Top Post Ad

मुंबई लोकल ट्रेनऐवजी आता वंदे भारत मेट्रो


 मुंबई लोकल ट्रेन्स म्हणजे मुंबईकरांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. मात्र, या लोकल ट्रेन्स लवकरच भूतकाळात जाण्याकरिता सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती मिळत आहे. कारण मुंबई महानगर क्षेत्रातील उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या देखरेखीखाली महत्त्वाकांक्षी मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (MUTP-III आणि 3A) राबविला जात आहे. त्याअंतर्गत रेल्वे बोर्डाने नुकतीच उपनगरीय रेल्वे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी मंजुरी दिली आहे.  त्यानुसार, हळूहळू सर्व लोकल ट्रेन या व्यवहारातून बाद केल्या जाणार आहेत.

उपनगरीय ट्रेन नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी, 238 वंदे भारत मेट्रो गाड्या खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यास दुजोरा दिला आहे. म्हणजेच मुंबई लोकलचे आजवरचे नेहमीचे डबे (रेक) बदलून आता वंदे भारत लोकल चालविली जाणार आहे. मुंबई लोकल ट्रेनऐवजी आता वंदे भारत मेट्रो धावणार आहे. त्यामुळे लोकलच्या सेकंड क्लास व सर्वच श्रेणीतील भाड्यात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मुंबईत नव्या वंदे भारत लोकल ट्रेन्सची निर्मिती मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांनुसार तंत्रज्ञान भागीदाराद्वारे केली जाईल. ही खरेदी MRVC द्वारे केली जाईल. 35 वर्षांच्या देखभाल करारासह (मेंटेनन्स कॉंट्रॅक्ट) ही खरेदी होईल.  MUTP-III आणि 3A अंतर्गत आधीच मंजूर झालेल्या रेकच्या देखभालीसाठी तंत्रज्ञान भागीदार दोन डेपो तयार करेल. MUTP-III आणि MUTP-3A या प्रकल्पांची किंमत अनुक्रमे 10,947 कोटी रुपये आणि 33,690 कोटी रुपये आहे.  वंदे भारत मेट्रो ही भारतातील पहिली स्वदेशी अर्ध-हाय स्पीड ट्रेन आहे. वंदे भारत एक्सप्रेसची ही मिनी व्हर्जन असेल. वंदे भारत मेट्रो ट्रेनची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये करण्यात आली होती. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत मेट्रोमध्ये अत्याधुनिक रेक असतील. हे 100 किमीपेक्षा कमी अंतर असलेल्या शहरांशी जोडले जातील.

मुंबई लोकल ट्रेनऐवजी आता वंदे भारत मेट्रो धावेल. ही मेट्रो म्हणजे एक अत्याधुनिक रेक असेल, जो जवळपास 100 किलोमीटर अंतरावरील शहरांना जोडेल. या प्रवासासाठी लागणारा वेळही कमी होणार आहे. वंदे भारत मेट्रो ही वंदे भारत एक्सप्रेसची मिनी आवृत्ती असेल. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील पहिली स्वदेशी सेमी हायस्पीड ट्रेन आहे. 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, देशातील 100 किलोमीटर अंतरापर्यंतची शहरे जोडण्यासाठी वंदे भारत मेट्रो जाहीर करण्यात आली होती. सध्या पश्चिम रेल्वे (WR) आणि मध्य रेल्वे (CR) द्वारे मुंबईत हार्बर व ट्रान्स-हार्बरसह एकूण चार उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर चालविले जातात. त्यात मुंबई महानगर क्षेत्रातील 319 किलोमीटर अंतर जोडले जाते. या मार्गांवर एसी लोकलसह दिवसभरात एकूण 3,129 फेऱ्या चालविल्या जातात. रोजची एकूण लोकल प्रवासी संख्या सरासरी 40 लाख इतकी आहे.

मुंबईतील लोकल स्तरावर लवकरच 238 वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू करण्यात येणार आहेत. हे रेक मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-III (MUTP-III) आणि 3A (MUTP-3A) अंतर्गत खरेदी केले जाणार आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे उत्पादन मेक इन इंडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केले जाईल. रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पांसाठी 10,947 कोटी रुपये आणि 33,690 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

वंदे मेट्रो यामुळे लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्यास मदत होणार असून मुंबईकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. ही ट्रेन डिसेंबरपर्यंत तयार होईल. त्यामुळे ही ट्रेन एकाच मार्गावर दिवसातून ४-५ वेळा धावणार आहे.सामान्य वंदे भारत ट्रेनला 16 डबे आहेत पण या ट्रेनला 8 डबे असतील. त्यामुळे नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी कमी वेळेत एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतील. जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधेचा लाभ घेता येईल. त्यामुळे आता  मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल इतिहासजमा होणार आहे. 

 लोकल म्हणजे मुंबईच्या हृदयाची धडकन आहे, चाकरमान्यांच्या स्वस्त प्रवासाची हक्काची सोय आहे. ठराविक लोकल, ठराविक डबा आणि ठराविक ग्रुप .. ही वर्षानुवर्षे जपलेले नाते आता संपुष्टात येण्याकडे विद्यमान सरकार वाटचाल करीत आहे.  ‘लोकल’ ट्रेन म्हणजे निःसंशयपणे मुंबईची जीवनरेखा आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात त्याला विशेष महत्त्व आहे. 16  एप्रिल 1853 च्या दिवशी, बोरी बंदर (आताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस) येथून ठाण्यापर्यंत मुंबईतील पहिली प्रवासी ट्रेन धावली. हीच पुढे सेंट्रल लाईन झाली. तेव्हापासून मुंबईत ट्रेन अव्याहतपणे धावत आहे. सतत विकसित होत जाणाऱ्या,  विस्तारणाऱ्या या कॉस्मोपॉलिटन शहराला लोकल ट्रेनने म्हणजेच किंवा उपनगरीय गाड्यांनी निरंतर गती दिलीय. ही गती अधिक  वाढावी म्हणून वंदे मेट्रो प्रकल्प आणला आहे की सर्व सामान्यांना या प्रवासातून हद्दपार करण्याचा हा खेळ आहे असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com