सनातन हा शब्द गेल्या काही वर्षातच सातत्याने वापरात आणला जात आहे. माझ्या आठवणीप्रमाणे ९० च्या दशकात शिवसेना, बजरंग दल जोरात होते. त्या वेळी सनातन प्रभात सुद्धा कुणाला माहिती नव्हते. बहुजन चळवळींनी जोर धरला. १९९३ च्या ऑर्गेनायजर मधे द शूद्रा रेव्हॉल्युशन या नावाखाली तीन चार लेख आले. भारतात शूद्रांचे राज्य आले तर देश अधोगतीला जाईल असा कामत चा लेख होता. या बहुजन चळवळीत लालू, मुलायम आणि हरयाणातल्या जाटांचे राजकीय आंदोलन आणि कांशीराम यांची सामाजिक चळवळ यांचा धसका घेण्यात आलेला होता. बहुजन चळवळींनी हिंदू हा धर्म ब्राह्मणी धर्म आहे हे सांगायला सुरूवात केली. याच दरम्यान उत्तर प्रदेशात यादव, जाटव आणि अन्य काही समूहात बौद्ध अभ्यासकांची वाढ झाली.
या काळातच मोहेंजोदडो आणि बुद्धाच्या काळची सभ्यता यातली साम्ये उजेडात आली. यावर अनेकांचे संशोधन पुढे येऊ लागले. सोप्पे करून सांगायचे तर मोहेंजोदडो ची संस्कृती गुजरात पासून बिहार पर्यंत होती. त्या काळची जी संस्कृती होती तीच बुद्धाच्या काळीही अस्तित्वात होती हे आता अनेक गोष्टींवरून म्हटले जाऊ लागले. आता तर नवनवीन पुराव्यांची भर पडत चालली आहे. जिथे तथाकथित श्रीरामाचा जन्म झाला असे सांगितल्या जाते. त्या अयोध्या नगरीचे नाव साकेत होते. साकेत तर बौद्ध व्यापार आणि संस्कृती केंद्र होते. जर रामाचा जन्म बुद्धाच्या आधी असेल तर रामायणात साकेत हे नाव यायला हवे. पण ते अयोध्या हे असल्याने रामायण अयोध्या हे नाव प्रचलित झाल्यावर लिहीले गेले हे उघड आहे. अशा अनेक गोष्टी ऐतिहासिक पुराव्यानिशी येऊ लागल्याने प्राचीन वैदीक सभ्यतेबाबतचे सव दावे आज ना उद्या खोडून निघणार हे निश्चित झाले. बळ, मिथ्य, प्रचार, प्रसार आणि पैसा या जोरावर हे असत्य आणखी काही काळ रेटून नेता येऊ शकेल. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर किती रोखणार ?
म्हणून ही जी प्राचीन संस्कृती आहे तिलाच सनातन असे म्हणायला सुरूवात झाली. हे म्हणजे सत्य बोलायचे नाही पण असत्यही सांगायचे नाही. आम्ही कुठे म्हणतो कि वैदीक / ब्राह्मणी संस्कृती हीच प्राचीन आहे ? असा कावा करता येतो. हिंदू हे नाव मुसलमान आक्रमकांनी दिल्याचे आता मान्य झालेले आहे. तसेच शंकराचार्यांनी हिंदू धर्माची स्थापना केल्याचेही ब्राह्मण मान्य करतात. त्यामुळे हिंदू हा धर्म सातव्या आठव्या शतकातला नवीन धर्म बनतो.
म्हणजे आता भारतातले प्राचीन धर्म बौद्ध आणि जैन हेच ठरतात. त्यामुळे भारतीय सभ्यता म्हणजे बौद्ध /जैन सभ्यता ठरते. हे मान्य केले तर सगळेच बदलते. यासाठी सनातन हा शब्द वापरात आणला गेला आहे. सनातन म्हणजे कोण हे सांगायचे नाही. जे जे प्राचीन आहे ते सनातन आणि तोच आमचा धर्म असे सांगायचे. दुसरीकडे सनातन म्हणजे कट्टर ब्राह्मणी धर्म वाटावा असे कर्मकांड प्रचारात आणायचे. ब्राह्मणी / वैदीक धर्मातल्या गोष्टी सनातनच्या नावाखाली सांगितल्या कि हेच सनातन म्हणजे प्राचीन म्हणजे जगाच्या सुरूवातीपासून आहे असा समज करून देता येतो. आज सुमारे तीस एक वर्षात सनातन हा शब्द वापरण्यात लक्षणीय वाढ झालेली आहे. आजही हिंदू हा शब्द राजकीय सोय म्हणून वापरात आहे. तो जर निष्प्रभ झाला तर सनातन हा शब्द वापरात आणण्यासारखी परिस्थिती बनवलेली आहे. पुढे सनातन हा शब्द सर्वत्र दिसेल. एक पिढी लहानपणापासून ऐकत आली असेल. पुढच्या पिढीत सनातन शब्दाच्या वापराने बौद्ध,जैन, ख्रिश्चन, मुस्लीम, शीख हे सगळेच मागाहून आलेले असे सांगितले जाईल.
सावकाशीने प्रतिक्रांतीचे चक्र उलटे फिरत असते. एकदा ते फिरले कि क्रांती होण्यासाठी महापुरूष जन्माला यावा लागतो. इथून पुढे महापुरूष जन्म घेतील का याची शंकाच आहे. ते काम सर्वसामान्यांनी केले पाहीजे. ते कमिटेड नाहीत. त्यांना कमिटेड न होऊ देण्यासाठी पुरोगामी कंपू भलभलत्या व्याख्यांमधे हुषारीने गुरफटून टाकत असतो. भक्तांसारखे वागलात तर तुम्हीही कट्टर म्हणवले जाईल असा सूचक इशारा भक्तविरोधी ड्राईव्हमधून दिला जातो. न बोलता दिला गेलेला इशारा न बोलता ग्रहण करून घेतला जातो आणि कट्टरांना उत्तर दिल्यास आपणही कट्टर ठरू या भीतीपोटी सनातन वाल्यांना मोकळे रान दिले जाते. मूठभरांनी शाबासकी द्यावी म्हणून बहुसंख्य लोकांचे सनातनीकरण स्वातंत्र्याच्या नावाखाली होऊ दिले जाते. अशाने कसे रोखणार या सनातनीकरणाला ? आज महात्मा फुलेंना सुद्धा शिवराळ ठरवले जातेय. उद्या बाबासाहेबांना पक्का जातीयवादी ठरवले जाईल.
व्याख्या कोण बनवतंय आणि त्यामुळे काय घडतंय हे लक्ष देऊन पाहिले पाहीजे. कथनी पेक्षा करणी अचूक बोलते. यामुळे उक्तीला भुलण्यापेक्षा कृतीवर लक्ष ठेवावे. आताची प्रतिक्रांती ही पक्की आहे. ती उलटवण्य़ाची मशिनरीच शिल्लक राहणार नाही. तीन सिंहांची राजमुद्रा असलेला राजदंड ही सम्राट अशोकाची निशाणी आहे जी खुपत असल्याने आता नंदीची मूठ असलेला दंड आणला गेला आहे. प्राचीन बौद्धकालीन प्रतिके ही मोहेंजोदरो कालीन सभ्यतेची निशाणी भारताच्या राज्यकारभारात मानाच्या प्रतिकांची जागा घेऊन आहेत. संसदेत एक हजार जणांची आसन व्यवस्था आहे. तीत गायपट्ट्यातून येणार्या जागा या स्पष्ट बहुमतापेक्षा जास्त आहेत. उद्या एक हजार मतदारसंघ आले तर दक्षिण भारत अल्पमतात जाईल. दक्षिणेच्या राज्यांनी कुटुंबनियोजनाकडे लक्ष दिल्याने त्यांच्या जागा कमी होणार आणि उत्तर प्रदेशच्या जागा भरमसाठ होणार. निव्वळ उत्तर प्रदेश जिंकले तर अन्य काही पक्षांची मदत घेऊन / फोडून सत्ता स्थापना केली जाऊ शकते.
या परिस्थितीत राज्यसभा विसर्जित करून लोकसभा आनि गुरूसभा अस्तित्वात आली कि संविधान, राष्ट्रचिन्हे हे सगळेच बदलले जाईल. मग प्रतिक्रांती पक्की होईल. यानंतर बहुजनांचे शूद्र रेव्हॉल्युशन कधीही ऐकायला येणार नाही. .... सावधान !
0 टिप्पण्या