Top Post Ad

वंचित बहुजन युवा आघाडीच्या मुंबई अध्यक्षावर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला

 


आज दिनांक २७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडी च्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते.  सभेच्या पुर्वतयारीची बैठक आंबेडकर भवन दादर पु्र्व येथे आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीसाठी वंचित युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आले होते  चहापानासाठी गौतम हराळ या कार्यकर्त्यासह मुख्य रस्त्यावर आले असता  पाळतीवर असलेल्या  ह्ल्लेखोरांनी चाॅपर व राॅडने दोघांवर हल्ला केला यात रणशूर गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहीती आहे. त्यांना तात्काळ केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक असल्याचे समजते. 

आंबेडकर घराण्याविषयी व रामदास आठवलेंविषयी अपशब्द वापरणारे पनवेलचे  आरपीआयचे माजी जिल्हाध्यक्ष जगदिश गायकवाड यांच्यावर चेंबूर येथे हल्ला केल्यानंतर रणशूर प्रकाशात आले होते. त्यामुळे रणशूर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संशयाची सूई आता थेट पनवेलपर्यंत गेली आहे.  हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. युवा आघाडी ह्याचे चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा इशारा वंचित युवा आघाडीने दिला आहे. तसेच वंचित बहूजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने ह्याचा निषेध करण्यात आला आहे 

या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभर आज युवा आघाडी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देणार आहे.  ह्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर ह्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी.तसेच हल्ला प्रकरणात तातडीने आरोपींना अटक व्हावी, हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या जगदीश गायकवाड आणि टोळीला अटक करण्यात यावी, त्यांचेवर कलम 307 सह संघटित गुन्हेगारी चे कलम (मकोका) लावून त्याचे अवैध संपत्ती बाबत महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीने दिलेल्या तक्रारी नुसार सीबीआय आणि ईडी कडून चौकशी होऊन त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी.अश्या मागण्या करण्यात येणार आहेत.  गृहमंत्री ह्यांना सर्व पोलीस ठाण्या मार्फत निवेदन देऊन दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास राज्यभर युवा आघाडी आंदोलन करेल असा इशारा देखील युवा आघाडीने दिला आहे.

. हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. मागे मान.बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड कडे संशयाची सुई आहे. या हल्ल्याचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तर्फे आणि तमाम आंबेडकरी जनते तर्फे निषेध व्यक्त करतो. आंबेडकर भवन वरील हल्ला खपवून घेणार नाही. जनतेत संतप्त प्रतिक्रिया आहे. 
-रेखाताई ठाकूर ( महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष- वंचित बहुजन आघाडी)


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com