वापर झाल्याचं निदर्शनास आलं आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट यांच्यात उघड उघड शाब्दिक चकमकी घडत आहेत. त्यातच, उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यात बारसूतील ग्रामस्थांची भेट घेतली तसेच सोलगांव येथील कातळशिल्पांची पाहणीही केली.

ज्यांच्या गद्दारीची नोंद ३३ देशांनी घेतली आहे. तेव्हा ३३ देश काय महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यातील लोकही यांना ओळखत नव्हती. जेव्हा (समृद्धी महामार्गावेळी) विरोधाला लोक रस्त्यावर उतरली, माझ्याकडे धावत आली होती, तुम्ही आल्याशिवाय प्रकल्प होणार नाही असं ते म्हणाले. तेव्हा संभाजी नगर, जालन्यात आम्ही फिरलो. ज्याची नोंद कागदावर ओसाड म्हणून केली होती, तिथे मोसंबीच्या फळबागा होत्या, त्यामुळे त्यांची मोबदल्याची मागणी होती. यामुळे आम्ही मुंबईत बैठक घेतली. त्या फळबागा वाचवून बाजूने तो रस्ता कसा जाईल, याची आखणी केली. तो विरोध आम्ही मोडून नाही काढला. तो समजून घेतला, तिथल्या विरोधकांची समजूत काढून, बागा वाचवून मग तो रस्ता झाला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच उध्दव ठाकरे म्हणाले, बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या. मात्र आता प्रकल्प आणा किंवा आणू नका या सरकारच्या खुर्चीचे पाय मला डगमगताना दिसत आहेत. प्रकल्प चांगला असता तर आम्ही विरोध कशाला करु? मात्र ज्या प्रकारची दडपशाही चालली आहे त्यामुळे यात काहीतरी काळंबेरं आहे असं दिसतं आहे. मी पत्र दिलं होतं पण दडपशाही करुन प्रकल्प लादा म्हणून दिलं नव्हतं. निसर्गरम्य परिसराचा ऱ्हास करून हा प्रकल्प नको आहे. चांगल्या गोष्टी आपण जरुर केल्या. चिपी एअरपोर्टही माझ्या कालखंडात आला. इथल्या मोठ्या आणि सूक्ष्म माणसांना तो आणता आला नाही. जर एवढा चांगला प्रकल्प असेल तर तुम्ही लोकांसमोर का जात नाही? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com