कोकणातील बारसू - सोलगाव रिफायनरीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे...त्याचवेळी विदर्भासारख्या कमी पावसाच्या प्रदेशात ऐन उन्हाळ्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडत आहे. नद्यांना पूर आले आहेत. गारपीट होत आहे. पिके उध्वस्त झाली आहेत. कोकण - गोवा- कारवारमधे आंबा २५% पेक्षा कमी आला आहे. उष्णतेच्या लाटा तापमानाचे आतापर्यंतचे विक्रम दरवर्षी मोडत आहेत. अवर्षणग्रस्त क्षेत्र वाढत आहे. मुंबईसह सर्वत्र तापमानाचे विक्रम मोडले जात आहेत.
कार्बन डाय ऑक्साईड व इतर उष्णता शोषणाऱ्या वायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वी तापत आहे. महासागरांच्या तापमानात मार्च व एप्रिल या दोन महिन्यात गतवर्षीपेक्षा ०.२°से ची वाढ नोंदली गेली आहे. हे थरकाप उडवणारे वास्तव आहे. पृथ्वीच्या तापमानातील वाढीमुळे हवामान बदल झाला आहे. तापमानवाढ महाविस्फोटक अवस्थेत गेली आहे. मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. या वैज्ञानिक सत्याकडे दुर्लक्ष करून कार्बन शोषणाऱ्या उरलेल्या हरितद्रव्याचा व जैव विविधतेचा साठा असलेले कोकण होरपळून टाकणारा बारसू रिफायनरी प्रकल्प तेथील गावांचा प्रखर विरोध असतानाही लादला जात आहे.
मानवजात धोक्यात आली असल्याने, उष्णता वाढवणाऱ्या कार्बनच्या उत्सर्जनात मोठी कपात करण्यासाठी व पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ २°से च्या मर्यादेत रोखण्यासाठी पॅरिस येथे सर्व देशांच्या प्रमुखांनी एखाद्या प्रश्नावर प्रथमच एकत्र येऊन, डिसेंबर २०१५ मधे करार केला. परंतु वास्तवात कार्बन उत्सर्जन वाढते ठेवल्याने हा ऐतिहासिक करार अयशस्वी ठरला आहे. आॅगस्ट २०२० मधे २.१४°से ची वाढ पृथ्वीच्या सरासरी तापमानात झाली आहे. दरवर्षी सरासरी तापमान ०.२० से या अभूतपूर्व गतीने वाढत आहे.
मानवजात व जीवसृष्टीच्या रक्षणासाठी याबाबतचे विज्ञान जनतेला समजणे आवश्यक आहे. बारसू- सोलगाव रिफायनरी प्रकल्प या पार्श्वभूमीवर रद्द होणे आवश्यक आहे.
*या विषयावर शुक्रवार दि. ५ मे रोजी सायंकाळी ५:३० वाजता दादर प. येथील दादर सार्वजनिक वाचनालयाच्या धुरू सभागृहात भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ आणि दादर सार्वजनिक वाचनालय यांनी संयुक्त जाहीर सभा आयोजित केली आहे.*
अॅड. गिरीश राऊत
निमंत्रक
भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ
दू. ९८ ६९ ०२३ १२७
0 टिप्पण्या